Breaking

शनिवार, १७ डिसेंबर, २०२२

शिष्यवृत्ती परीक्षा सराव चाचणी मालिका | सराव चाचणी क्र 6 | गणित | संख्याज्ञान - जोडमूळ, सहमूळ, त्रिकोणी, चौरस संख्या

     

इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेची ऑनलाइन सराव प्रश्नपत्रिका मालिका

Scholarship Practice Test
विद्यार्थी मित्रांनो, 
आपण सर्वजण दि. १२ फेब्रुवारी २०२३ रोजी होणाऱ्या इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करत आहात. या तयारीमध्ये आपणास मदत म्हणून आम्ही दि. १२ डिसेंबर २०२२ पासून नलाइन सराव प्रश्नपत्रिका उपक्रम सुरू केला आहे. रोज तुम्हाला एका विषयाच्या एका घटकावर सराव चाचणी दिली जाते. सोबत त्या घटकाच्या मार्गदर्शन व्हिडिओची लिंक दिली आहे. तो पाहून आपण सराव प्रश्नपत्रिका सोडवू शकता. यामुळे आपला सराव होईल आणि शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी होईल.
So be ready for this.

दिवस सहावा सराव चाचणी - 6

दि. 17/12/2022 

विषय - गणित

घटक- संख्याज्ञान - जोडमूळ, सहमूळ, त्रिकोणी, चौरस संख्या

मार्गदर्शन व्हिडिओची लिंक 

सराव चाचणी प्रश्नपत्रिका लिंक

सराव प्रश्नपत्रिका येथे सोडवा.

वरील घटकावरील प्रश्न सोडविताना खालील बाबींचा नक्की अभ्यास करा.
■ महत्वाचे मुद्दे.......

आजचा घटक समजून घेताना मूळ, जोडमूळ, सहमूळ, संयुक्त, त्रिकोणी चौरस संख्या जाणून घेणे आवश्यक आहे 
✅ मूळ संख्या : ज्या संख्येला 1 ने किंवा फक्त त्याच संख्येने भाग जातो. त्या संख्येस मूळ संख्या म्हणतात.
2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19,......97
✅संयुक्त संख्या : दोनपेक्षा जास्त विभाजक असणाऱ्या संख्यांना संयुक्त संख्या म्हणतात. उदा. 4, 6, 8, 9, 10, .....
✅ जोडमूळ : दोन मूळ संख्यांच्या दरम्यान एक संयुक्त संख्या असते. त्याला जोडमूळ संख्या म्हणतात.
उदा. 3, 5 ही जोडमूळ संख्येची जोडी आहे. यामध्ये 4 ही संयुक्त संख्या 3 व 5 या मूळ संख्येच्या दरम्यान आहे.
✅ सहमूळ : दिलेल्या संख्येत । हा एकच सामाईक विभाजक असणाऱ्या संख्यांना सहमूळ संख्या म्हणतात. 
(क्रमाने येणाऱ्या कोणत्याही दोन संख्या या सहमूळ संख्या असतात.) 
उदा. 13 चे विभाजक 1,13
14 चे विभाजक = 1, 2, 7, 14
सामाईक अवयव - 1
म्हणून 13 व 14 सहमूळ
✅ त्रिकोणी : दोन क्रमवार संख्येच्या गुणाकाराची निमपट केल्यास त्रिकोणी संख्या मिळते.
✅ चौरस संख्या : दिलेल्या संख्येस त्याच संख्येने गुणल्यास मिळणारी वर्गसंख्या ही चौरस संख्या असते.  उदा. 1, 4, 9, 16, 25......

✅  हे लक्षात ठेवाच...... 
✔️1 ते 100 या अंकामध्ये एकूण मूळ संख्या 25 आहेत.
✔️1 ते 100 या अंकामध्ये एकच सम संख्या ही मूळ संख्या आहे. ती संख्या म्हणजे 2
✔️1 ते 100 मध्ये एकूण संयुक्त संख्या 74 आहेत.
✔️1 ही संख्या नैसर्गिक संख्या आहे, ती मूळ व संयुक्तही नाही, पण विषम संख्या आहे.
✔️1 ते 100 मधील जोडमूळ संख्यांच्या जोड्या 8 आहेत. त्यापुढीलप्रमाणे  
3-5, 5-7, 11-13, 17-19, 29-31, 41-43, 59-61, 71-73.

        🙏 धन्यवाद!🙏

या उपक्रमाबाबत दररोजचे अपडेट आणि माहिती मिळविण्यासाठी खालील Social Media Icon वर करून आजच आमचा ग्रुप जॉईन करा.   

       



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please do not enter any spam link in the comment box.