इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेची ऑनलाइन सराव प्रश्नपत्रिका मालिका
विद्यार्थी मित्रांनो,  
आपण सर्वजण दि. १२ फेब्रुवारी २०२३ रोजी होणाऱ्या इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करत आहात. या तयारीमध्ये आपणास मदत म्हणून आम्ही दि. १२ डिसेंबर २०२२ पासून ऑनलाइन सराव प्रश्नपत्रिका उपक्रम सुरू केला आहे. रोज तुम्हाला एका विषयाच्या एका घटकावर सराव चाचणी दिली जाते. सोबत त्या घटकाच्या मार्गदर्शन व्हिडिओची लिंक दिली आहे. तो पाहून आपण सराव प्रश्नपत्रिका सोडवू शकता. यामुळे आपला सराव होईल आणि शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी होईल.
आपण सर्वजण दि. १२ फेब्रुवारी २०२३ रोजी होणाऱ्या इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करत आहात. या तयारीमध्ये आपणास मदत म्हणून आम्ही दि. १२ डिसेंबर २०२२ पासून ऑनलाइन सराव प्रश्नपत्रिका उपक्रम सुरू केला आहे. रोज तुम्हाला एका विषयाच्या एका घटकावर सराव चाचणी दिली जाते. सोबत त्या घटकाच्या मार्गदर्शन व्हिडिओची लिंक दिली आहे. तो पाहून आपण सराव प्रश्नपत्रिका सोडवू शकता. यामुळे आपला सराव होईल आणि शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी होईल.
So be ready for this. 
दिवस सहविसावा सराव चाचणी - 38
दि. 09/01/2023
विषय -  गणित 
घटक - मापन / महत्वमापन - दशमान परिमाणे, कालमापन व दिनदर्शिका
मार्गदर्शन व्हिडिओची लिंक 
सराव चाचणी प्रश्नपत्रिका लिंक
सराव चाचणी प्रश्नपत्रिका लिंक
वरील घटकावरील प्रश्न सोडविताना खालील बाबींचा नक्की अभ्यास करा.
महत्त्वाचे मुद्दे......  
मापन / महत्त्वमापन - 
✅ दशमान परिमाणे
1. लांबी -
(1) लांबी (अंतर) मोजण्याचे मीटर हे प्रमाणित एकक आहे.
(2) 1 किलोमीटर = 1000 मीटर (मी) 
      1 मीटर = 100 सेंटिमीटर (सेमी) 
      1 सेंटिमीटर -10 मिलिमीटर (मिमी)
(3) पाव किमी = 0.25 किमी  किंवा 250 मी
      अर्धा किमी = 0.500 किमी किंवा 500 मी
      पाऊण किमी = 0.750 किमी किंवा 750 मी
(4) जेवढे हजार मीटर तेवढे किलोमीटर असतात आणि जेवढे किलोमीटर तेवढे हजार मीटर असतात. 
(5) लांबीच्या एककांवर बेरीज-वजाबाकी यांसारख्या क्रिया करताना वरील सूत्रे उपयुक्त ठरतात.
2. वस्तुमान -
(1) किलोग्रॅम हे वस्तुमानाचे प्रमाणित एकक आहे.
(2) 1 किलोग्रॅम= 1000 ग्रॅम 
      1 ग्रॅम = 1000 मिलिग्रॅम
      1 क्विटल = 100 किलोग्रॅम
(3) पाव किलोग्रॅम = 0.25 किलोग्रॅम= 250 ग्रॅम
      अर्धा किलोग्रॅम = 0.500 किलोग्रॅम = 500 ग्रॅम
      पाऊण किलोग्रॅम = 0.750 किलोग्रॅम = 750 ग्रॅम.
(4) जेवढे हजार ग्रॅम तेवढे किलोग्रॅम आणि जेवढे किलोग्रॅम तेवढे हजार ग्रॅम.
3. धारकता -
(1) लीटर हे धारकता मोजण्याचे प्रमाणित एकक आहे. 
(2) 1 लीटर = 1000 मिलिलीटर
      1000 मिली = 1 ली.
(3) जेवढे लीटर तेवढे हजार मिलिलीटर आणि जेवढे हजार मिलिलीटर तेवढे लीटर असतात.
(4) पाव ली = 0.250 ली= 250 मिली.
     अर्घा ली = 0.500 ली = 500 मिली. 
