इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेची ऑनलाइन सराव प्रश्नपत्रिका मालिका
विद्यार्थी मित्रांनो,
आपण सर्वजण दि. १२ फेब्रुवारी २०२३ रोजी होणाऱ्या इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करत आहात. या तयारीमध्ये आपणास मदत म्हणून आम्ही दि. १२ डिसेंबर २०२२ पासून ऑनलाइन सराव प्रश्नपत्रिका उपक्रम सुरू केला आहे. रोज तुम्हाला एका विषयाच्या एका घटकावर सराव चाचणी दिली जाते. सोबत त्या घटकाच्या मार्गदर्शन व्हिडिओची लिंक दिली आहे. तो पाहून आपण सराव प्रश्नपत्रिका सोडवू शकता. यामुळे आपला सराव होईल आणि शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी होईल.

So be ready for this.
दिवस बाविसावा सराव चाचणी - 22
दि. 01/01/2023
विषय - गणित
घटक - अपूर्णांक ओळख
मार्गदर्शन व्हिडिओची लिंक
सराव चाचणी प्रश्नपत्रिका लिंक
सराव चाचणी प्रश्नपत्रिका लिंक
वरील घटकावरील प्रश्न सोडविताना खालील बाबींचा नक्की अभ्यास करा.
महत्त्वाचे मुद्दे......
अपूर्णांक
व्यवहारी अपूर्णांक : समच्छेद व भिन्नछेद अपूर्णांक
(1) समच्छेद अपूर्णांक : ज्या अपूर्णांकांचे छेद समान असतात, त्या अपूर्णांकांना 'समच्छेद अपूर्णांक' म्हणतात.
(2) भिन्नछेद अपूर्णांक : ज्या अपूर्णांकांचे छेद भिन्न असतात, त्या अपूर्णांकांना 'भिन्नछेद अपूर्णांक' म्हणतात.
भिन्नछेद अपूर्णांकांचे समच्छेद अपूर्णांकात रुपांतर :
दिलेल्या अपूर्णांकांचे छेदांवरून त्यांच्या पटीतील संख्या वापरून छेद समान करता येतात.
समच्छेद अपूर्णांक : लहानमोठेपणा (तुलना) : समच्छेद अपूर्णांकांमध्ये, ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा असतो.
सममूल्य अपूर्णांक :
दोन किंवा त्यापेक्षा जास्त अपूर्णांकांची संक्षिप्त किंवा सरळ रूपामध्ये मांडणीनंतर किंमत एकच येत असेल तर त्यास सममूल्य अपूर्णांक म्हणतात.
दशांश अपूर्णांक :
ज्या अपूर्णाकाचे छेद 10, 100, 1000 किंवा 10 च्या दहा पटी असतात. त्यांना दशांश अपूर्णांक म्हणतात.
🙏 धन्यवाद!🙏
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please do not enter any spam link in the comment box.