Breaking

बुधवार, २१ डिसेंबर, २०२२

शिष्यवृत्ती परीक्षा सराव चाचणी मालिका | सराव चाचणी क्र 10 | गणित | संख्यांवरील क्रिया : बेरीज व वजाबाकी

  

इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेची ऑनलाइन सराव प्रश्नपत्रिका मालिका

Scholarship Practice Test
विद्यार्थी मित्रांनो, 
आपण सर्वजण दि. १२ फेब्रुवारी २०२३ रोजी होणाऱ्या इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करत आहात. या तयारीमध्ये आपणास मदत म्हणून आम्ही दि. १२ डिसेंबर २०२२ पासून नलाइन सराव प्रश्नपत्रिका उपक्रम सुरू केला आहे. रोज तुम्हाला एका विषयाच्या एका घटकावर सराव चाचणी दिली जाते. सोबत त्या घटकाच्या मार्गदर्शन व्हिडिओची लिंक दिली आहे. तो पाहून आपण सराव प्रश्नपत्रिका सोडवू शकता. यामुळे आपला सराव होईल आणि शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी होईल.
So be ready for this.

दिवस दहावा सराव चाचणी - 10
दि. 21/12/2022 
विषय - गणित
घटक - संख्यांवरील क्रिया : बेरीज व वजाबाकी

मार्गदर्शन व्हिडिओची लिंक 


सराव चाचणी प्रश्नपत्रिका लिंक

सराव प्रश्नपत्रिका येथे सोडवा.

वरील घटकावरील प्रश्न सोडविताना खालील बाबींचा नक्की अभ्यास करा.
■ महत्वाचे मुद्दे.......

संख्यांवरील क्रियामधील बेरीज हा उपघटक सोडविताना खालील बाबी करणे आवश्यक आहे.
✅ दिलेल्या संख्यांची मांडणी स्थानांनुसार (हजार, शतक, दशक, एकक) संख्या मांडून घेणे.
✅ संख्यांमध्ये हातचा असल्यास न विसरता घेणे.
✅ शाब्दिक उदाहरण व्यवस्थित नीट वाचून कोणती क्रिया करावी लागेल हे ठरवणे गरजेचे आहे.

संख्यांवरील क्रियामधील वजाबाकी हा उपघटक सोडविताना खालील बाबी करणे आवश्यक आहे.
✅ दिलेल्या संख्यांची मांडणी स्थानांनुसार एकाखाली एक करून घ्यावी.
✅ मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करावी.
✅ हातच्याची वजाबाकी करताना काळजीपूर्वक करणे गरजेचे आहे.

या उपक्रमाबाबत दररोजचे अपडेट आणि माहिती मिळविण्यासाठी खालील Social Media Icon वर करून आजच आमचा ग्रुप जॉईन करा.   

       


सदर उपक्रमातील सर्व सराव चाचणी प्रश्न पत्रिका मिळविण्यासाठी येथे क्लिक करा. 

Find All Practice Test Here 





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please do not enter any spam link in the comment box.