     पाऊण ली = 0.750 ली= 750 मिली
✅ कालमापन -
(1) तास, मिनिटे, सेकंद ही कालमापनाची एकके आहेत. 
1 तास = 60 मिनिटे 
1 मिनिट 60 सेकंद
1 तास = 60 x 60 = 3600 सेकंद 
पाव तास = 15 मिनिटे 
अर्धा तास = 30 मिनिटे
पाऊण तास = 45 मिनिटे
(2) 12 ताशी कालमापन पद्धती :
दुपारचे 12 वाजले म्हणजे मध्यान्ह झाली आहे असे म्हणतात.
दुपारी 12 पासून रात्री 12 पर्यंतच्या काळास मध्यान्होत्तर काळ ( pm) म्हणतात. 
रात्री 12 पासून दुपारी 12 पर्यंतच्या काळाला मध्यान्हपूर्व काळ (am) म्हणतात. 
सकाळचे 7 वाजून 40 मिनिट ही वेळ मध्यान्हपूर्व 7:40 किंवा 7:40 am अशी दाखवतात, तर संध्याकाळचे 7 वाजून 40 मिनिटे ही वेळ मध्यान्होत्तर 7:40 किंवा 7.40 pm अशी दाखवतात.
(3) 24 ताशी कालमापन पद्धती :
या पद्धतीत दुपारी 12 च्या पुढे मध्यान्होत्तर 1 वाजला असता, (12 + 1) = 13 वाजले आहेत अस म्हणतात. मध्यान्होत्तर 5 वाजले असता (12 + 5) = 17 वाजले आहेत असे म्हणतात.
(4) तास व मिनिटांची बेरीज-वजाबाकी:
(a) बेरीज : तास व मिनिटे यांची बेरीज करताना मिनिटांची बेरीज 60 पेक्षा जास्त झाल्यास त्या मिनिटांची तास व मिनिटे अशी विभागणी करतात व तास हातचे घेऊन तासांत मिळवतात.
उदा., 3 तास 55 मिनिटे + 2 तास 11 मिनिटे 5 तास 66 मिनिटे
= 5 तास + 1 तास 6 मिनिटे 
= 6 तास 6 मिनिटे.
(b) वजाबाकी तास व मिनिटे दाखवणाऱ्या संख्यांची वजाबाकी करताना, काही वेळा तासातील 1 तास हातचा घेऊन त्याची 60 मिनिटे करतात व ती दिलेल्या मिनिटांत मिळवतात आणि वजाबाकी करतात.
उदा., 7 तास 10 मिनिटे 3 तास 25 मिनिटे 
= 6 तास 70 मिनिटे - 3 तास 25 मिनिटे 
= 3 तास 45 मिनिटे.
✅ दिनदर्शिका -
(1) इंग्रजी व सौर वर्षाच्या महिन्यातील दिवसांची संख्या लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
(2) लीप वर्ष - ज्या वर्षांच्या संख्येला 4 ने पूर्ण भाग जातो, ते लीप वर्ष असते. 
उदा., 1996, 2000, 2004, 2008, 2012 ही लीप वर्ष आहेत. 
ज्या शतक वर्षांच्या संख्येला 400 ने पूर्ण भाग जातो, ते शतक वर्ष लीप वर्ष असते.
उदा., सन 1600, 2000 ही लीप वर्षे आहेत; परंतु सन 1700 1800 1900 ही लीप वर्षे नाहीत,
(3) कोणत्याही वारी येणाऱ्या क्रमवार तारखा अभ्यासा.
उदा., जानेवारी 2015 मध्ये दिनांक 2 रोजी शुक्रवार आहे. त्यानंतरचे जानेवारीचे सर्व शुक्रवार 9, 16, 23 व 30 या तारखांना येतात. दर 7 दिवसांनी तोच वार येतो, हे लक्षात ठेवा.
(4) वर्षातील सात महिने 31 दिवसांचे, 4 महिने 30 दिवसांचे व फेब्रुवारी महिना 28 किंवा 29 दिवसांचा असतो.
जुलै व ऑगस्ट हे लागोपाठ येणारे दोन महिने 31 दिवसांचे असतात, लीप वर्षी फेब्रुवारी महिना 29 दिवसांचा असतो.
(5) लीप वर्ष नसलेल्या एखादया वर्षीच्या पहिल्या दिवशी म्हणजे जानेवारी रोजी जो वार असतो. तोच वार त्या वर्षांच्या शेवटच्या दिवशी 31 डिसेंबर रोजी असतो. मात्र लीप वर्ष असल्यास पुढचा वार येतो.
        🙏 धन्यवाद!🙏



 
 
 
 
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please do not enter any spam link in the comment box.