Breaking

गुरुवार, ११ जून, २०२०

National Technology Day | आज राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस | 11 मे रोजी तंत्रज्ञान दिवस का साजरा करतात

National Technology Day | आज राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस, 11 मे रोजी का साजरा करतात हा दिवस?

First Nuclear Test in India succeed on 11 May 1998 therefore 11 May celebrate in India as National Technology Day.

भारताने केलेल्या अणुचाचणीने आपल्या तंत्रज्ञानातील प्रगती जगाला दिसून आली. या प्रगतीचे प्रतीक म्हणून 11 मे हा दिवस दरवर्षी ‘राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस’ म्हणून साजरा केला जातो.


National Technology Day


By : एबीपी माझा| 11 May 2020 

मुंबई : 1998 साली आजच्याच दिवशी भारताने केलेल्या अणुचाचणीने आपल्या तंत्रज्ञानातील प्रगती जगाला दिसून आली. पोखरण अणुचाचणीची घटना साजरी करण्यासाठी 11 मे हा दिवस राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस म्हणून देशभरात साजरा केला जातो. अणुचाचणी तंत्रज्ञानातील प्रगतीचे प्रतीक म्हणून दरवर्षी ‘राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस’ म्हणून साजरा करतो.

11 मे 1998 रोजी भारताने एरोस्पेस अभियंता आणि दिवंगत माजी राष्ट्रपती डॉ एपीजे अब्दुल कलाम यांच्या मार्गदर्शनाखाली राजस्थान येथील भारतीय लष्कराच्या पोखरण चाचणी क्षेत्रात शक्ती-I या आण्विक क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वीपणे पार पाडली. दोन दिवसानंतर लगेचच, पोखरण-II / ऑपरेशन शक्ती पुढाकारचा एक भाग म्हणून यशस्वीपणे आणखी दोन आण्विक चाचण्या घेतल्या. या चाचण्यांमुळे भारत राष्ट्रांच्या 'न्यूक्लियर क्लब' मध्ये सामील होणारा सहावा देश ठरला आणि नॉन-प्रोलीफरेशन ऑफ न्यूक्लियर वेपन तहामध्ये भागीदार नसलेला प्रथम देश बनला.

तसेच 11 मे 1998 रोजी संरक्षण संशोधन व विकास संघटना (DRDO) कडून ‘त्रिशूल’ क्षेपणास्त्राची अंतिम चाचणी पूर्ण केली गेली, जे नंतर भारतीय लष्कर आणि भारतीय वायुसेनेत समाविष्ट करण्यात आले. कमी पल्ल्याचे, जलद-प्रतिक्रिया देणारे, जमिनीवरून हवेत मारा करणारे (SAM) क्षेपणास्त्र ‘त्रिशूल’ हा भारतातील एकात्मिक गाइडेड क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाचा एक भाग होता.

देशाच्या या प्रचंड यशानंतर, भारताचे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी 11 मे हा दिवस ‘राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस’ म्हणून घोषित केला. भारतात 1999 सालापासून दरवर्षी तंत्रज्ञान विकास मंडळ (TDB) यांच्या नेतृत्वात हा दिवस साजरा केला जातो.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please do not enter any spam link in the comment box.