Breaking

शुक्रवार, २३ डिसेंबर, २०२२

शिष्यवृत्ती परीक्षा सराव चाचणी मालिका | सराव चाचणी क्र 12 | बुद्धिमत्ता चाचणी | क्रम ओळखणे - संख्यामालिका, आकृत्यांची मालिका, चिन्हांची मालिका, चुकीचे पद ओळखणे

    

इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेची ऑनलाइन सराव प्रश्नपत्रिका मालिका

Scholarship Practice Test
विद्यार्थी मित्रांनो, 
आपण सर्वजण दि. १२ फेब्रुवारी २०२३ रोजी होणाऱ्या इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करत आहात. या तयारीमध्ये आपणास मदत म्हणून आम्ही दि. १२ डिसेंबर २०२२ पासून नलाइन सराव प्रश्नपत्रिका उपक्रम सुरू केला आहे. रोज तुम्हाला एका विषयाच्या एका घटकावर सराव चाचणी दिली जाते. सोबत त्या घटकाच्या मार्गदर्शन व्हिडिओची लिंक दिली आहे. तो पाहून आपण सराव प्रश्नपत्रिका सोडवू शकता. यामुळे आपला सराव होईल आणि शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी होईल.
So be ready for this.

दिवस बारावा सराव चाचणी - 12 
दि. 23/12/2022 
विषय - बुद्धिमत्ता चाचणी
घटक - क्रम ओळखणे - संख्यामालिका, आकृत्यांची मालिका, चिन्हांची मालिका, चुकीचे पद ओळखणे

मार्गदर्शन व्हिडिओची लिंक 

सराव चाचणी प्रश्नपत्रिका लिंक

सराव प्रश्नपत्रिका येथे सोडवा.

वरील घटकावरील प्रश्न सोडविताना खालील बाबींचा नक्की अभ्यास करा.
■ महत्वाचे मुद्दे.......
क्रम ओळखणे - विशिष्ट क्रम असणारी संख्या चिन्ह व आकृत्यांची मालिका समजून त्यातील क्रम ओळखता येणे आवश्यक आहे.
उपघटक : संख्यामालिका
(1) संख्याची विशिष्ट क्रम असणारी मालिका असते.
(2) शेजारील दोन संख्यांमध्ये असलेले संबंध त्यातील विशिष्ट क्रम निश्चित करणे.
(3) संख्यांमधील संबंध शोधणे. (बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, वर्ग, घन, समसंख्या, विषम संख्या, अंकांची स्थाने इत्यादींच्या बाबतीत)
(4) अपूर्णांकाची तुलना, चढता क्रम, उतरता क्रम, मूळ संख्या शोधणे. संख्यांमधील फरक, पट पाहणे.
उपघटक : आकृत्यांची मालिका
(1) आकृतीच्या मालिकेतील पहिल्या तीन अवस्थांचे निरीक्षण करून, आकृतीत नेमके काय बदल घडत जातात ते बदल लक्षात घ्यावे.
(2) आकृतीतील भागांची, कोनांची, रेषांची किंवा चिन्हांची संख्या वाढत जाते किंवा कमी होत जाते. याचे निरीक्षण करावे.
(3) आकृतीतील चिन्हांचे स्थान मागे-पुढे सरकते का याचे निरीक्षण करावे.
(4) आकृतीतील काही भाग घटिवत किंवा प्रतिघटिवत दिशेने फिरतो याचे निरीक्षण करावे.
उपघटक : चिन्हांची मालिका
क्रम ओळखणे या प्रकारात प्रश्नात काही चिन्हे किंवा चिन्हांचा समूह एका विशिष्ट क्रमाने दिलेला असतो. त्यामधील एक पद गाळलेले असते. त्या जागी प्रश्नचिन्ह दिले जाते. त्या प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा चिन्हांचा समूह निश्चित करुन त्या समूहाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवणे आवश्यक आहे.
महत्त्वाचे
(1) चिन्हे उजवीकडे सरकतात की डावीकडे सरकतात याचे निरीक्षण करावे.
(2) गटानुसार चिन्हांच्या संख्येत बदल होतो का ते पहावे.
(3) चिन्हांचे गट दिले नसल्यास चिन्हांची संख्या मोजून गट करावेत व प्रत्येक गटातील चिन्हांचा क्रम लक्षात घ्यावा.
उपघटक : चुकीचे पद ओळखणे
संख्यांचा क्रम ओळखणे या प्रकारच्या प्रश्नाप्रमाणेच प्रश्नात विशिष्ट क्रमाने येणाऱ्या काही संख्यांचा गट दिला जातो. त्या प्रश्नमालेतील एक पद विसंगत असते. ते पद ओळखणे आवश्यक आहे.
संख्यामधील वाढत जाणारा टप्पा, मूळसंख्या, घनसंख्यांचा क्रम, तसेच बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार अशा गणिती क्रियांचा संबध प्रश्नमालेत असतो तो ओळखून दिलेले चुकीचे पद ओळखणे आवश्यक आहे.

        🙏 धन्यवाद!🙏

या उपक्रमाबाबत दररोजचे अपडेट आणि माहिती मिळविण्यासाठी खालील Social Media Icon वर करून आजच आमचा ग्रुप जॉईन करा.   

       


सदर उपक्रमातील सर्व सराव चाचणी प्रश्न पत्रिका मिळविण्यासाठी येथे क्लिक करा. 

Find All Practice Test Here 





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please do not enter any spam link in the comment box.