Breaking

गुरुवार, १५ डिसेंबर, २०२२

शिष्यवृत्ती परीक्षा सराव चाचणी मालिका | सराव चाचणी क्र 4 | बुद्धिमत्ता चाचणी | आकलन - सूचना पालन, संख्या मालिका, इंग्रजी वर्णमाला

    

इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेची ऑनलाइन सराव प्रश्नपत्रिका मालिका

Scholarship Practice Test
विद्यार्थी मित्रांनो, 
आपण सर्वजण दि. १२ फेब्रुवारी २०२३ रोजी होणाऱ्या इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करत आहात. या तयारीमध्ये आपणास मदत म्हणून आम्ही दि. १२ डिसेंबर २०२२ पासून नलाइन सराव प्रश्नपत्रिका उपक्रम सुरू केला आहे. रोज तुम्हाला एका विषयाच्या एका घटकावर सराव चाचणी दिली जाते. सोबत त्या घटकाच्या मार्गदर्शन व्हिडिओची लिंक दिली आहे. तो पाहून आपण सराव प्रश्नपत्रिका सोडवू शकता. यामुळे आपला सराव होईल आणि शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी होईल.
So be ready for this.

दिवस चौथा सराव चाचणी - 4

दि. 15/12/2022 

विषय - बुद्धिमत्ता चाचणी 

घटक - आकलन : सूचनापालन, संख्यामालिका, इंग्रजी वर्णमाला 

मार्गदर्शन व्हिडिओची लिंक 

सराव चाचणी प्रश्नपत्रिका लिंक

सराव प्रश्नपत्रिका येथे सोडवा.

वरील घटकावरील प्रश्न सोडविताना खालील बाबींचा नक्की अभ्यास करा.
■ महत्वाचे मुद्दे.......

उपघटक - सूचना पालन
✅ विदयार्थ्यांनी मराठी वर्णमालेतील स्वर, व्यंजने, जोडाक्षरे, जोडशब्द पर्यायी शब्द, प्रत्ययघटित शब्द उपसर्गयुक्त शब्द या बाबींचा अभ्यास व सराव करावा.
✅ वर्णमालेतील जोडाक्षरे क्ष, झ.
✅ कृपा. वृत्ती, पृथा, हृदय यांमधील कृ, वृ, पृ, हृ ही अक्षरे जोडाक्षर नाहीत. 
✅ कर्म, सर्व, पार्थ यांमधील रफारयुक्त र्म, र्व, र्थ ही अक्षरे जोडाक्षरे आहेत.
✅ क्रम, पत्र, प्रजा यांतील क्र, त्र, प्र ही अक्षर जोडाक्षरे आहेत. 
✅ त्या, म्ह, च्या, झ्या अशी दोन अक्षरे जोडून बनणारी इतर सर्व जोडाक्षरे आहेत.
परंतु, अनुस्वारासारखा उच्चार असलेले अनुनासिक जोडलेले अक्षर जोडाक्षर नसते 
जसे, 'वाड्मय' यात 'ड्म' हे जोडाक्षर नाही.
✅ दोन अर्थपूर्ण शब्द एकत्र येऊन एकच शब्द बनतो तेव्हा त्याला 'जोडशब्द' म्हणतात. उदा. सूर्योदय, चहापाणी, नवरात्र इत्यादी.
✅ मराठी व्याकरणातील नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, काळ, समानार्थी / विरुद्धार्थी शब्द, म्हणी व वाक्प्रचार, दिलेल्या अक्षरसमूहापासून वा शब्दापासून अर्थपूर्ण शब्द तयार करणे.
✅ शब्दात / वाक्यात विशिष्ट अक्षर किती वेळा येते, ते मोजणे.
✅ शब्दातील / वाक्यातील एखाद्या अक्षराचे स्थान ठरवणे. यामध्ये 'डावीकडून डावीकडे' म्हणजे आपल्या डावीकडून / डावीकडे तसेच 'उजवीकडून / उजवीकडे' म्हणजे आपल्या उजवीकडून / उजवीकडे.

उपघटक - संख्यामालिका
विदयार्थ्यांना पुढील बाबी माहीत असाव्यात.
✅ रोमन अंक / संख्या, अपूर्णांक, त्रिकोणी संख्या, कोनांची मापे, घड्याळातील वेळा.
✅ सम/विषम संख्या, मूळ संख्या, जुळ्या मूळ संख्या, सहमूळ संख्या, संयुक्त संख्या.
✅ 1 ते 20 संख्यांचे पाढे.
✅ एक अंकी संख्यांचा गुणाकार.
✅ 1 ते 20 संख्यांचे वर्ग.
✅ दिलेल्या अंकांतून 5 ते 6 अंकी संख्या तयार करणे.
✅ संख्यांमधील लहान-मोठेपणा.

उपघटक - इंग्रजी वर्णमाला
✅ विदयार्थ्यांनी अक्षरमालेच्या पट्टीकडे न पाहता, अक्षरांचे क्रमांक लक्षात ठेवण्याचा सराव करावा. अक्षर पाहिल्याबरोबर चट्कन त्याचा क्रमांकही डोळ्यासमोर यायला हवा. यामुळे अक्षरपट्टीकडे पाहण्यासाठी व त्यातून प्रत्येक अक्षराचा क्रमांक शोधण्यासाठी लागणारा वेळ वाचतो. 
✅ अक्षराचा अक्षरमालेच्या विरुद्ध टोकाकडून असलेला क्रमांक, म्हणजे अक्षराचा क्रमांक 26 मधून कमी करून येणारी संख्या. उदा., E चा डावीकडून क्रमांक 5. म्हणून E चा उजवीकडून क्रमांक 26 - 5 = 21. 
✅ दोन अक्षरांच्या मधोमध / मध्यभागी येणारे अक्षर म्हणजे त्या दोन अक्षरांचे क्रमांक मिळवून त्याच्या निम्मे केल्यावर येणाऱ्या संख्येइतक्या क्रमांकाचे अक्षर
✅ प्रश्नामध्ये 'अक्षरापासून' असा उल्लेख असल्यास, त्या अक्षराचा क्रमांक 1 धरून पुढे मागे मोजावे.
✅ 'अक्षराच्या उजवीकडे / डावीकडे' असा उल्लेख असल्यास, संबंधित बाजूला त्या अक्षराच्या पुढच्या अक्षराचा क्रमांक 1 धरावा. म्हणजेच, ते अक्षर वगळून त्याच्या पुढचे अक्षर 'पहिले' धरावे. 
✅ 'दोन अक्षरांच्या दरम्यान', म्हणजे ती दोन अक्षरे वगळून त्यांच्या मध्ये असणारी सर्व अक्षरे. 
✅ एका अक्षरापासून दुसऱ्या अक्षरापर्यंत' म्हणजे ती दोन अक्षरे धरून मधली सर्व अक्षरे.

        🙏 धन्यवाद!🙏

या उपक्रमाबाबत दररोजचे अपडेट आणि माहिती मिळविण्यासाठी खालील Social Media Icon वर करून आजच आमचा ग्रुप जॉईन करा.   

       


सदर उपक्रमातील सर्व सराव चाचणी प्रश्न पत्रिका मिळविण्यासाठी येथे क्लिक करा. 

Find All Practice Test Here 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please do not enter any spam link in the comment box.