Breaking

शुक्रवार, ६ जानेवारी, २०२३

शिष्यवृत्ती परीक्षा सराव चाचणी मालिका | सराव चाचणी क्र 32 | बुद्धिमत्ता चाचणी | कुटप्रश्न

          

इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेची ऑनलाइन सराव प्रश्नपत्रिका मालिका

Scholarship Practice Test
विद्यार्थी मित्रांनो, 
आपण सर्वजण दि. १२ फेब्रुवारी २०२३ रोजी होणाऱ्या इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करत आहात. या तयारीमध्ये आपणास मदत म्हणून आम्ही दि. १२ डिसेंबर २०२२ पासून नलाइन सराव प्रश्नपत्रिका उपक्रम सुरू केला आहे. रोज तुम्हाला एका विषयाच्या एका घटकावर सराव चाचणी दिली जाते. सोबत त्या घटकाच्या मार्गदर्शन व्हिडिओची लिंक दिली आहे. तो पाहून आपण सराव प्रश्नपत्रिका सोडवू शकता. यामुळे आपला सराव होईल आणि शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी होईल. 
So be ready for this.

दिवस चौविसावा  सराव चाचणी - 32
दि. 06/01/2023
विषय -  बुद्धिमत्ता चाचणी  
घटक - कुटप्रश्न

मार्गदर्शन व्हिडिओची लिंक 

सराव चाचणी प्रश्नपत्रिका लिंक


सराव प्रश्नपत्रिका येथे सोडवा.

वरील घटकावरील प्रश्न सोडविताना खालील बाबींचा नक्की अभ्यास करा.
महत्त्वाचे मुद्दे ...... 
कुटप्रश्न - काही वेळा एखादी समस्या फार गुंतागुंतीची आहे, असे आपल्याला जाणवते. दैनंदिन व्यवहारातील साधी सरळ माहिती समजून घेणे, तिची उकल करणे आपल्याला कठीण जात नाही. पण माहिती गुंतागुंतीची असेल तर, तिची उकल करताना आपण गोधळतो, अशा माहितीवर तर्क-विचार करून टप्प्याटप्प्याने तिची उकल करणे गरजेचे असते. या प्रक्रियेत विद्यार्थ्यांच्या बुद्धीचा कस लागतो, असे म्हणता येईल.
थोडक्यात, कूटप्रश्न म्हणजे गुंतागुंतीचे प्रश्न यांमध्ये (1) रांगेतील स्थान (2) दिशा (3) दिनदर्शिका (4) पेन आकृती (5) कोडे (चौरस, त्रिकोण इत्यादी आकृत्यांतील संख्या या पाच उपघटकांचा समावेश असतो.

1. रांगेतील स्थान : या उपघटकामध्ये दोन प्रकारच्या रांगांवर प्रश्न विचारले जातात. एक प्रकारची रांग असते, एका आडव्या ओळीत उभे राहणाऱ्या व्यक्तींची (उदा., एकमेकांचे हात धरून उभे असणाऱ्या व्यक्ती) आणि दुसऱ्या प्रकारची रांग असते, एकामागोमाग उभे राहणाऱ्या व्यक्तीची (रेल्वे तिकिटासाठी उभे असणाऱ्या व्यक्ती). रांगेविषयक प्रश्नात रांगेच्या एका टोकाकडून किंवा दोन्ही टोकांकडून व्यक्तीचे स्थान क्रमांक दिलेले असतात. या माहितीआधारे विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर विद्यार्थ्याने काढायचे असते.

उपयुक्त टिपा
(1) रांगेतील व्यक्तीचे स्थान दोन्ही बाजूंकडून दिलेले असते, तेव्हा रांगेतील एकूण व्यक्ती मोजताना ती व्यक्ती दोनदा मोजली जाणार नाही, याची दक्षता घ्यावी. 
(2) रांगेतील एका व्यक्तीचे स्थान एका बाजूकडून दिलेले असते आणि रांगेतील एकूण व्यक्तींची संख्या दिलेली असते, तेव्हा त्या व्यक्तीच्या स्थानापासून दुसऱ्या बाजूस शेवटच्या व्यक्तीच्या स्थानापर्यंत मोजावे.

