Breaking

गुरुवार, २३ ऑगस्ट, २०१८

दीक्षा app साठी ई-साहित्य निर्मिती कार्यशाळा कामोठे, 23 ऑगस्ट 2018


दीक्षा app साठी ई-साहित्य निर्मिती कार्यशाळा
सुषमा पाटील विद्यालय, कामोठे, ता. पनवेल
दिनांक:-  23 ऑगस्ट 2018

¨प्रेरणास्रोत¨
मा. सुभाषजी महाजन ,
प्राचार्य,
DIECPD पनवेल, जि. रायगड.

¨मार्गदर्शक¨
डॉ. संजय वाघ, ज्येष्ठ अधिव्याख्याता
श्री. राजेंद्र लठ्ठे, अधिव्याख्याता
DIECPD पनवेल, जि. रायगड

¨कार्यशाळा सुलभक¨
श्री. राकेश आहिरे आणि श्री. गणेश कुताळ (IT) विषय सहाय्यक
श्री. प्रविण देवरे (विज्ञान), श्रीम. सोनल गावंड (स.शा.)विषय सहाय्यक

¨सहभागी तालुके¨
उरण, कर्जत, पनवेल, खालापूर, सुधागड, पेण, अलिबाग






कार्यशाळेत खालील मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.

¨स्वागत¨
श्री. प्रविण देवरे, विषय सहाय्यक  यांनी उपस्थित श्री. संजय वाघ, ज्येष्ठ अधिव्याख्याता DIECPD पनवेल तसेच विषय सहाय्यक आणि तंत्रस्नेही शिक्षक यांचे स्वागत शब्दसुमनाने केले.
¨प्रास्ताविक¨
श्री. राकेश आहिरे, IT विषय सहाय्यक यांनी DIKSHA APP ची माहिती दिली त्यात असलेला घटक कसा आहे आणि आजच्या कार्यशाळेची पार्श्वभूमी काय आहे ती सर्व उपस्थितांना स्पष्ट केली.
¨पाहुण्यांचे मनोगत¨
श्री. संजय वाघ, ज्येष्ठअधिव्याख्याता DIECPD पनवेल यांनी कार्यशाळेस उपस्थित सर्वाना आजच्या काळातील तंत्रज्ञानाचे महत्व आणि गरज स्पष्ट केले. तसेच शिक्षणात तंत्रज्ञानाचे महत्व सांगितले. ई-साहित्य निर्मिती वेळी अध्ययन निष्पत्ती ची सांगड कशी घालावी या बाबत मार्गदर्शन केले.
¨दीक्षा app मधील अनुभव कथन¨
श्रीम. सविता लंके, प्राथ.शिक्षिका तालुका पनवेल यांनी त्यांना या पूर्वी दीक्षा app मध्ये काम करताना काय अनुभव आला तो सर्वाना कथन केला.
¨कार्यशाळा संबंधित महत्वाचे मुद्दे¨
श्री. राकेश आहिरे, IT विषय सहाय्यक यांनी कार्यशाळेसाठी सुरुवात करण्यापूर्वी खालील मुद्दे सर्वाना स्पष्ट  केले.
ü ई-साहित्य निर्मिती साठी रायगड जिल्ह्याला इ 3 ते 5 चा परिसर अभ्यासातील 42 घटक  दिले आहेत.
ü त्या घटकांना उपस्थित तंत्रस्नेहीना तालुकावार विभागणी करण्यात येईल.
ü सर्व प्रथम घटक आणि अध्ययन निष्पत्ती यांची सांगड घालावी आणि ई साहित्या साठी कोणते आवश्यक material हवे आहे त्यांची यादी तयार करणे.
ü Royalti image कशी शोधावी आणि त्याचा वापर का करावा ते स्पष्ट केले.
¨घटक वाटणी आणि आराखडा निर्मिती¨
श्री. देवरे, श्री. आहिरे, श्री. कुताळ यांनी 8 तालुक्यामध्ये घटकांची विभागणी करून शिक्षकांचे तालुकानिहाय गट केले आणि त्यांच्याकडून ई-साहित्य निर्मितीचा आराखडा तयार करण्यासंबंधीत मार्गदर्शन केले.
¨नमुना प्रात्यक्षिक¨
श्री. आहिरे सर व श्री. कुताळ सर यांनी ई साहित्य ms powerpoint मध्ये कसा निर्माण करावा तसेच त्यांना animation कसे द्यावे हे प्रात्यक्षिक दाखविले.  font व text size कशी असावी . PPT ला AUDIO कसा द्यावा तसेच त्याचा व्हिडीओ कसा तयार करावा  या बाबत मार्गदर्शन केले. श्री. देवरे यांनी सर्वानी तयार केलेले आराखडे जमा करून घेतले.
¨आभार¨
श्री. कुताळ यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून कार्यशाळेचा समारोप केला.
डॉ. संजय वाघ ज्येष्ठ अधिव्याख्याता  diecpd पनवेल मार्गदर्शन करताना 



श्री. राकेश आहिरे विषय सहाय्यक  diecpd पनवेल मार्गदर्शन करताना 


श्री. गणेश कुताळ विषय सहाय्यक  diecpd पनवेल मार्गदर्शन करताना 



श्रीम . सविता लंके प्राथ. शिक्षिका ता. पनवेल आपला diksha app ई साहित्य निर्मिती अनुभव कथन  करताना

1 टिप्पणी:

  1. नमस्कार ,दीक्षा app तंत्रस्नेही कार्यशाळा पनवेल कामोठे येथील सुषमा पाटील विद्यालय येथे 23/8/2018 ला संपन्न झाले,हे प्रशिक्ष खूप महत्त्वाचे होते परंतू माझ्या सर्वच शिक्षक बंधू भगिनींना प्रवासाचा खूप त्रास झाला, चांगलं शिकावं म्हणून आम्ही सर्वजण तेही सहन केलं ,सध्या चहाची सुद्धा आम्ही कोणीही अपेक्षा केली नाही , खूप कमी वेळेत हे प्रशिकक्षण दिल्यामुळे ते पाहिजे तस नाही पोचलं हे मी मी माझं प्रांजळ मत प्रकट करते ,त्या पेक्षा त्या सर्वच मार्गदर्शकांना प्रत्येक तालुक्यात येऊन निवडक ,त्याच योग्य मार्गदर्शन झाले तर ,ते इतर शिक्षकांना प्रेरित करू शकतील.आणि हा कार्यक्रम एका दिवसात संपणार होणार नाही तरी याचा सहनुभूतीपूर्वक विचार व्हावा ही नम्र विनंती .काही चुकत असल तर मार्गदर्शन व्हावे.

    उत्तर द्याहटवा

Please do not enter any spam link in the comment box.