इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेची ऑनलाइन सराव प्रश्नपत्रिका मालिका
विद्यार्थी मित्रांनो,
आपण सर्वजण दि. १२ फेब्रुवारी २०२३ रोजी होणाऱ्या इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करत आहात. या तयारीमध्ये आपणास मदत म्हणून आम्ही दि. १२ डिसेंबर २०२२ पासून ऑनलाइन सराव प्रश्नपत्रिका उपक्रम सुरू केला आहे. रोज तुम्हाला एका विषयाच्या एका घटकावर सराव चाचणी दिली जाते. सोबत त्या घटकाच्या मार्गदर्शन व्हिडिओची लिंक दिली आहे. तो पाहून आपण सराव प्रश्नपत्रिका सोडवू शकता. यामुळे आपला सराव होईल आणि शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी होईल.

So be ready for this.
दिवस सातवा सराव चाचणी - 7
दि. 18/12/2022
विषय - English
घटक - Vocabulary : Corelating words with picture, Rhyming words, opposite words, word register, Finding small words from the bigger ones
मार्गदर्शन व्हिडिओची लिंक
सराव चाचणी प्रश्नपत्रिका लिंक
सराव चाचणी प्रश्नपत्रिका लिंक
वरील घटकावरील प्रश्न सोडविताना खालील बाबींचा नक्की अभ्यास करा.
■ महत्वाचे मुद्दे.......
✅ Vocabulary या घटकाची तयारी करत असताना यातील प्रत्येक छोटा घटक व त्यातील दिलेल्या सूचनांनुसार संबंधित शब्द लिहिणे किंवा picture related शब्द लिहिणे आवश्यक असते हे प्रथम समजून घ्या.
✅ Corelating words with picture या घटकात क्रियापदाचे(verb) व विशेषणाचे (adjective) चित्रांशी परस्पर संबंध जोडणे यावरआधारित प्रश्न येतात त्यामुळे क्रियावाचक शब्द व योग्य describing word ओळखणे आवश्यक आहे.
✅ Rhyming words म्हणजेच यमक जुळणारे शब्द यामध्ये word's pronunciation योग्य करणे महत्त्वाचे आहे. त्याचा सराव करावा, जेणेकरून या घटकावर विचारलेले प्रश्न सोडविता येतील.
✅ Writing opposite words या घटकाची तयारी करत असताना आपण opposite words लक्षात ठेवणे म्हणजेच ते recite करणे आवश्यक आहे.
✅ Writing word register या घटकामध्ये आपल्याला शब्दांची यादी ही लिहायची आहे परंतू विचारला गेलेला प्रश्न नीट वाचून काय उत्तर अपेक्षित आहे तसे शब्द निवडा. त्यासाठी प्रश्न त्याचे स्वरुप समजून घ्या.
✅ Finding small words from the bigger ones या घटकामध्ये आपल्याला मोठ्या शब्दातून लहान अर्थपूर्ण शब्द शोधायचे आहेत, तसेच ते किती शब्द तयार होतील, क्रमाने अथवा उलटसुलट अक्षरे मांडून किती शब्द तयार होतील असे प्रश्न विचारतात तरी त्यादृष्टीने आपण सराव करावा.
Vocabulary या घटकातील उर्वरित छोट्या घटकांवरील महत्त्वाचे मुद्दे आपण पुढच्या सराव चाचणी सोडविताना पाहू.
🙏 धन्यवाद!🙏
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please do not enter any spam link in the comment box.