Breaking

बुधवार, ४ जानेवारी, २०२३

शिष्यवृत्ती परीक्षा सराव चाचणी मालिका | सराव चाचणी क्र 28 | बुद्धिमत्ता चाचणी | समान पद ओळखा

         

इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेची ऑनलाइन सराव प्रश्नपत्रिका मालिका

Scholarship Practice Test
विद्यार्थी मित्रांनो, 
आपण सर्वजण दि. १२ फेब्रुवारी २०२३ रोजी होणाऱ्या इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करत आहात. या तयारीमध्ये आपणास मदत म्हणून आम्ही दि. १२ डिसेंबर २०२२ पासून नलाइन सराव प्रश्नपत्रिका उपक्रम सुरू केला आहे. रोज तुम्हाला एका विषयाच्या एका घटकावर सराव चाचणी दिली जाते. सोबत त्या घटकाच्या मार्गदर्शन व्हिडिओची लिंक दिली आहे. तो पाहून आपण सराव प्रश्नपत्रिका सोडवू शकता. यामुळे आपला सराव होईल आणि शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी होईल.
So be ready for this.

दिवस चौविसावा  सराव चाचणी - 28
दि. 04/01/2023
विषय -  बुद्धिमत्ता चाचणी  
घटक - समान पद ओळखा.

मार्गदर्शन व्हिडिओची लिंक 

सराव चाचणी प्रश्नपत्रिका लिंक

सराव प्रश्नपत्रिका येथे सोडवा.

वरील घटकावरील प्रश्न सोडविताना खालील बाबींचा नक्की अभ्यास करा.
महत्त्वाचे मुद्दे ...... 

समान पद ओळखणे :  एखादी वस्तू दुसऱ्या एखाद्या वस्तूशी हुबेहूब जुळते, हे त्या वस्तूचे सूक्ष्म निरीक्षण केल्यावर आपल्या लात येते. या घटकाद्वारे असे निरीक्षण करण्याची विद्यार्थ्याची क्षमता तपासली जाते.

समान पद ओळखणे - आकृत्या : या उपघटकातील प्रत्येक प्रश्नात एक प्रश्नआकृती दिलेली असते. विद्यार्थ्यांनी या प्रश्नआकृतीशी हुबेहूब जुळणारी आकृती उत्तर आकृत्यांमधून निवडायची असते.

उपयुक्त टिपा : समान पद ओळखण्यासाठी विदयार्थ्याने पुढील पायऱ्यांचा अवलंब करणे आवश्यक आहे.
✅ प्रथम प्रश्न आकृतीची बाह्य रचना प्रत्येक पर्यायाशी जुळवून पाहा ज्या पर्यायातील आकृतीची रचना जुळत नाही, तो पर्याय वगळा.
✅ यानंतर प्रश्न आकृतीच्या आतील व बाहेरील चिन्हे लक्षात घ्या. एकावेळी एक चिन्ह निवडा व त्याचे स्थान ज्या पर्यायांमध्ये बदललेले आहे, ते पर्याय वगळा. या प्रकारे टप्प्याटप्प्याने निरीक्षण केल्यास विद्यार्थ्याला अचूक उत्तरआकृतीपर्यंत पोहोचणे सोपे जाते.

        🙏 धन्यवाद!🙏

या उपक्रमाबाबत दररोजचे अपडेट आणि माहिती मिळविण्यासाठी खालील Social Media Icon वर करून आजच आमचा ग्रुप जॉईन करा.   

       


सदर उपक्रमातील सर्व सराव चाचणी प्रश्न पत्रिका मिळविण्यासाठी येथे क्लिक करा. 

Find All Practice Test Here 





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please do not enter any spam link in the comment box.