Breaking

रविवार, २५ डिसेंबर, २०२२

शिष्यवृत्ती परीक्षा सराव चाचणी मालिका | सराव चाचणी क्र 14 | गणित | संख्यांवरील क्रिया : गुणाकार, भागाकार

      

इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेची ऑनलाइन सराव प्रश्नपत्रिका मालिका

Scholarship Practice Test
विद्यार्थी मित्रांनो, 
आपण सर्वजण दि. १२ फेब्रुवारी २०२३ रोजी होणाऱ्या इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करत आहात. या तयारीमध्ये आपणास मदत म्हणून आम्ही दि. १२ डिसेंबर २०२२ पासून नलाइन सराव प्रश्नपत्रिका उपक्रम सुरू केला आहे. रोज तुम्हाला एका विषयाच्या एका घटकावर सराव चाचणी दिली जाते. सोबत त्या घटकाच्या मार्गदर्शन व्हिडिओची लिंक दिली आहे. तो पाहून आपण सराव प्रश्नपत्रिका सोडवू शकता. यामुळे आपला सराव होईल आणि शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी होईल.
So be ready for this.

दिवस चौदावा सराव चाचणी - 14  
दि. 25/12/2022 
विषय -  गणित 
घटक - संख्यांवरील क्रिया : गुणाकार, भागाकार   

मार्गदर्शन व्हिडिओची लिंक 

सराव चाचणी प्रश्नपत्रिका लिंक

सराव प्रश्नपत्रिका येथे सोडवा.

वरील घटकावरील प्रश्न सोडविताना खालील बाबींचा नक्की अभ्यास करा.

महत्त्वाचे मुद्दे......  

गुणाकार (पाच अंकी गुणिले तीन अंकी संख्येपर्यंत)
34254 × 125 = 4281750
सोबतच्या गुणांकारात 34254 हा गुण्य, 125 हा गुणक व 4281750 हा गुणाकार आहे. 

गुणाकार करताना पुढील महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
(1) कोणतीही संख्या 0 = 0.
(2) कोणत्याही संख्येला 1 ने गुणल्यास गुणाकार तीच संख्या असते. उदा., 57 x 1 = 57.
(3) कोणत्याही संख्येला 10, 100, 1000, ... अशा म्हणजे एकावर शून्य असणाऱ्या संख्यांनी गुणताना, गुणाकारात गुण्य संख्या लिहून त्यापुढे गुणकातील शून्यांएवढी शून्ये लिहावीत. 
(4) दोन संख्यांचा गुणाकार करताना प्रथम त्यांच्या एकक स्थानच्या अंकांचा गुणाकार करावा लागतो. या अंकांच्या गुणाकारातील एकक स्थानी जो अंक असतो, तोच अंक मूळच्या दोन संख्यांच्या गुणाकाराच्या एकक स्थानी असतो.
(5) दोन अंकांचा गुणाकार करताना, गुणाकारात कोणता विशिष्ट अंक एकक स्थानी येईल, हे समजणे काही वेळा जरुरी असते. अपेक्षित गुणाकार मिळण्यासाठी कोणते दोन अंक निवडायला हवेत, हे ठरवावे लागते. 

भागाकार (पाच अंकी भागिले दोन अंकी संख्येपर्यंत)
लक्षात ठेवा : भाज्य (भाजक x भागाकार) + बाकी.
 
भागाकार करताना पुढील महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
(1) गुणाकार व भागाकार परस्परविरुद्ध क्रिया आहेत.
(2) 9 × 5 = 45, यावरून 45 ÷ 9 = 5 आणि 45 ÷ 5 = 9 हे दोन भागाकार मिळतात. 
(3) शून्य या संख्येला कोणत्याही शून्येतर संख्येने भागल्यास भागाकार शून्यच येतो. 
(4) कोणत्याही संख्येला 1 ने भागले असता येणारा भागाकार तीच संख्या असतो.

        🙏 धन्यवाद!🙏

या उपक्रमाबाबत दररोजचे अपडेट आणि माहिती मिळविण्यासाठी खालील Social Media Icon वर करून आजच आमचा ग्रुप जॉईन करा.   

       


सदर उपक्रमातील सर्व सराव चाचणी प्रश्न पत्रिका मिळविण्यासाठी येथे क्लिक करा. 

Find All Practice Test Here 





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please do not enter any spam link in the comment box.