Breaking

सोमवार, १९ डिसेंबर, २०२२

शिष्यवृत्ती परीक्षा सराव चाचणी मालिका | सराव चाचणी क्र 8 | बुद्धिमत्ता चाचणी | वर्गीकरण : शब्दसंग्रह, आकृती व संख्या

     

इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेची ऑनलाइन सराव प्रश्नपत्रिका मालिका

Scholarship Practice Test
विद्यार्थी मित्रांनो, 
आपण सर्वजण दि. १२ फेब्रुवारी २०२३ रोजी होणाऱ्या इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करत आहात. या तयारीमध्ये आपणास मदत म्हणून आम्ही दि. १२ डिसेंबर २०२२ पासून नलाइन सराव प्रश्नपत्रिका उपक्रम सुरू केला आहे. रोज तुम्हाला एका विषयाच्या एका घटकावर सराव चाचणी दिली जाते. सोबत त्या घटकाच्या मार्गदर्शन व्हिडिओची लिंक दिली आहे. तो पाहून आपण सराव प्रश्नपत्रिका सोडवू शकता. यामुळे आपला सराव होईल आणि शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी होईल.
So be ready for this.

दिवस आठवा सराव चाचणी - 8

दि. 19/12/2022 

विषय - बुद्धिमत्ता चाचणी 

घटक - वर्गीकरण : शब्दसंग्रह, आकृती व संख्या

मार्गदर्शन व्हिडिओची लिंक 

सराव चाचणी प्रश्नपत्रिका लिंक

सराव प्रश्नपत्रिका येथे सोडवा.

वरील घटकावरील प्रश्न सोडविताना खालील बाबींचा नक्की अभ्यास करा.
■ महत्वाचे मुद्दे.......

✅ वर्गीकरण या प्रश्नप्रकारात साम्य असणारे चार घटक दिलेले असतात. त्यापैकी तीन घटकांत तंतोतंत साम्य असते. ते साम्य ओळखून विसंगत घटक शोधणे आवश्यक आहे.

✅ शब्दसंग्रह या उपघटकात विशिष्ट शब्दांचा गट दिलेला असतो. त्यामध्ये व्याकरण, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, समान गुणधर्म असणारे शब्द इत्यादी भाषिक कौशल्यांवर आधारित प्रश्न असतात.

आकृत्या
प्रश्नात दिलेल्या चार आकृत्यांपैकी तीन आकृत्यांत साम्य व सुसंगती आढळते म्हणून ते एका गटात मोडतात. पण एक आकृती विसंगत असते. 
✅ आकृत्यांमधील साम्य व सुसंगती शोधताना आकृत्यांचा आकार, आतील भाग, घटिवत / प्रतिघटिवत फिरणे, रेषा / बिंदू / चिन्हे यांची संख्या, स्थान, दिशा, आरशातील प्रतिमा / पाण्यातील प्रतिबिंब या बाबींचा विचार करणे आवश्यक आहे.

संख्या
प्रश्नात दिलेल्या चार संख्यांपैकी तीन संख्या त्यांच्यातील साम्यामुळे एका गटात मोडतात. एक संख्या गटात बसत नाही.
✅ दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, अंकामधील फरक, सम-विषम संख्या, वर्ग-वर्गमूळ संख्या, घन-घनमूळ संख्या, क्रमवार संख्या, पाढ्यातल्या संख्या, विशिष्ट संख्येने भाग जाणाऱ्या संख्या, अपूर्णांकाच्या बाबतीत अंश व छेद यांच्यातील तुलना यांचा विचार करणे आवश्यक आहे.
✅ 1 ते 20 पर्यंतचे पाढे, 1 ते 20 संख्यांचे वर्ग, 1 ते 10 संख्यांचे घन आणि 1 ते 100 या मधील मूळ संख्या लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

        🙏 धन्यवाद!🙏

या उपक्रमाबाबत दररोजचे अपडेट आणि माहिती मिळविण्यासाठी खालील Social Media Icon वर करून आजच आमचा ग्रुप जॉईन करा.   

       


सदर उपक्रमातील सर्व सराव चाचणी प्रश्न पत्रिका मिळविण्यासाठी येथे क्लिक करा. 

Find All Practice Test Here 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please do not enter any spam link in the comment box.