Breaking

गुरुवार, १२ जानेवारी, २०२३

शिष्यवृत्ती परीक्षा सराव चाचणी मालिका | सराव चाचणी क्र 44 | गणित | भूमिती - कोन व त्याचे प्रकार, समांतर व लंब रेषा, त्रिकोण, चौरस, आयत

  

इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेची ऑनलाइन सराव प्रश्नपत्रिका मालिका

Scholarship Practice Test
विद्यार्थी मित्रांनो,  
आपण सर्वजण दि. १२ फेब्रुवारी २०२३ रोजी होणाऱ्या इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करत आहात. या तयारीमध्ये आपणास मदत म्हणून आम्ही दि. १२ डिसेंबर २०२२ पासून नलाइन सराव प्रश्नपत्रिका उपक्रम सुरू केला आहे. रोज तुम्हाला एका विषयाच्या एका घटकावर सराव चाचणी दिली जाते. सोबत त्या घटकाच्या मार्गदर्शन व्हिडिओची लिंक दिली आहे. तो पाहून आपण सराव प्रश्नपत्रिका सोडवू शकता. यामुळे आपला सराव होईल आणि शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी होईल.
So be ready for this. 

दिवस सहविसावा सराव चाचणी - 44
दि. 12/01/2023

विषय -  गणित 
घटक - भूमिती - कोन व त्याचे प्रकार, समांतर व लंब रेषा, त्रिकोण, चौरस, आयत  

मार्गदर्शन व्हिडिओची लिंक 

सराव चाचणी प्रश्नपत्रिका लिंक


सराव प्रश्नपत्रिका येथे सोडवा.

वरील घटकावरील प्रश्न सोडविताना खालील बाबींचा नक्की अभ्यास करा.

महत्त्वाचे मुद्दे......  
भूमिती -

कोनाचे प्रकार :
👉 काटकोन : ज्या कोनाचे माप 90° असते. त्या कोनास काटकोन म्हणतात.
👉 लघुकोन : ज्या कोनाचे माप 0° पेक्षा जास्त व 90° पेक्षा कमी असते. त्यास लघुकोन असे म्हणतात.
👉 विशालकोन : ज्या कोनाचे माप 90° पेक्षा जास्त व 180° पेक्षा कमी असते, त्यास विशालकोन असे म्हणतात.

समांतर रेषा :
👉एकाच प्रतलातील परस्परांना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा असे म्हणतात. 
👉समांतर रेषा कोणत्याही बाजुला कितीही वाढवल्या तरी एकमेकांना छेदत नाहीत.
👉वहीच्या पानावरील आडव्या ओळी, मोजपट्टीच्या समोरासमोरील कडा ही समांतर रेषांची उदाहरणे आहेत.

लंब रेषा :
👉जेव्हा एकमेकांना छेदणाऱ्या दोन रेषा परस्परांशी काटकोन करतात, तेव्हा त्या रेषा परस्परांना लंब आहेत असे म्हणतात. म्हणजेच त्या दोन रेषा लंब रेषा आहेत. 
👉फळ्याच्या लगतच्या कडा, वहीवरील आडव्या रेघा व समासाची उभी रेघ या लंब रेषा आहेत.

त्रिकोण :
👉तीन बाजूंनी बंदिस्त असलेल्या आकृतीस त्रिकोण असे म्हणतात.
👉त्रिकोणाला तीन बाजू, तीन शिरोबिंदू व तीन कोन असतात. 
👉त्रिकोणाचे नाव सहा प्रकारे सांगता येते.

चौरस :
👉चार समान लांबीच्या बाजूनी बंदिस्त असलेल्या आकृतीस चौरस असे म्हणतात. 
👉चौरसाला चार बाजू व चार शिरोबिंदू असतात.
👉चौरसाच्या चारही बाजूंची लांबी समान असते.
👉चौरसाचे चारही कोन काटकोन असतात. 
👉चौकोनाचे नाव घटिवत किंवा प्रतिघटिवत पद्धतीने सांगता येते.

आयत :
👉चौरसाप्रमाणेच आयत ही चार बाजूनी बंदिस्त असलेली आकृती आहे.
👉आयताला चार बाजू व चार शिरोबिंदू असतात.
👉आयताच्या समोरासमोरील बाजू समान लांबीच्या असतात.
👉आयताचे चारही कोन काटकोन असतात.

चौकोन :
👉चार बाजूंनी बंदिस्त असलेल्या आकृतीस चौकोन असे म्हणतात.
👉चौकोनाला चार बाजू व चार शिरोबिंदू असतात.

        🙏 धन्यवाद!🙏

या उपक्रमाबाबत दररोजचे अपडेट आणि माहिती मिळविण्यासाठी खालील Social Media Icon वर करून आजच आमचा ग्रुप जॉईन करा.   

       


सदर उपक्रमातील सर्व सराव चाचणी प्रश्न पत्रिका मिळविण्यासाठी येथे क्लिक करा. 

Find All Practice Test Here 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please do not enter any spam link in the comment box.