आरोग्य सेतू अॅप ने बनवला आणखी एक विक्रम आणि जगभरातील अॅप्स ला दिली टक्कर
Aarogya Setu one of the top 10 downloaded mobile apps globally since launch, second month in running. India has led the way in effectively leveraging
नवी मुंबई :
कोरोना व्हायरस (corona_virus) संसर्गापासून बचावाची माहिती देणारा अधिकृत आरोग्य सेतू अॅप (Aarogya_setu) हा मे महिन्यात जगातील पहिल्या 10 डाऊनलोड मोबाइल अॅप्सपैकी एक ठरला आहे. निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अमिताभ कांत यांनी शनिवारी ही माहिती दिली.
अमिताभ कांत यांनी ट्वीट केले की, 'आरोग्य सेतू अॅप हा मे मध्ये अॅप लॉन्च केल्यानंतर सलग दुसर्या महिन्यात जगभरातील top 10 डाऊनलोड केलेल्या मोबाइल अॅप्सपैकी एक आहे. कोविड - 19 या साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी भारताने तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे उपयोग करून जगात नेतृत्व केले.'
#AarogyaSetu one
of the top 10 downloaded mobile apps globally since launch, second month in
running. India has led the way in effectively leveraging technology to combat
the COVID-19 pandemic.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ एप्रिल २०२० रोजी देशाला दिलेल्या भाषणात त्यांनी देशातील सर्व नागरिकांना हे अॅप डाउनलोड करण्याचे आवाहन केले होते.
आरोग्य सेतु अॅप कसे वापरावे.
सर्व
प्रथम,
आपल्याला मोबाईल मधील प्ले स्टोअर वरून ते डाउनलोड करावे लागेल.
मोबाईलमध्ये
इंस्टाल करावे लागेल.
आरोग्य सेतु अॅप इंस्टाल केल्यानंतर,
आपण
प्रथमच ते उघडल्यास आपल्याला काही परवानग्या द्याव्या लागतील.
आपला मोबाइल नंबर,
ब्ल्यूटूथ आणि लोकेशन डेटाच्या मदतीने हे अॅप आपण सुरक्षित आहात की नाही हे सांगतो आणि आपल्याला संसर्ग होण्याचा धोका आहे की नाही हे निर्धारित करते.
सौजन्य – झी न्यूज (०७ जून २०२०)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please do not enter any spam link in the comment box.