Breaking

गुरुवार, १६ ऑगस्ट, २०१८

बीटस्तरीय शिक्षण परिषद बीट : वावोशी ता. खालापूर 16 AUG 2018

जिल्हा शैक्षणिक  सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था,
 पनवेल, जि. रायगड



मिशन प्रगत शैक्षणिक रायगड

बीटस्तरीय शिक्षण परिषद
बीट : वावोशी ता. खालापूर 

दिनांक:- १६ ऑगस्ट २०१८ 

*प्रेरणास्रोत*
  मा. अभयजी यावलकर साहेब (IAS)                                      मा. सुभाषजी महाजन
         मुख्य कार्यकारी अधिकारी                                                       प्राचार्य
    रायगड जिल्हा रिषद, अलिबाग                                   DIECPD पनवेल जि. रायगड

*प्रमुख उपस्थिती*
डॉ. दिनेश चौधरी, अधिव्याख्याता
श्रीम. सुनिता राठोड, अधिव्याख्याता
विषय सहाय्यक –

तालुका स्तरावरील उपस्थिती
विस्तार अधिकारी - ,  केंद्रप्रमुख- , मुख्याध्यापक - , शिक्षक –६५

*शिक्षण परिषदेत खालील मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.*
®    डॉ. दिनेश चौधरी, अधिव्याख्याता यांचे प्रेरणादायी विचार
ü पर्यवेशीय यंत्रणेकडून आदर्श शाळाभेट कशी असावी.
ü विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास कसा निर्माण करावा?
ü विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये आंतरक्रिया कशी असावी?
ü अध्यापनशास्त्र आणि मूल्यांकन यांचा दैनंदिन वापर.
ü विद्यार्थ्यांची मानसिक स्थिती आणि तो कोणत्या वातावरणातून आला याचा अभ्यास करून अध्यापन कसे करावे.
ü विद्यार्थ्यांच्या प्रगतीमधील अडथळे यांचा विचार करून अध्यापन कसे दूर करावे ?
ü शैक्षणिक साहित्याचा वापर कुठपर्यंत करावा?
ü सहयोगी पद्धतीने मूल शिकतं.
ü मूल शिकतं होण्यासाठी चिकित्सक विचार करणं आवश्यक.
ü शिकण्यातील अडचणी सोडविण्यासाठी समस्या निराकरण तत्व स्विकरले पाहिजे.
अशा 21 व्या शतकातील कौशल्यांची उपयुक्तता व आवश्यक ता आपल्या प्रेरणादायी   
विचारातून स्पष्ट केली.
अशा प्रकारे बीट स्तरीय शिक्षण परिषदेची प्रेरणादायी विचाराने सुरुवात झाली.

®   इंग्रजी विषय आणि समाजातील महत्व ,शाळेतील स्थिती
इंग्रजी विषयबद्दल समाजामधील विचार करण्याची पद्धती आणि त्यातील जिल्हा परिषद शाळेतील इंग्रजी विषयाची सद्यस्थिती याबद्दल चर्चा केली, तसेच

ü तेजस प्रोग्रामचा
ü mooc कोर्सची संधी.
ü शिक्षकांची इंग्रजी विषयात प्रगल्भीकरण.
ü Tag कार्यक्रमाचा उद्देश व महत्त्व.
ü BCPT DATA व वर्गाध्यापन
ü spoken English workshop ची यशस्विता
आदी. मुद्द्यावर श्री. संजय पाटील व श्री. रोहन पाटील, विषय सहाय्यक यांनी मार्गदर्शन केले.

®   गणित संबोध कार्यक्रमाची उजळणी आणि गणित विषयाचे महत्व
ü गणित हे व्यवहाराचे शास्त्र.
ü गणित विषयामध्ये क्रमबद्दतेचे महत्व,
ü अंदाज,तर्क आणि हिशोब यांचे दैनंदिन जीवन आणि गणित यांच्यातील महत्व.
ü कृतीतून गणिताचे अध्ययन अनुभव देणे आवश्यक
ü गणित  अध्ययन समृद्धी साहित्य पेटीचा वापरातून क्षमता विकसन
आदी. मुद्द्यावर श्री. उस्मान शेख ,विषय सहाय्यक यांनी विश्लेषण केले.

गणनपूर्व तयारी ,संख्याज्ञान आणि संख्यावारील क्रिया क्षमता विकासनासाठी कृती आराखडा आणि कृतिकार्यक्रम
गणित विषयातील विद्यार्थ्यांना येणाऱ्या समस्या आणि त्यावरील उपाय या अनुषंगाने कृती आराखड्याचे महत्व आणि कृती आराखडा कसा तयार करावा आणि साहित्यचा वापर कसा करावा याचे सविस्तर प्रात्यक्षिक श्रीम. मनीषा खैरे यांनी दाखविले.

®   दिक्षा aap इcontent निर्मिती आणि DIECPD raigad blog ची ओळख
ü दीक्षा अँप चा प्रत्यक्ष अध्यापनात वापर करण्यातील शिक्षकांच्या समस्यांचे निराकरण.
ü दीक्षा अँप वर इ content ची निर्मिती बाबत माहिती
ü DIECPD रायगड च्या ब्लॉग ची माहिती व परिचय
आदी. मुद्द्यावर श्री. राकेश आहिरे ,विषय सहाय्यक यांनी माहिती दिली.

®   श्रीम. सुनिता राठोड, अधिव्याख्याता DIECPD पनवेल यांचे मार्गदर्शन
ü सामाजिक शास्त्र आणि इतर विषय यांचा सहसंबंध
आदी मुद्द्यांवर श्रीम. सुनिता राठोड यांनी चर्चा केली.

®   मनोगत
      विस्तार अधिकारी श्रीम खैरनार मादाम यांनी परिषदेतील शिक्षकांना मार्गदर्शन केले आणि प्रशासकीय बाबींवर चर्चा केली, शैक्षणिक साहित्य वापर आणि मुलांची प्रगती याविषयावर चर्चा केली. आणि उपस्थितांचे आभार मानले.
®   शब्दांकन
       श्री. राकेश आहिरे / श्री. उस्मान शेख, विषय सहाय्यक








कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please do not enter any spam link in the comment box.