इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेची ऑनलाइन सराव प्रश्नपत्रिका मालिका
विद्यार्थी मित्रांनो,
आपण सर्वजण दि. १२ फेब्रुवारी २०२३ रोजी होणाऱ्या इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करत आहात. या तयारीमध्ये आपणास मदत म्हणून आम्ही दि. १२ डिसेंबर २०२२ पासून ऑनलाइन सराव प्रश्नपत्रिका उपक्रम सुरू केला आहे. रोज तुम्हाला एका विषयाच्या एका घटकावर सराव चाचणी दिली जाते. सोबत त्या घटकाच्या मार्गदर्शन व्हिडिओची लिंक दिली आहे. तो पाहून आपण सराव प्रश्नपत्रिका सोडवू शकता. यामुळे आपला सराव होईल आणि शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी होईल.

So be ready for this.
दिवस एकविसावा सराव चाचणी - 21
दि. 01/01/2023
विषय - मराठी
घटक - भाषेचा व्यवहारात उपयोग - म्हणी व वाक्प्रचार
मार्गदर्शन व्हिडिओची लिंक
सराव चाचणी प्रश्नपत्रिका लिंक
सराव चाचणी प्रश्नपत्रिका लिंक
वरील घटकावरील प्रश्न सोडविताना खालील बाबींचा नक्की अभ्यास करा.
महत्त्वाचे मुद्दे......
✅ भाषेचा व्यवहारात उपयोग
वाक्प्रचार
✅ वाक्प्रचार हा असा शब्दसमूह आहे की त्यातील शब्दांपासून नेहमीच्या अर्थापेक्षा एक वेगळाच अर्थ प्राप्त होतो.
उदा., शोभाताईंनी त्यांच्या कौस्तुभला डोक्यावर बसवून ठेवल्यामुळे, दिवसेंदिवस तो अधिकच हट्टी होत चालला आहे.
वरील वाक्यातील 'डोक्यावर बसवून ठेवणे' याचा अर्थ ' डोक्यावर बसवणे' असा शब्दश: (सरळ)अर्थ न होता तर शेफारून ठेवणे', लायकीपेक्षा अधिक महत्त्व देणे' असा होतो.
✅ वाक्प्रचाराच्या वापरामुळे भाषा परिणामकारक होते, भाषेला सौंदर्य प्राप्त होते.
म्हणी
✅ म्हणी हा सुद्धा असा शब्दसमुह आहे की त्यातील शब्दांपासून नेहमीच्या अर्थापेक्षा एक वेगळाच अर्थ प्राप्त होतो.
✅ म्हणी म्हणजे अनुभवांच्या खाणी. 'दीर्घकालीन अनुभवावर आधारलेले छोटे, मर्यादित स्वरूपाचे अर्थपूर्ण 'वाक्य' म्हणजे म्हण होय.
✅ ही वाक्ये चटकदार, आटोपशीर व बोधप्रद असतात. म्हणींची रचना यमक , अनुप्रासयुक्त असल्यामुळे त्या लक्षात ठेवणे सोपे जाते. कोणता तरी मोठा आशय अगदी थोडक्यात ; पण परिणामकारक पद्धतीने सूत्रबद्ध | अशा वाक्यात प्रकट करणे, म्हणजे म्हणींचा वापर करणे.
✅ म्हणींमध्ये एक प्रकारची लयबद्धता असल्यामुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होते.
✅ एखाद्या घटनेला अधिक स्पष्टता*येते.
🙏 धन्यवाद!🙏
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please do not enter any spam link in the comment box.