इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेची ऑनलाइन सराव प्रश्नपत्रिका मालिका
विद्यार्थी मित्रांनो,
आपण सर्वजण दि. १२ फेब्रुवारी २०२३ रोजी होणाऱ्या इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करत आहात. या तयारीमध्ये आपणास मदत म्हणून आम्ही दि. १२ डिसेंबर २०२२ पासून ऑनलाइन सराव प्रश्नपत्रिका उपक्रम सुरू केला आहे. रोज तुम्हाला एका विषयाच्या एका घटकावर सराव चाचणी दिली जाते. सोबत त्या घटकाच्या मार्गदर्शन व्हिडिओची लिंक दिली आहे. तो पाहून आपण सराव प्रश्नपत्रिका सोडवू शकता. यामुळे आपला सराव होईल आणि शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी होईल.

So be ready for this.
दिवस पंचविसावा सराव चाचणी - 29
दि. 05/01/2023
विषय - मराठी
घटक - शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व - समानार्थी, विरुद्धार्थी शब्द, जोडशब्द, शब्दकोडी
मार्गदर्शन व्हिडिओची लिंक
सराव चाचणी प्रश्नपत्रिका लिंक
सराव चाचणी प्रश्नपत्रिका लिंक
वरील घटकावरील प्रश्न सोडविताना खालील बाबींचा नक्की अभ्यास करा.
महत्त्वाचे मुद्दे......
✅ शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व - समानार्थी शब्द
🔴 मराठी भाषेत पुष्कळदा एका शब्दासाठी त्याच अर्थाचा दुसरा शब्द वापरला जातो. त्यामुळे आपल्या शब्द संपत्तीमध्ये भर पडते. अशा समानार्थी शब्दांचा स्वतंत्र संग्रह करून ठेवण्याची सवय शालेय वयात लावून घ्या. त्याचा अभ्यास करा.
🔴 एका शब्दासाठी त्याच अर्थाचा दुसरा शब्द वापरला जातो. अशा शब्दाला समान अर्थाचा शब्द म्हणतात.
*उदा* . आई - माय, माऊली, माता, जननी
✅ विरुद्धार्थी शब्द
🔴 मराठी भाषेत काही समानार्थी शब्द असतात. बऱ्याचशा शब्दांना विरुद्ध अर्थ दर्शवणारे शब्द असतात. त्यांचा वापर बोलण्यात होतो.
🔴 भाषेचा अभ्यास करताना असे काही शब्द नजरेस पडतात त्यांचा अर्थ जाणून घेऊन संग्रह करण्याची वृत्ती जोपासा.
✅ शब्दकोडी
🔴 योग्य अक्षराची किंवा अक्षर समूहाची निवड करून नवीन अर्थपूर्ण शब्द बनवणे, असे या उपघटकामध्ये अपेक्षित आहे.
🔴 सर्व पर्यायांमधील अक्षरांचा वापर करून शब्द तयार करून बघावेत मगच योग्य पर्याय निवडावा.
✅ जोडशब्द
🔴 जोडशब्द याचा अर्थ जोडीने येणारे शब्द. हे जोडशब्द अनेक प्रकारचे असतात.
🔴 एकाच शब्दाची पुनरावृत्ती असलेले जोडशब्द. उदा. हिरवेहिरवे
🔴 एक शब्द अर्थपूर्ण व दुसरा निरर्थक असलेले जोडशब्द. उदा. ओबडधोबड
🔴 दोन वेगळी पण एकाच गटातील नामे एकत्र येऊन जोडशब्द तयार होतात. उदा. शंखशिंपले
🔴 एकाच अर्थाचे दोन शब्द एकत्र येऊन जोडशब्द तयार होतात. उदा. पांढराशुभ्र
🙏 धन्यवाद!🙏
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please do not enter any spam link in the comment box.