Breaking

बुधवार, २६ सप्टेंबर, २०१८

जिल्हास्तरीय भूमिका अभिनय व लोकनृत्य स्पर्धा, 26 सप्टेंबर 2018





जिल्हा शैक्षणिक  सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था,
 पनवेल, जि. रायगड

राष्ट्रीय लोकसंख्या शिक्षण कार्यक्रमांतर्गत

जिल्हास्तरीय भूमिका अभिनय व लोकनृत्य स्पर्धा

 दि. २६ सप्टेंबर २०१८ 

*प्रमुख उपस्थिती*

डॉ. भरत पवार, वरिष्ठ अधिव्याख्याता

श्री. शिवराम सांगळे, अधिक्षक

*परीक्षक*
डॉ. दिनेश चौधरी, अधिव्याख्याता DIECPD पनवेल
श्री. सुनिता राठोड, अधिव्याख्याता DIECPD पनवेल
सौ. प्रज्ञा चंद्रकांत पाटील, ATD Lecturer

*स्पर्धेस सहकार्य*
श्री. बशीर उल्डे, श्री. राकेश आहिरे (विषय सहाय्यक)
श्री. प्रदीप वायाळ, श्री. संजय गवारी, सौ. शुभांगी सुतार (कार्यालयीन कर्मचारी)

*स्पर्धेत सहभागी*
जिल्ह्यातील शासकीय आश्रमशाळा 

*स्पर्धा कार्यक्रम पत्रिका *
जिल्हा स्तरीय लोकनृत्य व भूमिका अभिनय स्पर्धेच्या सुरुवातीला आलेल्या सर्व शाळेच्या शिक्षकांच्या मदतीने विद्यार्थ्यांची प्रवेशिका भरून घेण्यात आली. प्रवेशिका भरल्यानंतर सर्वांना अल्पोहार देण्यात आला. स्पर्धेत निर्दोष पार पाडण्यासाठी सहभागी शाळांचे स्पर्धेनुसार गट करून गट क्रमांक पुरवण्यात आले.  
  •  प्रास्ताविक
श्रीम. सुनिता राठोड, अधिव्याख्याता DIECPD पनवेल यांनी राष्ट्रीय लोकसंख्या शिक्षण कार्यक्रमाची माहिती संक्षिप्त स्वरुपात वर्णन केली. याच कार्यक्रमांतर्गत दरवर्षी जिल्हा, विभाग, राज्य, राष्ट्र स्तरावर भूमिका अभिनय व लोकनृत्य स्पर्धा आयोजित केली जाते. या स्पर्धेचा उद्देश त्यांनी सर्वांसमोर मांडला. स्पर्धेचे नियम व सूचना सर्वांना सांगण्यात आले.
  •  स्वागत
श्री. दिनेश चौधरी, अधिव्याख्याता DIECPD पनवेल यांनी सर्व प्रथम स्पर्धेच्या प्रमुख परीक्षक म्हणून उपस्थित सौ. प्रज्ञा चंद्रकांत पाटील, ATD Lecturer, ऋषीकेश चित्रकला महाविद्यालय यांचे स्वागत केले व त्यांच्या कला क्षेत्रातील कार्याचा अनुभव सर्वांसमोर मांडला. त्यानंतर उपस्थित डॉ. भरत पवार, वरिष्ठ अधिव्याख्याता व श्री. शिवराम सांगळे, अधिक्षक यांचे स्वागत केले. उपस्थित सर्व आश्रम शाळा शिक्षक व विद्यार्थी तसेच विषय सहाय्यक व कार्या. कर्मचारी सर्वांचे शब्द सुमनाने स्वागत केले.