2. दिशा : या उपटात चार प्रमुख दिशा व चार उपदिशा याच्याबाबत प्रश्न विचारले जातात. या आ परस्परविरुद्ध दिशा लगतच्या दिशा इत्यादीचे ज्ञान विद्यार्थ्यांना असणे अपेक्षित असते.

उपयुक्त टिपा
मुख्य दिशा - पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण
उपदिशा - आग्नेय ईशान्य, वायव्य, नैऋत्य

विरुद्ध दिशांच्या जोड्या 
(1) पूर्व-पश्चिम
(2) उत्तर दक्षिण
(3) नैऋत्य ईशान्य 
(4) आग्नेय-वायव्य 

(1) उत्तरेकडे तोड केल्यास (अ) उजवीकडे पूर्व दिशा येते. (ब) डावीकडे पश्चिम दिशा येते.
(2) उजवीकडचे वळण म्हणजे, घटिवत वळण, डावीकडचे वळण म्हणजे, प्रतिघटिवत वळण

3. दिनदर्शिका : या उपघटकात प्रश्न वर्षातील दिवसाची तारीख वार इत्यादी माहिती दिलेली असते. याआधार त्या किंवा इतर वर्षातील दुसऱ्या एका दिवसाचा वार किंवा इतर माहिती शोधून काढायची असते. यासाठी आपल्या दैनदिन वापरातील दिनदर्शिकेची माहिती असणे आवश्यक आहे.

उपयुक्त टिपा : 
दिनदर्शिकेबद्दल माहिती
(1) सामान्य वर्ष एकूण दिवस 365 52 आठवडे दिवस यामुळे या तारखेचा वार पुढील वर्षी 1 दिवस पुढे सरकतो जसे. 2013 या वर्षी 3 ऑगस्ट रोजी शनिवार आहे. तर 2014 या वर्षी 3 ऑगस्ट रोजी रविवार असेल.
(2) जानेवारीला जो वार असेल, तोच वार त्या वर्षी 31 डिसेंबरला असतो (लीप वर्षात मात्र वार एक दिवस पुढचा असेल) त्यामुळे 1 जानेवारी रोजी असलेला चार त्या वर्षात 53 वेळा येतो.
(3) सोमवारी सुरू होणारा सप्ताह रविवारी (7 दिवसांनी) संपतो आठव्या दिवशी पुन्हा सोमवार येतो. 
(4)लीप वर्ष इसवीसनाच्या ज्या संख्येता से पूर्ण भाग जातो आणि ज्या शतक वर्षाला 400 में पूर्ण भाग जातो यांना लीप वर्ष म्हणतात. लीप वर्षांचे दिवस 366 असतात. 366 दिवस 52 आठवडे + 2 दिवस यामुळे या दिवशी असलेला वार पुढील वर्षात 2 दिवस पुढे सरकतो. 
(5) तीन वर्षात फेब्रुवारी महिन्यांचे 29 दिवस असतात. यामुळे, जानकारी व 2 जानेवारी या दिवशी असलेले दर वर्षात 53 वेळा येतात.
(6) लीप वर्षात ३ जानेवारीला बुधवार असेल, तर पुढील वर्षांच्या 1 जानेवारीला शुक्रवार असेल, लीप वर्षातील 28 फेब्रुवारीपर्यंतच्या दिवसांचे बार पुढील वर्षात दोन दिवसांनी पुढे जातात. 28 फेब्रुवारीच्या नंतरच्या दिवसांच बार पुढील वर्षात दिवसाने पुढे जातात.
(7) महिन्यातील 1, 2, 3 या तारखांना जे चार येतात तेच वार अनुक्रमे 29, 30, 31 तारखांना येतात महिन्यातील कोणते चार पाच वेळा येतात, हे यावरून ठरवता येते.
(लीप वर्ष नसेल, तर फेब्रुवारी व मार्चमधील कोणत्याही तारखेचे वार सारखेच असतात. 
(9) एखादया महिन्यात जेवढे दिवस असतील त्यांना 7 ने भागले की एकूण पूर्ण आठवडे मिळतात. बाकी जेवढी शिल्लक राहते, तेवढ्या दिवसांनी एखादया तारखेचा वार पुढच्या महिन्यात पुढे सरकतो. उदा., एप्रिल महिन्यात 30 दिवस असतात म्हणून 30-74 पूर्ण आठवडे आणि बाकी 2. त्यामुळे, 3 एप्रिलला जर सोमवार असेल, तर 3 मेला सोमवार +2 बुधवार असेल. यानुसार 31 दिवसांचा महिना असेल, तर पुढील महिन्यात वार 3 दिवस पुढे जातो. 29 दिवसांचा महिना असेल, तर बार दिवस पुढे जातो.
(10) प्रत्येक वर्षातील बालदिन (14 नोव्हेंबर), शिक्षक दिन (5 सप्टेंबर), स्वातंत्र्य दिन (15 ऑगस्ट) व लोकमान्य टिळक पुण्यतिथी (1 अगस्ट) या दिवशी सारखाच वार असतो. याशिवाय, प्रत्येक वर्षांतील महाराष्ट्र दिन (1 मे). महात्मा गांधी जयंती (2 ऑक्टोबर), नाताळ (25 डिसेंबर) या दिवशी सारखाच वार असतो.

