Breaking

गुरुवार, १२ जानेवारी, २०२३

शिष्यवृत्ती परीक्षा सराव चाचणी मालिका | सराव चाचणी क्र 43 | बुद्धिमत्ता चाचणी | भावनिक व सामाजिक बुद्धिमत्ता

 इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेची ऑनलाइन सराव प्रश्नपत्रिका मालिका

Scholarship Practice Test
विद्यार्थी मित्रांनो, 
आपण सर्वजण दि. १२ फेब्रुवारी २०२३ रोजी होणाऱ्या इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करत आहात. या तयारीमध्ये आपणास मदत म्हणून आम्ही दि. १२ डिसेंबर २०२२ पासून नलाइन सराव प्रश्नपत्रिका उपक्रम सुरू केला आहे. रोज तुम्हाला एका विषयाच्या एका घटकावर सराव चाचणी दिली जाते. सोबत त्या घटकाच्या मार्गदर्शन व्हिडिओची लिंक दिली आहे. तो पाहून आपण सराव प्रश्नपत्रिका सोडवू शकता. यामुळे आपला सराव होईल आणि शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी होईल. 
So be ready for this.

दिवस चौविसावा  सराव चाचणी - 43
दि. 12/01/2023
विषय -  बुद्धिमत्ता चाचणी  
घटक - भावनिक व सामाजिक बुद्धिमत्ता

मार्गदर्शन व्हिडिओची लिंक 

सराव चाचणी प्रश्नपत्रिका लिंक

सराव प्रश्नपत्रिका येथे सोडवा.

वरील घटकावरील प्रश्न सोडविताना खालील बाबींचा नक्की अभ्यास करा.

महत्त्वाचे मुद्दे ...... 

 विशेष प्रश्न :
दैनंदिन व्यवहारात आपल्याला अनेक वेळा वेगवेगळे निर्णय घ्यावे लागतात. काही वेळा हे निर्णय घेताना आपला गोंधळ उडतो. काही वेळा निर्णय घेतल्यानंतर आपण दुसरा निर्णय घ्यायला हवा होता असे वाटते आपली निर्णय घेण्याची प्रक्रिया कशी आहे. यावर हे अवलंबून असते. निर्णय घेताना सारासार विवेकबुद्धीचा वापर केला. आपल्या वागण्या बोलण्यात त्याचा अवलंब केला तर त्याचे परिणाम हितकारक ठरतात निर्णय घेण्याच्या प्रक्रियेवर आपण जोपासलेली मूल्ये प्रभाव टाकत असतात, त्यामुळे हा घटक मूल्यशिक्षणाशी निगडीत आहे, असे म्हणता येईल. या घटकामध्ये विद्यार्थ्यांच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेची चाचणी घेतली जाते.

1 : भावनिक बुद्धिमत्ता : या उपघटकामध्ये आपल्या व्यक्तिगत आयुष्याशी संबंधित घटनांमध्ये आपण कसा निर्णय घेतो. यावर आधारित प्रश्न विचारलेले असतात. अशा घटनांमुळे आपल्या मनातील भावना प्रबळ होऊन आपले वैयक्तिक नुकसान होण्याची शक्यता जास्त असते, यातील प्रश्नांत नकारात्मक वागण्याचे पर्याय दिलेले असतात त्याच्यामुळे होणारे नुकसान ओळखणे विद्यार्थ्याकडून अपेक्षित असते,
उपयुक्त टीप : कोणत्या पर्यायातील वागणे अवलंबले तर आपण शिकलेली मूल्ये जोपासली जातील, हे पाहावे.

2 : सामाजिक बुद्धिमत्ता : या उपघटकामध्ये समाजात वावरताना, संपर्कात येणाऱ्या लोकांशी आपले वागणे कसे असायला हवे, याच्याशी संबंधित प्रश्न विचारले जातात. आपले वागणे समाजाला हितकारक असणे अपेक्षित असते. हाच उद्देश लक्षात ठेवून एखादया सामाजिक परिस्थितीबाबत सकारात्मक भूमिका घेण्याचा पर्याय आपण निवडायला हवा.
उपयुक्त टीप : सामाजिक मूल्याविषयीचे ज्ञान परिसर अभ्यास विषयाच्या पुस्तकातून घ्यावे.

        🙏 धन्यवाद!🙏

या उपक्रमाबाबत दररोजचे अपडेट आणि माहिती मिळविण्यासाठी खालील Social Media Icon वर करून आजच आमचा ग्रुप जॉईन करा.   

       


सदर उपक्रमातील सर्व सराव चाचणी प्रश्न पत्रिका मिळविण्यासाठी येथे क्लिक करा. 

Find All Practice Test Here 





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please do not enter any spam link in the comment box.