Breaking

गुरुवार, ५ जानेवारी, २०२३

शिष्यवृत्ती परीक्षा सराव चाचणी मालिका | सराव चाचणी क्र 30 | गणित | व्यावहारिक गणित - सरळव्याज व शेकडेवारी

         

इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेची ऑनलाइन सराव प्रश्नपत्रिका मालिका

Scholarship Practice Test
विद्यार्थी मित्रांनो, 
आपण सर्वजण दि. १२ फेब्रुवारी २०२३ रोजी होणाऱ्या इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करत आहात. या तयारीमध्ये आपणास मदत म्हणून आम्ही दि. १२ डिसेंबर २०२२ पासून नलाइन सराव प्रश्नपत्रिका उपक्रम सुरू केला आहे. रोज तुम्हाला एका विषयाच्या एका घटकावर सराव चाचणी दिली जाते. सोबत त्या घटकाच्या मार्गदर्शन व्हिडिओची लिंक दिली आहे. तो पाहून आपण सराव प्रश्नपत्रिका सोडवू शकता. यामुळे आपला सराव होईल आणि शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी होईल.
So be ready for this.

दिवस सहविसावा सराव चाचणी - 30 
दि. 05/01/2023

विषय -  गणित 
घटक - व्यावहारिक गणित - सरळव्याज व शेकडेवारी

मार्गदर्शन व्हिडिओची लिंक 

सराव चाचणी प्रश्नपत्रिका लिंक

सराव प्रश्नपत्रिका येथे सोडवा.

वरील घटकावरील प्रश्न सोडविताना खालील बाबींचा नक्की अभ्यास करा.

महत्त्वाचे मुद्दे......  

शेकडेवारी
(1) शेकडा म्हणजे 100 % ही शेकडेवारीची खूण आहे. ती 'टक्के' अशी वाचतात. शेकडेवारीला शतमान अथवा टक्केवारी असेही म्हणतात.
(2) शतमान हा एक प्रकारचा अपूर्णांक आहे. या अपूर्णांकात छेद नेहमी 100 असतो.
 100 पैकी 58 भाग. 58% याचा अर्थ 0.58 असाही होतो.
(3) शेकडेवारीचे अपूर्णांकात रूपांतर करता येते.
(4) दिलेल्या अपूर्णांकाचे शतमानात (शेकडेवारीत) रूपांतर करता येते. त्यासाठी दिलेल्या अपूर्णांकाचे छेद 100 असणाऱ्या समच्छेद अपूर्णांकात रूपांतर करावे लागते.
(5) दोन बाबींची तुलना करण्यासाठी त्या दोन्ही बाबींसाठी एक सामाईक परिमाण घेणे आवश्यक असते. अशा वेळी 100 हे परिमाण घेऊन तुलना केली जाते.
(6) वाढ, घट, नफा, तोटा, दलाली, कमिशन इत्यादी बाबी शतमानात सांगतात. 
(7) एखादया संख्येची टक्केवारी काढताना त्या संख्येला दिलेल्या टक्क्यांनी गुणतात.
(8) शतमानावरील प्रश्न चटकन सोडवता येण्यासाठी अपूर्णांक व शतमान यांचे एकमेकांत लगेच रूपांतर करता येणे जरूर आहे. त्यासाठी पुढील सारणीचा अभ्यास करा व लक्षात ठेवा :

सरळव्याज
(1) बँक ठेवीदारांना बँकेत रक्कम ठेवल्याबद्दल जो मोबदला देते, त्याला व्याज असे म्हणतात. ठेवीदारांनी ठेवलेली रक्कम बँक विविध कामांसाठी वापरते व त्याचा मोबदला म्हणून ठेवीदाराला व्याज देते. त्याचप्रमाणे गरजू व्यक्ती बँकेकडून कर्ज घेऊन ते स्वत:च्या कामाकरता वापरतात. त्याबद्दल मोबदला म्हणून ते बँकेला व्याज देतात. (स)
(2) ठेवीदाराने/खातेधारकाने बँकेत ठेवलेल्या किंवा बँकेकडून कर्ज घेतलेल्या रकमेला मुद्दल असे म्हणतात. (म)
(3) हे मुद्दल ज्या कालावधीसाठी वापरले जाते, त्या कालावधीस मुदत (काळ) असे म्हणतात. (क) 
(4) प्रत्येक 100 मुद्दलासाठी 1 एकक कालावधी (मुदती) साठी मोबदला आकारण्याचा जो दर असतो, द.सा.द.शे. 8 याचा अर्थ एक वर्षासाठी 100 मुद्दलाचा मोबदला आकारणीचा दर 8 आहे. त्याला व्याजाचा दर असे म्हणतात. (द)
(5) एका विशिष्ट मुद्दलावरील ठरावीक मुदतीचे व्याज व ते मुद्दल मिळून होणाऱ्या रकमेस रास असे म्हणतात. रास मुद्दल + व्याज. =
(6) सरळव्याजाचे सूत्र 
व्याज = मुद्दल x दर x मुदत
             ---------------------
                      100
(7) 'दामदुप्पट होणे' म्हणजे मुद्दलाइतके व्याज होणे. दामदुप्पट झाली असता रास मुद्दलाच्या दुप्पट होते...


        🙏 धन्यवाद!🙏

या उपक्रमाबाबत दररोजचे अपडेट आणि माहिती मिळविण्यासाठी खालील Social Media Icon वर करून आजच आमचा ग्रुप जॉईन करा.   

       


सदर उपक्रमातील सर्व सराव चाचणी प्रश्न पत्रिका मिळविण्यासाठी येथे क्लिक करा. 

Find All Practice Test Here 





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please do not enter any spam link in the comment box.