4. कोडे : या उपघटकातील प्रश्नामध्ये एका चौरसात आठ संख्या आणि एक प्रश्नचिन्ह दिलेले असते, संख्यामध्ये असलेला विशिष्ट नियम शोधून प्रश्नचिन्हाच्या जागी असणारी संख्या ओळखायची असते. काही वेळा वर्तुळ, त्रिकोण, चौकोन अशा आकृत्याच्या आत व बाहेर संख्यांची मांडणी केलेली असते, या संख्यांमधील गणिती संबंध शोधून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखायची असते.

उपयुक्त टिपा:
(1) 1 ते 20 संख्यांचे वर्ग आणि 1 ते 10 संख्यांचे घन लक्षात ठेवावेत.
(2) 1 ते 30 पर्यंत संख्यांचे पाढे लक्षात ठेवावेत. (3) 1 ते 100 पर्यंत असणाऱ्या मूळ संख्या लक्षात ठेवाव्यात.
(4) उत्तर शोधण्यासाठी चौरसातील संख्यांचा क्रम पुढीलप्रमाणे लावून पाहावा (अ) आडव्या ओळीतील क्रम (ब) उभ्या स्तंभातील क्रम (क) कर्णाच्या किंवा तिरप्या दिशेने क्रम (ड) चढता किंवा उतरता क्रम.
(5) तसेच संख्यांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, वर्ग, घन अशा निरनिराळ्या कसोट्या लावून कोणत्या नियमानुसार संख्या लिहिल्या आहेत, ते शोधून काढावे व तोच नियम लावून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या काढावी.

5. वेन आकृती : या उपघटकातील प्रश्नात एकमेकांमध्ये गुंतलेल्या भौमितिक आकृत्या (वर्तुळ, चौकोन, त्रिकोण, इत्यादी) दिलेल्या असतात. यांतील प्रत्येक भागात अंक, अक्षर किंवा संख्या दर्शवलेल्या असतात. या भागांवर धारित काही प्रश्न दिलेले असतात. या भागांचे लक्षपूर्वक निरीक्षण करून त्यांची उत्तरे विदयार्थ्यांनी शोधायची असतात. 
उपयुक्त टीप : प्रश्नात दिलेल्या अटीनुसार, संबंधित आकृत्या बोटांनी झाकून निरीक्षण करावे. म्हणजे होणार नाही.
        🙏 धन्यवाद!🙏

या उपक्रमाबाबत दररोजचे अपडेट आणि माहिती मिळविण्यासाठी खालील Social Media Icon वर करून आजच आमचा ग्रुप जॉईन करा.   

       


सदर उपक्रमातील सर्व सराव चाचणी प्रश्न पत्रिका मिळविण्यासाठी येथे क्लिक करा. 

Find All Practice Test Here 





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please do not enter any spam link in the comment box.