Breaking

सोमवार, २० ऑगस्ट, २०१८

समावेशित शिक्षण अंतर्गत एकदिवसीय कार्यशाळा, आमटेम पेण, २० ऑगस्ट २०१८

जिल्हा शैक्षणिक  सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था,
 पनवेल, जि. रायगड


समावेशित शिक्षण अंतर्गत
विशेष तज्ज्ञ व रिसोर्स टिचर यांची दिव्यांग विद्यार्थी
अध्ययन स्तर व शैक्षणिक कृती आराखडा तयार करण्यासाठी एकदिवसीय 
कार्यशाळा
रा जि प शाळा आमटेम, ता. पेण
दिनांक:- 20 ऑगस्ट 2018

*प्रेरणास्रोत*
    मा. अभयजी यावलकर साहेब (IAS)                                  मा. सुभाषजी महाजन
         मुख्य कार्यकारी अधिकारी                                                       प्राचार्य
    रायगड जिल्हा रिषद, अलिबाग                                   DIECPD पनवेल जि. रायगड

* मार्गदर्शन *
श्रीम. शैलजा दराडे, शिक्षणाधिकारी प्राथ.
डॉ. भरत पवार, ज्येष्ठ अधिव्याख्याता
डॉ. संजय वाघ, ज्येष्ठ अधिव्याख्याता
श्री. शिवराम सांगळे, अधिक्षक
आणि
अधिव्याख्याता
डॉ. दिनेश चौधरी, श्री. राजेंद्र लठ्ठे, श्री. सुनिता राठोड, श्री. संतोष दौंड, श्री. रामदास टोणे
Ø कार्यशाळेची सुरुवात. राष्ट्रगीताने झाली.
Ø स्वर्गीय माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना आदरांजली वाहण्यात आली.
Ø प्रास्ताविक श्री रविंद्र विशे यांनी करतांना समग्र शिक्षा अभियानांतर्गत मंजूर अंदाजपत्रक, अध्ययन स्तर व current Level & IEP यातील सहसंबंध स्पष्ट करून शिक्षणाच्या प्रवासाचे महत्व स्पष्ट केले.
Ø डॉ दिनेश चौधरी सर यांनी प्रेरणादायी मार्गदर्शन करतांना मानवतेच्या दृष्टीकोनातून शैक्षणिक विचार प्रवाह निर्माण करणे, प्राणी व मानवाचा मेंदू आणि विकास यातील उत्क्रांती वाद स्पष्ट करून आपण सर्व मानवांच्या मेंदूवर काम करणारे घटक आहोत त्यामुळे आपली भूमिका विचार व संयमाने असली पाहिजे हे अनेक उदाहरणे देऊन वातावरण निर्मिती केली
Ø भरत वेखंडे यांनी RPWD ACT 2016 चे समावेशित शिक्षणाकडून शिक्षणाकडे स्थित्यंतर होतांना शिक्षण व्यवस्था म्हणून जबाबदारी, जिल्हा तालुका केंद्र स्तर असलेल्या संसाधन गटाचे महत्व व आपली भूमिका, त्यानुसार केलेली अध्ययन स्तर निश्चितीचे विश्लेषण करून १०० % उद्दिष्ट पूर्तीसाठी कृती आराखडा स्पष्ट केला.
Ø श्रीम अष्टेकर मॅडम यांनी अध्ययन शैली नुसार भाषा विषयाचा अध्ययन स्तर उंचावण्यासाठी कृती आराखडा वाचन पूर्व विकासाचे टप्पे, अक्षर, शब्द वाक्य व उतारा स्तरावर कृती मालिका  सादरीकरणा द्वारे समजावून दिला.
Ø श्री उस्मान शेख सर व श्रीम मनिषा खैरे मॅडम यांनी अध्ययन शैली नुसार गणित विषयाचा अध्ययन स्तर उंचावण्यासाठी कृती आराखडा समजावून सांगतांना गणित पूर्व विकासाचे टप्पे, गणित पेटीच्या माध्यमातून संख्याज्ञान, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या क्रिया गणितीय नऊ भाषाद्वारे विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याबाबत सादरीकरण केले..
Ø श्री गणेश कुताल सर यांनी तंत्रज्ञानाचा वापर अध्ययन शैली नुसार करतांना Operating system, DIKSHA app, YouTube kids, DIECPD Panvel Blog याबाबत सादरीकरण केले.
Ø डॉ दिनेश चौधरी सर यांनी वरील प्रमाणे कृती आराखडा तयार करण्यासाठी मुल कसे शिकते, प्रत्येक मुल शिकू शकते, त्यासाठी वाचन पूर्व विकासाचे महत्त्व गणन पूर्व विकासाचे महत्त्व समजावून देताना अनेक दैनंदिन कृती व उपक्रमाचे सादरीकरण केले.
Ø वंदे मातरम् ने बैठकीची सांगता झाली.
Ø संकलन
          श्री. रविंद्र विशे, समावेशित शिक्षण सक्षमीकरण समन्वयक
Ø शब्दांकन
श्री भरत वेखंडे, समावेशित शिक्षण सक्षमीकरण समन्वयक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please do not enter any spam link in the comment box.