इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेची ऑनलाइन सराव प्रश्नपत्रिका मालिका
विद्यार्थी मित्रांनो,
आपण सर्वजण दि. १२ फेब्रुवारी २०२३ रोजी होणाऱ्या इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करत आहात. या तयारीमध्ये आपणास मदत म्हणून आम्ही दि. १२ डिसेंबर २०२२ पासून ऑनलाइन सराव प्रश्नपत्रिका उपक्रम सुरू केला आहे. रोज तुम्हाला एका विषयाच्या एका घटकावर सराव चाचणी दिली जाते. सोबत त्या घटकाच्या मार्गदर्शन व्हिडिओची लिंक दिली आहे. तो पाहून आपण सराव प्रश्नपत्रिका सोडवू शकता. यामुळे आपला सराव होईल आणि शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी होईल.
आपण सर्वजण दि. १२ फेब्रुवारी २०२३ रोजी होणाऱ्या इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करत आहात. या तयारीमध्ये आपणास मदत म्हणून आम्ही दि. १२ डिसेंबर २०२२ पासून ऑनलाइन सराव प्रश्नपत्रिका उपक्रम सुरू केला आहे. रोज तुम्हाला एका विषयाच्या एका घटकावर सराव चाचणी दिली जाते. सोबत त्या घटकाच्या मार्गदर्शन व्हिडिओची लिंक दिली आहे. तो पाहून आपण सराव प्रश्नपत्रिका सोडवू शकता. यामुळे आपला सराव होईल आणि शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी होईल.
So be ready for this.
दिवस विसावा सराव चाचणी - 20
दि. 31/12/2022
विषय - बुद्धिमत्ता चाचणी
घटक - जलप्रतिबिंब व आरशातील प्रतिमा
मार्गदर्शन व्हिडिओची लिंक
सराव चाचणी प्रश्नपत्रिका लिंक
सराव चाचणी प्रश्नपत्रिका लिंक
वरील घटकावरील प्रश्न सोडविताना खालील बाबींचा नक्की अभ्यास करा.
महत्त्वाचे मुद्दे......
प्रतिबिंब / प्रतिमा
संकल्पना : एखाद्या वस्तूचे प्रतिबिंब (किंवा प्रतिमा) त्या वस्तुसारखेच दिसत असले तरी ते हुबेहूब मात्र नसते. वस्तू आणि तिच्या प्रतिबिंबात फरक करता येणे हा बुद्धिमत्तेचाच एक भाग आहे, या घटकाद्वारे विदयार्थ्याच्या या बुद्धिमत्तेची चाचणी घेतली जाते. या घटकात जलप्रतिबिंब आणि आरशातील प्रतिबिंब / प्रतिमा असे दोन उपघटक आहेत.
प्रतिबिंब - 1: जलप्रतिबिंब
ओळख : या उपघटकामध्ये आकृती (किंवा अक्षरे / अंक) चे प्रतिबिंब पाण्यात कसे दिसेल, हे विद्यार्थ्यान ओळखायचे आहे. आकृतीच्या वरच्या किंवा खालच्या बाजूस आरसा धरल्यास त्या आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंबच आरशात दिसू शकते.
जलप्रतिबिंबासाठी आकृतीच्या खाली किंवा वर अशा तिरप्या रेषा दर्शवलेल्या असतात.
उपयुक्त टीप : जलप्रतिबिंब कसे दिसते, हे सोबतच्या आकृतीवरून विद्यार्थ्यांना समजू शकते. आकृतीचा डावा भाग जलप्रतिबिंबात डाव्या बाजूलाच दिसतो. तसेच उजवा भाग उजवीकडेच दिसतो. परंतु आकृतीचा वरचा भाग जलप्रतिबिबात खाली उलट स्वरूपात दिसतो. तर खालचा भाग उलट स्वरूपात वर दिसतो.
काही अक्षरे व अंक यांचे जलप्रतिबिंब कसे दिसते, हे पुढे दाखवले आहे. (दोन वा अधिक अक्षरे / अंक यांच्या जलप्रतिबिंबात अक्षरे / अंक यांचे स्थान न बदलता केवळ स्थिती बदलते.)
आरशातील प्रतिमा
ओळख : या उपघटकामध्ये आकृती (किंवा अक्षरे / अंक) ची प्रतिमा (प्रतिबिंब) आरशात कशी दिसेल, हैं विद्यार्थ्याने ओळखायचे आहे. आकृतीच्या डाव्या किंवा उजव्या बाजूस आरसा धरल्यास त्या आकृतीचे प्रतिर्विव आपल्याला आरशात दिसू शकते.
आरशातील प्रतिबिंबासाठी आकृतीच्या डावीकडे किंवा उजवीकडे | अशा तिरप्या रेषा दर्शवलेल्या असतात.
उपयुक्त टीप : आरशातील प्रतिबिंब कसे दिसते, है सोबतच्या आकृतीवरून विद्यार्थ्यांना समजू शकते. आकृतीचा वरचा भाग या प्रतिबिंबात वरच्या बाजूलाच दिसतो, तसेच खालचा भाग खालीच दिसतो. परंतु आकृतीचा उजवीकडील भाग प्रतिबिंबात डावीकडे दिसतो, तर डावीकडील भाग प्रतिबिंबात उजवीकडे दिसतो.
काही अक्षरे व अंक यांचे प्रतिबिंब आरशात कसे दिसते, हे पुढे दाखवले आहे. (दोन वा अधिक अक्षरे / अंक यांच्या आरशातील प्रतिबिंबात अक्षरे / अंक यांचे स्थान व स्थिती या दोन्ही गोष्टी बदलतात.)
🙏 धन्यवाद!🙏
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please do not enter any spam link in the comment box.