Breaking

शनिवार, ७ जानेवारी, २०२३

शिष्यवृत्ती परीक्षा सराव चाचणी मालिका | सराव चाचणी क्र 34 | गणित | व्यावहारिक गणित - नफा व तोटा


इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेची ऑनलाइन सराव प्रश्नपत्रिका मालिका

Scholarship Practice Test
विद्यार्थी मित्रांनो,  
आपण सर्वजण दि. १२ फेब्रुवारी २०२३ रोजी होणाऱ्या इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करत आहात. या तयारीमध्ये आपणास मदत म्हणून आम्ही दि. १२ डिसेंबर २०२२ पासून नलाइन सराव प्रश्नपत्रिका उपक्रम सुरू केला आहे. रोज तुम्हाला एका विषयाच्या एका घटकावर सराव चाचणी दिली जाते. सोबत त्या घटकाच्या मार्गदर्शन व्हिडिओची लिंक दिली आहे. तो पाहून आपण सराव प्रश्नपत्रिका सोडवू शकता. यामुळे आपला सराव होईल आणि शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी होईल.
So be ready for this.

दिवस सहविसावा सराव चाचणी - 34 
दि. 07/01/2023

विषय -  गणित 
घटक - व्यावहारिक गणित - नफा व तोटा

मार्गदर्शन व्हिडिओची लिंक 

सराव चाचणी प्रश्नपत्रिका लिंक

सराव प्रश्नपत्रिका येथे सोडवा.

वरील घटकावरील प्रश्न सोडविताना खालील बाबींचा नक्की अभ्यास करा.

महत्त्वाचे मुद्दे......  

व्यावहारिक गणित - नफा-तोटा
वाचा व समजून घ्या :
(1) माल ज्या किमतीला घेतात, त्या किमतीला खरेदी किंवा खरेदीची किंमत असे म्हणतात. 
(2) माल ज्या किमतीला विकतात, त्या किमतीला विक्री किंवा विक्रीची किंमत असे म्हणतात.
(3) खरेदीपेक्षा विक्री जास्त असल्यास नफा होतो.
(4) खरेदीपेक्षा विक्री कमी झाल्यास तोटा होतो.
(5) खरेदीच्या किंमतीत केवळ खरेदीच्या किंमतीचा विचार करून चालत नाही, तर माल विक्रीला ठेवण्यापूर्वी त्यावर केलेले इतर खर्च ... (उदा., वाहतूक खर्च, हमाली, कर, दुरुस्तीसाठी केलेला खर्च) यांचाही विचार करावा लागतो.
(6) एकूण खरेदी = मूळ खरेदी + इतर खर्च
(7) नफा व तोट्याचे सूत्र :
(a) नफा = विक्री - खरेदी
(b) तोटा = खरेदी - विक्री
(c) (i) खरेदी = विक्री - नफा
     (ii) खरेदी = विक्री + तोटा
(d) (i) विक्री = खरेदी + नफा
     (ii) विक्री = खरेदी - तोटा

        🙏 धन्यवाद!🙏

या उपक्रमाबाबत दररोजचे अपडेट आणि माहिती मिळविण्यासाठी खालील Social Media Icon वर करून आजच आमचा ग्रुप जॉईन करा.   

       


सदर उपक्रमातील सर्व सराव चाचणी प्रश्न पत्रिका मिळविण्यासाठी येथे क्लिक करा. 

Find All Practice Test Here 





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please do not enter any spam link in the comment box.