Breaking

बुधवार, ११ जानेवारी, २०२३

शिष्यवृत्ती परीक्षा सराव चाचणी मालिका | सराव चाचणी क्र 41 | गणित | मापन / महत्वमापन - नाणी नोटा, कागदमापन

 

इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेची ऑनलाइन सराव प्रश्नपत्रिका मालिका

Scholarship Practice Test
विद्यार्थी मित्रांनो,  
आपण सर्वजण दि. १२ फेब्रुवारी २०२३ रोजी होणाऱ्या इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करत आहात. या तयारीमध्ये आपणास मदत म्हणून आम्ही दि. १२ डिसेंबर २०२२ पासून नलाइन सराव प्रश्नपत्रिका उपक्रम सुरू केला आहे. रोज तुम्हाला एका विषयाच्या एका घटकावर सराव चाचणी दिली जाते. सोबत त्या घटकाच्या मार्गदर्शन व्हिडिओची लिंक दिली आहे. तो पाहून आपण सराव प्रश्नपत्रिका सोडवू शकता. यामुळे आपला सराव होईल आणि शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी होईल.
So be ready for this. 

दिवस सहविसावा सराव चाचणी - 41
दि. 11/01/2023

विषय -  गणित 
घटक - मापन / महत्वमापन - नाणी नोटा, कागदमापन

मार्गदर्शन व्हिडिओची लिंक 

सराव चाचणी प्रश्नपत्रिका लिंक


सराव प्रश्नपत्रिका येथे सोडवा.

वरील घटकावरील प्रश्न सोडविताना खालील बाबींचा नक्की अभ्यास करा.

महत्त्वाचे मुद्दे......  

कागदमापन - रीम
12 वस्तू = 1 डझन
12 डझन = 1 ग्रास = 144 कागद
24 कागद = 1 दस्ता (2 डझन कागद = 1 दस्ता)
20 दस्ते = 1 रीम = 1480 कागद


नाणी व नोटा
(1) एखादया रकमेसाठी जास्त मूल्याची नाणी अथवा नोटा देऊन त्याच रकमेएवढी लहान मूल्याची नाणी अथवा नोटा घेता येतात. यालाच सुटे करणे किंवा मोड घेणे असे म्हणतात. 
(2) एखाद्या रकमेच्या लहान मूल्याच्या नोटा किंवा नाणी देऊन त्याच (तेवढ्याच) रकमेच्या जास्त मूल्याच्या नोटा किंवा नाणी घेणे म्हणजे बंदे करणे. 
उदा., 1 रुपयाची 10 नाणी देऊन 10 रुपयांची 1 नोट घेता येते. किवा 10 रुपयांची 1 नोट देऊन 1 रुपयाची 10 नाणी घेता येतात.

दिनदर्शिका
(1) इंग्रजी व सौर वर्षाच्या महिन्यातील दिवसांची संख्या लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
(2) लीप वर्ष - ज्या वर्षांच्या संख्येला 4 ने पूर्ण भाग जातो, ते लीप वर्ष असते. 
उदा., 1996, 2000, 2004, 2008, 2012 ही लीप वर्ष आहेत. 
ज्या शतक वर्षांच्या संख्येला 400 ने पूर्ण भाग जातो, ते शतक वर्ष लीप वर्ष असते.
उदा., सन 1600, 2000 ही लीप वर्षे आहेत; परंतु सन 1700 1800 1900 ही लीप वर्षे नाहीत,
(3) कोणत्याही वारी येणाऱ्या क्रमवार तारखा अभ्यासा.
उदा., जानेवारी 2015 मध्ये दिनांक 2 रोजी शुक्रवार आहे. त्यानंतरचे जानेवारीचे सर्व शुक्रवार 9, 16, 23 व 30 या तारखांना येतात. दर 7 दिवसांनी तोच वार येतो, हे लक्षात ठेवा.
(4) वर्षातील सात महिने 31 दिवसांचे, 4 महिने 30 दिवसांचे व फेब्रुवारी महिना 28 किंवा 29 दिवसांचा असतो.
जुलै व ऑगस्ट हे लागोपाठ येणारे दोन महिने 31 दिवसांचे असतात, लीप वर्षी फेब्रुवारी महिना 29 दिवसांचा असतो.
(5) लीप वर्ष नसलेल्या एखादया वर्षीच्या पहिल्या दिवशी म्हणजे जानेवारी रोजी जो वार असतो. तोच वार त्या वर्षांच्या शेवटच्या दिवशी 31 डिसेंबर रोजी असतो. मात्र लीप वर्ष असल्यास पुढचा वार येतो.

        🙏 धन्यवाद!🙏

या उपक्रमाबाबत दररोजचे अपडेट आणि माहिती मिळविण्यासाठी खालील Social Media Icon वर करून आजच आमचा ग्रुप जॉईन करा.   

       


सदर उपक्रमातील सर्व सराव चाचणी प्रश्न पत्रिका मिळविण्यासाठी येथे क्लिक करा. 

Find All Practice Test Here 





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please do not enter any spam link in the comment box.