Breaking

मंगळवार, १० जानेवारी, २०२३

शिष्यवृत्ती परीक्षा सराव चाचणी मालिका | सराव चाचणी क्र 40 | बुद्धिमत्ता चाचणी | सांकेतिक भाषा

            

इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेची ऑनलाइन सराव प्रश्नपत्रिका मालिका

Scholarship Practice Test
विद्यार्थी मित्रांनो, 
आपण सर्वजण दि. १२ फेब्रुवारी २०२३ रोजी होणाऱ्या इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करत आहात. या तयारीमध्ये आपणास मदत म्हणून आम्ही दि. १२ डिसेंबर २०२२ पासून नलाइन सराव प्रश्नपत्रिका उपक्रम सुरू केला आहे. रोज तुम्हाला एका विषयाच्या एका घटकावर सराव चाचणी दिली जाते. सोबत त्या घटकाच्या मार्गदर्शन व्हिडिओची लिंक दिली आहे. तो पाहून आपण सराव प्रश्नपत्रिका सोडवू शकता. यामुळे आपला सराव होईल आणि शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी होईल. 
So be ready for this.

दिवस चौविसावा  सराव चाचणी - 40
दि. 10/01/2023
विषय -  बुद्धिमत्ता चाचणी  
घटक - सांकेतिक भाषा 

मार्गदर्शन व्हिडिओची लिंक 

सराव चाचणी प्रश्नपत्रिका लिंक


सराव प्रश्नपत्रिका येथे सोडवा.

वरील घटकावरील प्रश्न सोडविताना खालील बाबींचा नक्की अभ्यास करा.
महत्त्वाचे मुद्दे ...... 

सांकेतिक भाषा :
संवाद साधण्याचे सर्वोत्तम माध्यम म्हणून आपण सगळे भाषेचा वापर करीत असतो. अर्थात, आपण बोलतो ती भाषा समोरच्या व्यक्तीना अवगत आहे, असे आपण गृहीत धरतो. एखादा सदेश गुप्त ठेवायचा असेल तेव्हा मात्र नेहमीच्या भाषेत तो संदेश इष्ट व्यक्तीपर्यंत पोहोचवणे धोक्याचे असते. कारण, इतरांनाही आपली भाषा अवगत असल्यामुळे संदेश गुप्त राहणे शक्य नसते. अशा वेळी संदेशाचे रूपांतर सांकेतिक भाषेत केले जाते. समोरची व्यक्ती त्या सांकेतिक भाषेचे नियम शोधून तो संदेश समजून घेतो. या घटकामध्ये सांकेतिक भाषेची उकल करण्याची विद्यार्थ्यांची क्षमता तपासणारे प्रश्न विचारले जातात

1. अक्षरांसाठी अक्षरांचा वापर : या उपघटकात अक्षरांसाठी सांकेतिक इतर अक्षरे किंवा शब्दांसाठी सांकेतिक इतर शब्द योजलेले असतात. यावरून, एखादे अक्षर किंवा शब्द सांकेतिक भाषेत कसा लिहिता येईल, ते विचारले जाते. उपयुक्त टीप : अक्षरांखाली सांकेतिक भाषेतील अक्षरे लिहा. अक्षर सांकेतिक भाषेत कोणत्या नियमाने बदलते, तो नियम शोधा.

2: अक्षरांसाठी अंकांचा वापर : या उपघटकातील प्रश्नात काही अक्षरे अकांनी दर्शवलेली असतात किंवा काही शब्द अंकसमूहांनी दर्शवलेले असतात. त्यांच्या आधारे विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर शोधायचे असते.
उपयुक्त टीप : अक्षरांखाली सांकेतिक भाषेतील अंक त्याच क्रमाने लिहा, अक्षरे व अंक यांचा क्रम सारखा नसल्यास दोन गटांतील समान अक्षर व अंक शोधा.

3 : अक्षरांसाठी चिन्हांचा वापर : या उपघटकातील प्रश्नांत अक्षरांना सांकेतिक भाषेत चिन्हांनी दर्शवले जाते. त्याआधारे विचारलेल्या शब्दासाठी सांकेतिक भाषेतील शब्द (किंवा त्याउलट) शोधायचा असतो. उपयुक्त टीप : अक्षरे व चिन्हांचा क्रम लक्षात घ्या.

4: अंकांसाठी अंकांचा वापर : या उपघटकातील प्रश्नांत एखादी संख्या वेगळ्या अकसमूहाने दर्शवतात. त्यांच्यातील संबंध लक्षात घेऊन दुसऱ्या संख्येसाठी अंकसमूह निवडायचा असतो.
उपयुक्त टीप : संख्येतील अंक व सांकेतिक भाषेत त्यांच्यासाठी वापरलेले अंक एकाखाली एक क्रमाने मांडावेत व नियम शोधून काढावा.

5. अंकांसाठी चिन्हांचा वापर : या उपघटकातील प्रश्नांत अंक दर्शवण्यासाठी चिन्हे वापरतात.
उपयुक्त टीप : अंकसमूह दिलेला असेल तर त्यातील अंकांच्या खाली चिन्हसमूहातील चिन्हे त्याच क्रमाने लिहावीत अंक व चिन्हे यांचा क्रम सारखा नसल्यास सामाईक अंक व चिन्हे शोधावीत.

        🙏 धन्यवाद!🙏

या उपक्रमाबाबत दररोजचे अपडेट आणि माहिती मिळविण्यासाठी खालील Social Media Icon वर करून आजच आमचा ग्रुप जॉईन करा.   

       


सदर उपक्रमातील सर्व सराव चाचणी प्रश्न पत्रिका मिळविण्यासाठी येथे क्लिक करा. 

Find All Practice Test Here 





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please do not enter any spam link in the comment box.