Breaking

शुक्रवार, १६ डिसेंबर, २०२२

शिष्यवृत्ती परीक्षा सराव चाचणी मालिका | सराव चाचणी क्र 5 | मराठी | कविता व जाहिरात वाचून प्रश्नांची उत्तरे देणे.

      

इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेची ऑनलाइन सराव प्रश्नपत्रिका मालिका

Scholarship Practice Test
विद्यार्थी मित्रांनो, 
आपण सर्वजण दि. १२ फेब्रुवारी २०२३ रोजी होणाऱ्या इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करत आहात. या तयारीमध्ये आपणास मदत म्हणून आम्ही दि. १२ डिसेंबर २०२२ पासून नलाइन सराव प्रश्नपत्रिका उपक्रम सुरू केला आहे. रोज तुम्हाला एका विषयाच्या एका घटकावर सराव चाचणी दिली जाते. सोबत त्या घटकाच्या मार्गदर्शन व्हिडिओची लिंक दिली आहे. तो पाहून आपण सराव प्रश्नपत्रिका सोडवू शकता. यामुळे आपला सराव होईल आणि शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी होईल.
So be ready for this.

दिवस पहिला सराव चाचणी - 5

दि. 16/12/2022 

विषय - मराठी 

घटक - कविता व जाहिरात वाचून प्रश्नांची उत्तरे देणे. 

मार्गदर्शन व्हिडिओची लिंक 

सराव चाचणी प्रश्नपत्रिका लिंक

सराव प्रश्नपत्रिका येथे सोडवा.

वरील घटकावरील प्रश्न सोडविताना खालील बाबींचा नक्की अभ्यास करा.
■ महत्वाचे मुद्दे.......

कविता व जाहिरात यावरील प्रश्नांची उत्तरे सोडविताना प्रथम कविता/ जाहिरात लक्षपूर्वक वाचा.

✅ कवितेचा आशय व जाहिरातीचा विषय समजून घ्या.

✅कविता वाचन करत असतांना प्रत्येक वाक्याचा अर्थ समजून घ्यावा यासाठी वाक्यात काही नवीन किंवा अपरिचित शब्द आले असतील तर त्यांना अधोरेखित करून त्यांचा अर्थ समजत नसेल तर आपण आपल्या शिक्षकांना विचारून घ्यावे. जेणेकरून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे निवडतांना अधिक सोईचे होईल.

✅जाहिराती वरील प्रश्न सोडविताना त्यातील स्थळ, काळ इ. बाबी जाणीवपूर्वक समजून घ्या.

 ✅ जाहिराती मधून व्यक्त होणारा संदेश समजून घ्या.

✅योग्य पर्याय निवडतांना अगोदर सर्व पर्याय नीट वाचा. त्यानंतर योग्य पर्याय निवडतांना तो कवितेमध्ये व जाहिरातीमध्ये कोठे आला आहे ते तपासून योग्य उत्तराची निवड करा. 

        🙏 धन्यवाद!🙏

या उपक्रमाबाबत दररोजचे अपडेट आणि माहिती मिळविण्यासाठी खालील Social Media Icon वर करून आजच आमचा ग्रुप जॉईन करा.   

       


सदर उपक्रमातील सर्व सराव चाचणी प्रश्न पत्रिका मिळविण्यासाठी येथे क्लिक करा. 

Find All Practice Test Here 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please do not enter any spam link in the comment box.