Breaking

शनिवार, २४ डिसेंबर, २०२२

शिष्यवृत्ती परीक्षा सराव चाचणी मालिका | सराव चाचणी क्र 13 | मराठी | कार्यात्मक व्याकरण : लिंग, वचन, काळ

     

इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेची ऑनलाइन सराव प्रश्नपत्रिका मालिका

Scholarship Practice Test
विद्यार्थी मित्रांनो, 
आपण सर्वजण दि. १२ फेब्रुवारी २०२३ रोजी होणाऱ्या इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करत आहात. या तयारीमध्ये आपणास मदत म्हणून आम्ही दि. १२ डिसेंबर २०२२ पासून नलाइन सराव प्रश्नपत्रिका उपक्रम सुरू केला आहे. रोज तुम्हाला एका विषयाच्या एका घटकावर सराव चाचणी दिली जाते. सोबत त्या घटकाच्या मार्गदर्शन व्हिडिओची लिंक दिली आहे. तो पाहून आपण सराव प्रश्नपत्रिका सोडवू शकता. यामुळे आपला सराव होईल आणि शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी होईल.
So be ready for this.

दिवस तेरावा सराव चाचणी - 13  
दि. 24/12/2022 
विषय - मराठी 
घटक - कार्यात्मक व्याकरण : लिंग, वचन, काळ 

मार्गदर्शन व्हिडिओची लिंक 

सराव चाचणी प्रश्नपत्रिका लिंक

सराव प्रश्नपत्रिका येथे सोडवा.

वरील घटकावरील प्रश्न सोडविताना खालील बाबींचा नक्की अभ्यास करा.

महत्त्वाचे मुद्दे......    
कार्यात्मक व्याकरण  : लिंग, वचन, काळ 

✅  मराठी भाषेत तीन प्रकारची लिंग आहेत.
(1) पुल्लिंग (2) स्त्रीलिंग (3) नपुंसकलिंग

 पुल्लिंग - एखादया नामावरुन पुरुषजातीचा बोध झाला तर ते नाम पुल्लिंग आहे असे समजते.
पुल्लिंगी नामाचा उल्लेख 'तो' या शब्दाने केला जातो . 
उदा. तो - सुहास

स्त्रीलिंग - एखादया नामावरुन स्त्रीजातीचा बोध झालातर ते नाम स्त्रीलिंगी आहे असे समजावे.
 स्त्रीलिंगी नामाचा उल्लेख 'ती' या शब्दाने केला जातो.
 उदा. ती - राधिका 

नपुंसकलिंगी - एखादया नामावरुन पुरुष किंवा स्त्री जातीचा बोध होत नाही तेव्हा ते नाम नपुंसकलिंग असे समजावे.
नपुंसकलिंगी नामाचा उल्लेख 'ते' या शब्दाने केला जातो. 
उदा. ते - पुस्तक 

✅ वचन - वस्तू एक आहे की अनेक हे ज्यावरुन कळते त्याला नामाचे वचन असे म्हणतात.

 एकवचन - नामावरुन एका वस्तूचा बोध झाला तर ते एकवचन समजावे.
 उदा. झाड, पान 

 अनेकवचन - नामावरुन अनेक वस्तूंचा बोध झाला तर ते अनेकवचन समजावे.
 उदा. झाडे, पाने 

काही नामांचे अनेकवचन करताना त्यांच्यामध्ये बदल होत नाही . अशा नामांना उभयवचनी नाम असे म्हणतात.
 उदा. शाळा, पेरु 

✅ काळ - वाक्यात दिलेल्या क्रियापदावरुन जसा क्रियेचा बोध होतो, तसेच ती क्रिया कोणत्या वेळी घडत आहे याचा बोध होतो त्याला 'काळ' असे म्हणतात.

काळाचे मुख्य प्रकार तीन आहेत.

१) वर्तमान काळ : क्रियापदावरुन क्रिया आता घडत आहे असा बोध होतो.
 उदा. रोहन भाजी आणतो. 

२) भूतकाळ : क्रियापदावरुन क्रिया घडून गेली आहे असा बोध होतो.
 उदा. रोहनने भाजी आणली. 

३) भविष्यकाळ : क्रियापदावरुन पुढे क्रिया घडणार आहे असा बोध होतो.
 उदा. रोहन भाजी आणेल. 

        🙏 धन्यवाद!🙏

या उपक्रमाबाबत दररोजचे अपडेट आणि माहिती मिळविण्यासाठी खालील Social Media Icon वर करून आजच आमचा ग्रुप जॉईन करा.   

       


सदर उपक्रमातील सर्व सराव चाचणी प्रश्न पत्रिका मिळविण्यासाठी येथे क्लिक करा. 

Find All Practice Test Here 





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please do not enter any spam link in the comment box.