Breaking

गुरुवार, १६ ऑगस्ट, २०१८

शिक्षण परिषद केंद्र - देवन्हावे / तोंडली / नारंगी, खालापूर, १६ ऑगस्ट 2018


जिल्हा शैक्षणिक  सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था,
 पनवेल, जि. रायगड


मिशन प्रगत शैक्षणिक रायगड
शिक्षण परिषद
केंद्र - देवन्हावे / तोंडली / नारंगी ,
ता- खालापूर
दिनांक:- १६ ऑगस्ट 2018



*प्रेरणास्रोत*
    मा. अभयजी यावलकर साहेब (IAS)                                  मा. सुभाषजी महाजन
         मुख्य कार्यकारी अधिकारी                                                       प्राचार्य
    रायगड जिल्हा रिषद, अलिबाग                                   DIECPD पनवेल जि. रायगड

*प्रमुख उपस्थिती*
डॉ. भरत पवार, वरिष्ठ अधिव्याख्याता
श्री. राजेंद लठ्ठे, अधिव्याख्याता
विषय सहाय्यक –

आज रोजी देवन्हावे आणि तोंडली नारंगी केंद्राची एकत्रित शिक्षण परिषद कार्यशाळा राजिप शाळा वडवळ येथे दोन्ही केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. अनिल म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली व नियोजनानुसार आयोजित करण्यात आली.

उपस्थित  मान्यवर
खालापूर तालुका वरीष्ठ विस्तार अधिकारी मा.सौ खेडकर मॅडम.

उपस्थित DIECPD मार्गदर्शक  मान्यवर
मा. डॉ. श्री. भरत पवार साहेब, ज्येष्ठ अधिव्याख्याता
मा श्री राजेन्द्र लठ्ठे सर, अधिव्याख्याता
सौ. सविता आष्टेकर मॅडम  (विषय सहाय्यक मराठी)
श्री. हेमकांत गोयजी सर   (विषय सहाय्यक मराठी)
सौ. सोनल गावंड मॅडम  (विषय सहाय्यक समाजशास्त्र)
श्री. गणेश कुताळ सर   (विषय सहाय्यक IT)

सर्वप्रथम वडवळ शाळेचे मुख्याध्यापक श्री. भोईर सर यांनी सर्व मान्यवरांचे  शब्दसुमनाने आणि गुलाबपुष्पे देऊन  स्वागत केले.
तदनंतर राजिप शाळा वडवळ येथील विद्यार्थ्यांनी छान सुमधूर आंणि सुरेल आवाजात स्वागतगीत सादर केले. स्वागत झाल्यावर राजिप शाळा वडवळ चे मुख्याध्यापक श्री भोईर सरांनी थोडक्यात कार्यशाळेच्या उद्देशाबाबत सुंदर आणि समर्पक शब्दात प्रास्ताविक केले. अध्ययन निष्पती आणि प्रगत शैक्षणिक  गुणवत्तेविषयी ठळकपण मुद्दे मांडले
तदनंतर कार्यशाळेचे सूत्र मा. डॉ. श्री. भरत पवार साहेबांनी हाती घेतले. प्रगत शै.महाराष्ट्र आणि अध्ययन  स्तर साठी आपले कर्तव्य व योगदान  100% च असायला हवे.. त्यासाठी लागणारे सर्व मार्गदर्शन आपल्या DIECPD कडून होईल असे पवार सरांनी सांगितले.   पवार सर म्हणजे एक प्रचंड असे सहकार्य होय.आपला खालापूर तालुका अध्ययन स्तरामध्ये, जिल्हामध्ये मध्यम स्तरावर  आहे..आपण त्याला उच्चाकांवर घेऊन जाऊया असे सांगितले. वर्गाची रचना ही बदलती असावी ..जास्तीत जास्त जेणेकरून ती C आकाराची असावी.प्रत्येक मुल हा मुक्त व्हायला हवा.. तसेच  सांकव ची संकल्पना  खुप छान प्रकारे स्पष्ट केली आणि सगळ्यांना ती भावली.असे अनेक  प्रकारचे मुद्दे मांडले.
तदनंतर विषय सहाय्यक सौ. सोनल गावंड मॅडम यांनी समाजशास्त्र  या विषयावर खुप सुंदर असे.सविस्तर मार्गदर्शन केले...समाजशास्त्र हा विषय सर्व विषयांशी निगडीत आहे..हे प्रत्येक उदाहरणासहित स्पष्ट केले. वंशावळ तयार करणे.. PPT द्वारे सर्व खगोलशास्त्राची माहीती सांगण्यात आली..तसेच प्रश्नमंजूषा घेऊन सर्व वर्गाला आपल्या हसऱ्या स्वभावाने प्रफ़ुल्लित केले.सर्वांचे लक्ष केंद्रित करून समाजशास्त्र विषयांची संकल्पना छानच समजावून सांगितली.
विषय सहाय्यक सौ. सविता अष्टेकर मॅडम यांनी अध्ययन निष्पती बद्दल खुप छान मार्गदर्शन केले. शिक्षकांच्या सर्व समस्यांचे निराकरण केले.अध्ययन स्तरावर जास्तीत जास्त भर द्यावा.
         श्रवण,भाषण,वाचन लेखन यावर ठळकपणे भाष्य करून खुप छान मार्गदर्शन केले.
श्री. हेमकांत गोयजी सरांनी वयानुरूप विद्यार्थ्यांसाठी काय करायला यावे याबद्दल असलेली समस्या अतिशय प्रखर आणि छान शब्दात सांगितली.
10 मिनिटे विश्रांती नंतर
          श्री. कुताळ सर , विषय सहाय्यक IT यांनी सूत्रे हाती  घेतली.
·      BCPT
·      BLOG
·      DIKSHA APP याबाबत सखोल मार्गदर्शन करून सर्व शिक्षकांना DIKSHA APP कसा डाऊनलोड करून त्याचा वापर करायचा याबाबत मार्गदर्शन केले.
आणि  BCPT च्या 41 GB  डाटा ची लिंक भरून, तो डेटा DIECPD मधील IT च्या BLOG वरून  डाउनलोड करावयास सांगितले . तसेच DIECPD च्या मेन ब्लॉग व APP  बद्दल सखोल माहिती सांगितली.
       अशा प्रकारे सर्व तज्ञांनी अतिशय छान मार्गदर्शन करून सर्व शिक्षकांना एक ज्ञानाची नवसंजीवनीच दिली. असा एक डोस असावा त्यामुळे प्रेरणा आणि स्फुर्ती निर्माण होते.
          ठाणेन्हावे शाळेच्या उपशिक्षिका आखाडे मॅडम यांनी तज्ञांनी केलेल्या मार्गदर्शनावर छान सुंदर प्रतिक्रिया दिली.

समारोप
डोणवत शाळेचे श्री. पालांडे सर यांनी सर्व मान्यवरांचे आणि शिक्षकवृंदाचे आभार मानले. त्यानंतर  केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. अनिल म्हात्रे  यांनी सर्वांच्या उपस्थित दोन्ही केंद्र 30 सप्टेंबर 2018 पर्यंत नक्कीच प्रगत होतील अशी ग्वाही देत कार्यशाळेची सांगता करण्यात आली. अशा प्रकारे हसत खेळत  आणि आनंददायी वातावरणात देवन्हावे आणि  तोंडली नारंगी ची कार्यशाळा पार पडली.

शब्दांकन : श्री. किरण धारणे.










कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please do not enter any spam link in the comment box.