  •  मार्गदर्शन
डॉ. भरत पवार, वरिष्ठ अधिव्याख्याता यांनी स्पर्धेस उपस्थित सर्व आश्रमशाळा शिक्षक तथा विद्यार्थ्याना लोकनृत्य तथा भूमिका अभिनय आणि लोकसंख्या शिक्षण कार्यक्रम बाबत मोलाचे मार्गदर्शन केले. जीवनातील कलेचे महत्व सर्वांना पटवून दिले.
  •  प्रत्यक्ष स्पर्धा कार्यवाही
स्पर्धेला आलेल्या सर्व शाळांनी आपले भूमिका अभिनय व लोकनृत्य सर्वांसमोर सादरीकरण केले. सर्व प्रथम भूमिका अभिनय आणि नंतर लोकनृत्य सादरीकरण करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांनी छान सादरीकरण केले.
  • परीक्षकांचे मार्गदर्शन
स्पर्धकांनी सादर केलेल्या सादरीकरणावर परीक्षक असलेल्या श्रीम. सुनिता राठोड, अधिव्याख्याता DIECPD पनवेल यांनी स्पर्धकांचे कौतुक तथा अनावश्यक हालचाली कशा कमी कराव्यात याबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर दुसऱ्या परीक्षक असलेल्या सौ. प्रज्ञा चंद्रकांत पाटील, ATD Lecturer यांनी देखील स्पर्धकांचे कौतुक आणि उत्तम सादरीकरणासाठी आणखी काय करता येईल हे मांडले. तिसऱ्या परीक्षक असलेल्या श्री. दिनेश चौधरी, अधिव्याख्याता DIECPD पनवेल यांनी ही स्पर्धकांना मोलाचे मार्गदर्शन व काही दाखले देऊन प्रेरणा देण्याचा प्रयत्न केला. विजेत्या स्पर्धकांना पुढील विभाग स्तरासाठी काय करून यश संपन्न करता येईल याबाबत परीक्षकांनी स्पर्धकांना मार्गदर्शन केले.
  •  पारितोषिक वितरण
स्पधेत सादर केलेल्या सादरीकरणावरून परीक्षकांनी केलेल्या मुल्यांकनावरून भूमिका अभिनय व लोकनृत्य दोन्ही प्रकारातील सादरीकरणावर प्रत्येकी तीन क्रमांक काढण्यात आले व मान्यवरांच्या हस्ते त्या विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक म्हणून रोख रक्कम आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले.
राष्ट्रीय लोकसंख्या शिक्षण कार्यक्रमांतर्गत

जिल्हास्तरीय भूमिका अभिनय व लोकनृत्य स्पर्धा

दि.२६ सप्टेंबर २०१८

पारितोषिक वितरण

प्रकार
क्रमांक
शाळा
पारितोषिक रक्कम
भूमिका अभिनय
प्रथम
नगर परिषद माध्यमिक आश्रमशाळा, ताकई, ता. खालापूर
१५००
द्वितीय
छत्रपती शाहू महाराज माध्यमिक आश्रमशाळा, खोपोली
१०००
तृतीय
शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, साई, ता. पनवेल
७५०
लोकनृत्य
प्रथम
शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, डोलवली, ता. खालापूर
१८००
द्वितीय
छत्रपती शाहू महाराज माध्यमिक आश्रमशाळा, खोपोली
१२००
तृतीय
शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, साई, ता. पनवेल
१५०
 
  •  शिक्षक तथा विद्यार्थी मनोगत   
स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांपैकी कु. यश अशोक राणे (नगरपालिका माध्यमिक विद्यालय, खोपोली) याने स्पर्धेदरम्यान आलेल्या अनुभव, केलेली मेहनत तसेच लाभलेले शिक्षकांचे सहकार्य याबाबत आपले मनोगत मांडले. त्यानंतर शिक्षकांमधून श्री. जनार्दन गणपत सताणे (छत्रपती शाहू महाराज माध्यमिक आश्रमशाळा, खोपोली) यांनी देखील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा किती उपयुक्त आहे व त्यांना कसे तयार केले या बाबत मनोगत व्यक्त केले.
  •  आभार व समारोप
स्पर्धेच्या शेवटी श्री. सुनिता राठोड, अधिव्याख्याता DIECPD पनवेल यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानून स्पर्धा संपन्न झाली.
  •  शब्दांकन
श्री. राकेश आहिरे , विषय सहाय्यक, DIECPD पनवेल







































कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please do not enter any spam link in the comment box.