Breaking

मंगळवार, २० डिसेंबर, २०२२

शिष्यवृत्ती परीक्षा सराव चाचणी मालिका | सराव चाचणी क्र 9 | मराठी | कार्यात्मक व्याकरण - नाम, सर्वनाम, विशेषण व क्रियापद

इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेची ऑनलाइन सराव प्रश्नपत्रिका मालिका

Scholarship Practice Test
विद्यार्थी मित्रांनो, 
आपण सर्वजण दि. १२ फेब्रुवारी २०२३ रोजी होणाऱ्या इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करत आहात. या तयारीमध्ये आपणास मदत म्हणून आम्ही दि. १२ डिसेंबर २०२२ पासून नलाइन सराव प्रश्नपत्रिका उपक्रम सुरू केला आहे. रोज तुम्हाला एका विषयाच्या एका घटकावर सराव चाचणी दिली जाते. सोबत त्या घटकाच्या मार्गदर्शन व्हिडिओची लिंक दिली आहे. तो पाहून आपण सराव प्रश्नपत्रिका सोडवू शकता. यामुळे आपला सराव होईल आणि शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी होईल.
So be ready for this.

दिवस नववा    सराव चाचणी - 9
दि. 20/12/2022 
विषय - मराठी 
घटक - कार्यात्मक व्याकरण - नाम, सर्वनाम, विशेषण व क्रियापद

मार्गदर्शन व्हिडिओची लिंक 


सराव चाचणी प्रश्नपत्रिका लिंक

सराव प्रश्नपत्रिका येथे सोडवा.

वरील घटकावरील प्रश्न सोडविताना खालील बाबींचा नक्की अभ्यास करा.

■ महत्वाचे मुद्दे .......

कार्यात्मक व्याकरण
उपघटक - शब्दांच्या जाती  - नाम,सर्वनाम, विशेषण, क्रियापद

नाम - प्रत्यक्ष अथवा काल्पनिक वस्तूच्या नावास किंवा गुणधर्म दर्शविणाऱ्या शब्दाला नाम असे म्हणतात.
उदा. गोविंद, घोडा, गंगा, आंबा, पुस्तक, दूध, भारत, गहू, प्रामाणिकपणा, अप्सरा.

सर्वनाम - एकाच नामाचा उच्चार वारंवार होऊ नये म्हणून नामाबद्दल जो शब्द वापरतात. त्याला सर्वनाम असे म्हणतात.
उदा . मी, आम्ही, तू, तुम्ही, तो, ती, ते, त्या, जो, ज्याने, त्याने, आपण, ही, हा, हे 

विशेषण नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला 'विशेषण' म्हणतात.
उदा. बलाढ्य, आळशी, हिरवी, उंच, धारदार, कडू, सुगंधी, इमानी, कर्कश, टपोरे,पाच, दुप्पट

क्रियापद - वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला 'क्रियापद' असे म्हणतात.
उदा. आहे, नाही, सांगितले, म्हणतात, बोलतो, खेळतात, नांगरतो, खातो, तोडतो, लिहितो.
         
या घटकावरील प्रश्न सोडविताना प्रथमतः प्रश्‍नात नेमक काय विचारलं गेल आहे ते पहा व उत्तर निवडा
 उदा. 1)वाक्यातील नाम,सर्वनाम, विशेषण, क्रियापद ओळखा 
         2)वाक्यात किती नामे आली आहेत?
         3) रिकाम्या जागी योग्य 
नाम,सर्वनाम, विशेषण, क्रियापद निवडा 
         4)अधोरेखित शब्दाची जात ओळखा इ.
        🙏 धन्यवाद ! 🙏 

या उपक्रमाबाबत दररोजचे अपडेट आणि माहिती मिळविण्यासाठी खालील Social Media Icon वर करून आजच आमचा ग्रुप जॉईन करा.   

       


सदर उपक्रमातील सर्व सराव चाचणी प्रश्न पत्रिका मिळविण्यासाठी येथे क्लिक करा. 

Find All Practice Test Here 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please do not enter any spam link in the comment box.