Breaking

रविवार, ८ जानेवारी, २०२३

शिष्यवृत्ती परीक्षा सराव चाचणी मालिका | सराव चाचणी क्र 36 | बुद्धिमत्ता चाचणी | गटाशी जुळणारे पद

           

इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेची ऑनलाइन सराव प्रश्नपत्रिका मालिका

Scholarship Practice Test
विद्यार्थी मित्रांनो, 
आपण सर्वजण दि. १२ फेब्रुवारी २०२३ रोजी होणाऱ्या इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करत आहात. या तयारीमध्ये आपणास मदत म्हणून आम्ही दि. १२ डिसेंबर २०२२ पासून नलाइन सराव प्रश्नपत्रिका उपक्रम सुरू केला आहे. रोज तुम्हाला एका विषयाच्या एका घटकावर सराव चाचणी दिली जाते. सोबत त्या घटकाच्या मार्गदर्शन व्हिडिओची लिंक दिली आहे. तो पाहून आपण सराव प्रश्नपत्रिका सोडवू शकता. यामुळे आपला सराव होईल आणि शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी होईल. 
So be ready for this.

दिवस चौविसावा  सराव चाचणी - 36
दि. 08/01/2023
विषय -  बुद्धिमत्ता चाचणी  
घटक - गटाशी जुळणारे पद

मार्गदर्शन व्हिडिओची लिंक 

सराव चाचणी प्रश्नपत्रिका लिंक


सराव प्रश्नपत्रिका येथे सोडवा.

वरील घटकावरील प्रश्न सोडविताना खालील बाबींचा नक्की अभ्यास करा.
महत्त्वाचे मुद्दे ...... 

गटाशी जुळणारे पद
आपल्या अवतीभवती असलेल्या वेगवेगळ्या वस्तूमध्ये काही सारखेपणा शोधून आपण त्यांचे गट असतो. थोडक्यात, या पद्धतीने आपण वस्तूचे वेगवेगळ्या गटांत वर्गीकरण करतो. यामुळे एखादी नवीन वस्तू कोणत्या वस्तुगटाशी सारखेपणा दाखवते, हे शोधून त्या गटात त्या वस्तूचा समावेश आपल्याला करता येतो. या घटकाद्वारे विद्यार्थ्यांच्या याच क्षमतेची कसोटी घेतली जाते. 
या घटकात (1) शब्दसंग्रह (2) आकृत्या (3) संख्या यांवर आधारित प्रश्न विचारले जातात. 

1: शब्दसंग्रह : या उपघटकातील प्रश्नांत काही सारखेपणा असणाऱ्या वस्तू किंवा बाबी दर्शवणाऱ्या शब्दांचा गट दिलेला असतो. भाज्या, फळे, फुले, व्यक्ती, रंग, वाहने, वार, महिने, ऋतू, दिशा वगैरे कोणत्याही बाबींचा या गटांत समावेश असतो. दिलेल्या पर्यायांतील एका शब्दातून या गटाशी जुळणाऱ्या वस्तूचा बोध होतो. हा शब्द विद्यार्थ्यांनी निवडायचा असतो.
उपयुक्त टीप : गटातील वस्तूंमध्ये रंग, रूप, आकार, चव, वास वगैरे गुणांच्या बाबतीत सारखेपणा शोधावा आणि असाच गुण दर्शवणारी वस्तू पर्यायांतून निवडावी.

2: आकृत्या : या उपघटकातील प्रश्नांमध्ये आकृत्यांचा एक गट दिलेला असतो. या आकृत्यामध्ये कोणत्यातरी बाबतीत साम्य असते. असेच साम्य दर्शवणारी आकृती पर्यायांतून निवडायची असते. 
उपयुक्त टीप : दिलेल्या आकृत्यांमधील आकार, रेषा, त्यांच्या दिशा, आकृत्यांत वापरलेली चिन्हे, त्यांच्या संख्या, आकृत्याचे पाडलेले भाग अशा बाबींतील सारखेपणा निरीक्षण करून शोधून काढावा.

3: संख्या : या उपघटकातील प्रश्नात काही संख्यांचा एक गट दिलेला असतो. या संख्यांमध्ये विशिष्ट बाबतीत साम्य असते हे साम्य शोधून असेच साम्य दाखवणारी संख्या पर्यायांतून निवडायची असते. 
उपयुक्त टीप : दिलेल्या गटातील सर्व संख्या सम, विषम, मूळ संख्या, वर्गसंख्या, घनसंख्या, त्रिकोणी (संख्या अशा कोणत्याही प्रकारच्या असू शकतात. याच प्रकारची संख्या पर्यायांतून निवडावी.

        🙏 धन्यवाद!🙏

या उपक्रमाबाबत दररोजचे अपडेट आणि माहिती मिळविण्यासाठी खालील Social Media Icon वर करून आजच आमचा ग्रुप जॉईन करा.   

       


सदर उपक्रमातील सर्व सराव चाचणी प्रश्न पत्रिका मिळविण्यासाठी येथे क्लिक करा. 

Find All Practice Test Here 





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please do not enter any spam link in the comment box.