इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेची ऑनलाइन सराव प्रश्नपत्रिका मालिका
विद्यार्थी मित्रांनो,
आपण सर्वजण दि. १२ फेब्रुवारी २०२३ रोजी होणाऱ्या इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करत आहात. या तयारीमध्ये आपणास मदत म्हणून आम्ही दि. १२ डिसेंबर २०२२ पासून ऑनलाइन सराव प्रश्नपत्रिका उपक्रम सुरू केला आहे. रोज तुम्हाला एका विषयाच्या एका घटकावर सराव चाचणी दिली जाते. सोबत त्या घटकाच्या मार्गदर्शन व्हिडिओची लिंक दिली आहे. तो पाहून आपण सराव प्रश्नपत्रिका सोडवू शकता. यामुळे आपला सराव होईल आणि शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी होईल.
आपण सर्वजण दि. १२ फेब्रुवारी २०२३ रोजी होणाऱ्या इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करत आहात. या तयारीमध्ये आपणास मदत म्हणून आम्ही दि. १२ डिसेंबर २०२२ पासून ऑनलाइन सराव प्रश्नपत्रिका उपक्रम सुरू केला आहे. रोज तुम्हाला एका विषयाच्या एका घटकावर सराव चाचणी दिली जाते. सोबत त्या घटकाच्या मार्गदर्शन व्हिडिओची लिंक दिली आहे. तो पाहून आपण सराव प्रश्नपत्रिका सोडवू शकता. यामुळे आपला सराव होईल आणि शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी होईल.
So be ready for this.
दिवस पंचविसावा सराव चाचणी - 33
दि. 06/01/2023
विषय - मराठी
घटक - शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व - शब्द समूहाबद्दल एक शब्द, समूहदर्शक शब्द, पिल्लू दर्शक शब्द, घर दर्शक शब्द
मार्गदर्शन व्हिडिओची लिंक
सराव चाचणी प्रश्नपत्रिका लिंक
सराव चाचणी प्रश्नपत्रिका लिंक
वरील घटकावरील प्रश्न सोडविताना खालील बाबींचा नक्की अभ्यास करा.
महत्त्वाचे मुद्दे......
शब्द संपत्तीवरील प्रश्न
1. शब्दसमूहाबद्दल एक शब्द
अनेक शब्दांनी शब्दसमूह बनतो या अश्या शब्दसमुहातून जो अर्थ प्राप्त होतो त्याच अर्थासाठी एकच शब्द वापरणे म्हणजे शब्दसमूहाबद्दल एक शब्द होय. उदाहरणार्थ -
१. अपेक्षा नसताना - अनपेक्षित
२. शेतात बांधलेली पडवी - पडळ
३. अस्वलाचा वेळ करणारा - दरवेशी
४. शेजा-यांशी वागण्याची पद्धत - शेजारधर्म
५ . अनुभव नसलेला - अननुभवी
६ . शेतक-यांना मिळणारे सरकारी कर्ज - तगाई
2. आलंकारिक शब्द
ज्याप्रमाणे अलंकार, पोशाख, केशरचना या मानवाच्या सौंदर्यात भर घालतात; तसेच म्हणी, वाक्प्रचार, अलंकारिक शब्द भाषेचे सौंदर्य वाढवतात. सर्व भाषामध्ये यांचा वापर केला जातो. कमी शब्दामध्ये व्यापक अर्थ अलंकारिक शब्दातून सांगितला जातो. आलंकारिक शब्दाचा शाब्दिक अर्थ लक्षात न घेता त्यामागील भावार्थ समजून घेणे आवश्यक असते. म्हणून आलंकारिक शब्द व त्यांचे अर्थ माहीत असणे आवश्यक आहे. आलंकारिक शब्दांचा अर्थ माहित नसेल तर त्यातून चुकीचा अर्थ काढला जाऊ शकतो. अशाच काही अलंकारिक शब्द व त्यांचा अर्थ जाणून घेऊयात.
१. कर्णाचा अवतार - दानशूर, उदार माणूस
२. कळसूत्री बाहुली - दुसऱ्याच्या तंत्राने चालणारा.
३. कळीचा नारद - भांडण लावून देणारा.
४. कुंभकर्ण - झोपाळू माणूस.
५. कूपमंडूक - संकुचित वृत्तीचा मनुष्य.
3. समूहदर्शक शब्द
एकापेक्षा अधिक वस्तू, प्राणी, व्यक्ती यांच्या समूहाला दर्शविण्यासाठी ज्या शब्दांचा वापर केला जातो त्या शब्दांना 'समूहदर्शक शब्द' असे म्हणतात.
उदाहरणार्थ
१. आंब्यांची - राई
२. प्रवाशांची - झुंबड
३. करवंदांची - जाळी
४. बांबूचे - बेट
५. खेळाडूंचा - संघ
4. घरदर्शक शब्द
प्राणी, पक्षी व व्यक्ती यांचे निवार्याचे व एकमेव विश्रांती घेण्याचे ठिकाण असते ते म्हणजे त्यांचे घर. हे सर्व ज्या घरात राहतात त्या घरांना काही नावे देण्यात येतात त्यांना 'घरदर्शक शब्द असे म्हणतात.
उदाहरणार्थ
१. उंदराचे – बीळ
२. कावळ्याचे – घरटे
३. कोंबडीचे – खुराडे
४. कोळ्याचे – जाळे
५. गाईंचा – गोठाl
5. पिल्लूदर्शक शब्द
प्राणी, पक्षी यांच्या पिल्लांना काही नावे देण्यात येतात त्यांना 'पिल्लूदर्शक शब्द असे म्हणतात.
उदाहरणार्थ
१. माणसाचे – बाळ ,लेकरू
२. मांजराचे – पिल्लू
३. मेंढीचे – कोकरू
४. म्हशीचे – रेडकू
५. वाघाचा – बच्चा,बछडा
🙏 धन्यवाद!🙏
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please do not enter any spam link in the comment box.