Breaking

शुक्रवार, २४ ऑगस्ट, २०१८

दीक्षा app साठी ई-साहित्य निर्मिती कार्यशाळा माणगाव, 24 ऑगस्ट 2018


दीक्षा app साठी ई-साहित्य निर्मिती कार्यशाळा
रा जि प शाळा खांदाड, ता. माणगाव
दिनांक:-  24 ऑगस्ट 2018

¨प्रेरणास्रोत¨
मा. सुभाषजी महाजन ,
प्राचार्य,
DIECPD पनवेल, जि. रायगड.

¨मार्गदर्शक¨
डॉ. संजय वाघ, ज्येष्ठ अधिव्याख्याता
श्री. राजेंद्र लठ्ठे, अधिव्याख्याता
DIECPD पनवेल, जि. रायगड

¨कार्यशाळा सुलभक¨
श्री. राकेश आहिरे आणि श्री. गणेश कुताळ (IT) विषय सहाय्यक
श्री. प्रविण देवरे (विज्ञान), श्री. बशीर उल्डे (उर्दू)विषय सहाय्यक
श्रीम. रंजना जाधव


¨कार्यशाळेस सहयोग¨
श्री. संतोष बेंदूगडे
साधन व्यक्ती, माणगाव
¨सहभागी तालुके¨
माणगाव, महाड, पोलादपूर, तळा, मुरुड, म्हसळा, श्रीवर्धन, रोहा
कार्यशाळेत खालील मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.

¨स्वागत¨
श्री. संतोष बेंदूगडे, साधनव्यक्ती माणगाव यांनी उपस्थित श्री. राजेंद्र लठ्ठे ,अधिव्याख्याता DIECPD पनवेल तसेच विषय सहाय्यक आणि तंत्रस्नेही शिक्षक यांचे स्वागत शब्दसुमनाने केले.
¨प्रास्ताविक¨
श्री. गणेश कुताळ IT विषय सहाय्यक यांनी DIKSHA APP ची माहिती दिली त्यात असलेला घटक कसा आहे आणि आजच्या कार्यशाळेची पार्श्वभूमी काय आहे ती सर्व उपस्थितांना स्पष्ट केली.
¨पाहुण्यांचे मनोगत¨
श्री. राजेंद्र लठ्ठे अधिव्याख्याता DIECPD पनवेल यांनी कार्यशाळेस उपस्थित सर्वाना आजच्या काळातील तंत्रज्ञानाचे महत्व आणि गरज स्पष्ट केले. तसेच शिक्षणात तंत्रज्ञानाचे महत्व सांगितले. या काळात आपल्याला सतत UPDATE राहिले पाहिजे या साठी NOKIA आणि इतर android smart phones चे तुलनात्मक मार्गदर्शन केले.
¨दीक्षा app मधील अनुभव कथन¨
श्री. सुनील पवार, विषय शिक्षक तालुका पोलादपूर यांनी त्यांना या पूर्वी दीक्षा app मध्ये काम करताना काय अनुभव आला तो सर्वाना कथन केला.
¨कार्यशाळा संबंधित महत्वाचे मुद्दे¨
श्री. राकेश आहिरे, IT विषय सहाय्यक यांनी कार्यशाळेसाठी सुरुवात करण्यापूर्वी खालील मुद्दे सर्वाना स्पष्ट  केले.
ü ई-साहित्य निर्मिती साठी रायगड जिल्ह्याला इ 3 ते 5 चा परिसर अभ्यासातील 42 घटक  दिले आहेत.
ü त्या घटकांना उपस्थित तंत्रस्नेहीना तालुकावार विभागणी करण्यात येईल.
ü सर्व प्रथम घटक आणि अध्ययन निष्पत्ती यांची सांगड घालावी आणि ई साहित्या साठी कोणते आवश्यक material हवे आहे त्यांची यादी तयार करणे.
ü Royalti image कशी शोधावी आणि त्याचा वापर का करावा ते स्पष्ट केले.
¨अध्ययन निष्पत्ती बाबत मार्गदर्शन¨
श्रीम. रंजना जाधव, DIECPD पनवेल यांनी ई-साहित्य निर्मिती वेळी अध्ययन निष्पत्ती ची सांगड कशी घालावी या बाबत मार्गदर्शन केले.
¨घटक वाटणी आणि आराखडा निर्मिती¨
श्री. देवरे, श्री. आहिरे, श्री. कुताळ, श्री. उल्डे यांनी 8 तालुक्यामध्ये घटकांची विभागणी करून शिक्षकांचे तालुकानिहाय गट केले आणि त्यांच्याकडून ई-साहित्य निर्मितीचा आराखडा तयार करण्यासंबंधीत मार्गदर्शन केले.
¨नमुना प्रात्यक्षिक¨
श्री. आहिरे सर व श्री. कुताळ सर यांनी ई साहित्य ms powerpoint मध्ये कसा निर्माण करावा तसेच त्यांना animation कसे द्यावे हे प्रात्यक्षिक दाखविले.  font व text size कशी असावी . PPT ला AUDIO कसा द्यावा तसेच त्याचा व्हिडीओ कसा तयार करावा  या बाबत मार्गदर्शन केले. श्री. देवरे यांनी सर्वानी तयार केलेले आराखडे जमा करून घेतले.
¨आभार¨
श्री. कुताळ यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून कार्यशाळेचा समारोप केला.

श्री. राजेंद्र लठ्ठे अधिव्याख्याता diecpd पनवेल मार्गदर्शन करताना 

श्री. राकेश आहिरे विषय सहाय्यक  diecpd पनवेल मार्गदर्शन करताना 

श्री. गणेश कुताळ  विषय सहाय्यक  diecpd पनवेल मार्गदर्शन करताना

तंत्रस्नेही शिक्षक 



गटात आराखडा करताना तंत्रस्नेही शिक्षक 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please do not enter any spam link in the comment box.