Breaking

शुक्रवार, ५ जून, २०२०

आपण ऑनलाइन व्हिडिओ किती पाहतो | Google report about indias record

आपण ऑनलाइन व्हिडिओ किती पाहतो ? गुगलने सांगितला भारतीयांचा खरा रेकॉर्ड

सरासरी प्रत्येक तीन भारतीयांपैकी एक दररोज एका तासापेक्षा जास्त ऑनलाइन व्हिडिओ पाहतो. असं गुगलने दिलेल्या अहवालात म्हटलं आहे.

 

नवी दिल्ली: दर तीन भारतीयांपैकी एक, सरासरी, दररोज एका तासापेक्षा जास्त ऑनलाइन व्हिडिओ पाहतो. असं गुगलने दिलेल्या अहवालात म्हटलं आहे.
अहवालानुसार ऑनलाइन व्हिडिओ पाहणाऱ्यांची तुलना केल्यास 54 टक्क्यांसह हिंदी अव्वल आहे. त्याखालोखाल इंग्रजी ( 16 टक्के), तेलगू (7 टक्के), कन्नड (6 टक्के), तामिळ (5 टक्के) आणि बांगला (3 टक्के टक्के) यांचा क्रमांक लागतो.
अहवालानुसार, यावर्षी भारतातील विविध प्रदेश, लोकसंख्याशास्त्र आणि सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमीचे ऑनलाइन व्हिडिओ पाहणाऱ्यांची संख्या वाढून 50 कोटी होण्याचा अंदाज आहे.
गुगलने अहवालात म्हटले आहे की, भारतात ऑनलाईन व्हिडिओ पाहणारे सुमारे 37 टक्के लोक ग्रामीण भागातील आहेत.
गूगलचा 'अंडरस्टँडिंग इंडियाज ऑनलाईन व्हिडिओ व्ह्यूअर' चा अहवाल 6500 हून अधिक लोकांच्या सर्व्हेषणावर आधारित आहे. त्यापैकी सुमारे 73 टक्के लोक हे 15-25 वर्षे या वयोगटातील होते.
असे आढळले की ऑनलाइन व्हिडिओ पाहण्याचा दररोज सरासरी वेळ 67 मिनिटे असतो. अहवालात म्हटले आहे की, "नवीन इंटरनेट वापरणारेसुद्धा दररोज सरासरी 56 मिनिटे ऑनलाइन व्हिडिओ पहात आहेत. सुमारे चार प्लॅटफॉर्म नियमितपणे आणि इतर तीन प्लॅटफॉर्म कधीकधी वापरले जातात."
सौजन्य - https://zeenews.india.com/  (०५ जून २०२०)


Read the Report on 

https://www.thinkwithgoogle.com/intl/en-apac/country/india/understanding-indias-online-video-viewer/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please do not enter any spam link in the comment box.