आता शिक्षक व विद्यार्थ्यांची स्मार्ट उपस्थिती - Attendance Bot वर .....
#विद्या_समीक्षा_केंद्र_VSK
#MPSP_महाराष्ट्र_प्राथमिक_शिक्षण_परिषद
विद्या समीक्षा केंद्र पुणे यांच्या पुढाकाराने आणि महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांच्या वतीने विभाग व जिल्हा स्तरावर कार्यशाळा घेण्यात आल्या आहेत आणि आता तालुका व केंद्र स्तरावर कार्यशाळा सुरू आहेत.
विद्या समीक्षा केंद्र (VSK) अंतर्गत राज्यातील सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांची स्मार्ट उपस्थिती नोंदविण्यासाठी Attendance Bot ची निर्मिती करण्यात आली आहे.
शैक्षणिक व्यवस्थेतील सर्व घटक, पर्यवेक्षकीय यंत्रणा आणि अंतिमतः विद्यार्थी याच्या माहितीच्या आधारे अचूक विश्लेषण, गुणवत्ता सुधार, सहकार्य, आणि अचूक वेगवान मदत करण्याची ही प्रणाली आहे. Artificial intelligence, machine learning and big data analysis अशा आधुनिक तंत्रज्ञानाचा शिक्षण क्षेत्रासाठी उपयोग करून घेण्याचा हा प्रयत्न आहे. विविध अहवाल, किचकट माहिती प्रक्रिया, दप्तर दिरंगाई यातून सुटका करून real time data थेट शाळेतून राज्याला प्राप्त करून देण्याची, सर्व उपलब्ध पोर्टल यांना एका प्लॅटफॉर्म वरती आणण्याची ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे. त्यासाठी वापरलेले chatbot हे तंत्रज्ञान आहे.
व्हिडीओ पाहा आणि समजून घ्या
कृती आराखडा माहिती
Attendance Bot User Guide
विद्या समीक्षा केंद्र भूमिका व महत्त्व
विद्या समीक्षा केंद्र VSK म्हणजे काय | What is mean by Vidya Samiksha Kendra
केंद्र स्तरावर हेच प्रशिक्षण सर्व शिक्षकांना देण्यात येणार आहे. तंत्रज्ञान शिकण्याच्या मार्गावरील अडथळे दूर होण्यास सकारात्मक दृष्टीने अधिकारी वर्गाला शिक्षकाला सहाय्य करण्यास आणि राज्याला अधिक अर्थपूर्ण वास्तववादी नियोजन करण्यास मदत होणार आहे
सौजन्य : MPSP मुंबई
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please do not enter any spam link in the comment box.