इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेची ऑनलाइन सराव प्रश्नपत्रिका मालिका
विद्यार्थी मित्रांनो,
आपण सर्वजण दि. १२ फेब्रुवारी २०२३ रोजी होणाऱ्या इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करत आहात. या तयारीमध्ये आपणास मदत म्हणून आम्ही दि. १२ डिसेंबर २०२२ पासून ऑनलाइन सराव प्रश्नपत्रिका उपक्रम सुरू केला आहे. रोज तुम्हाला एका विषयाच्या एका घटकावर सराव चाचणी दिली जाते. सोबत त्या घटकाच्या मार्गदर्शन व्हिडिओची लिंक दिली आहे. तो पाहून आपण सराव प्रश्नपत्रिका सोडवू शकता. यामुळे आपला सराव होईल आणि शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी होईल.
आपण सर्वजण दि. १२ फेब्रुवारी २०२३ रोजी होणाऱ्या इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करत आहात. या तयारीमध्ये आपणास मदत म्हणून आम्ही दि. १२ डिसेंबर २०२२ पासून ऑनलाइन सराव प्रश्नपत्रिका उपक्रम सुरू केला आहे. रोज तुम्हाला एका विषयाच्या एका घटकावर सराव चाचणी दिली जाते. सोबत त्या घटकाच्या मार्गदर्शन व्हिडिओची लिंक दिली आहे. तो पाहून आपण सराव प्रश्नपत्रिका सोडवू शकता. यामुळे आपला सराव होईल आणि शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी होईल.
So be ready for this.
दिवस सहविसावा सराव चाचणी - 46
दि. 13/01/2023
विषय - गणित
घटक - भूमिती - वर्तुळ, परिमिती व क्षेत्रफळ
मार्गदर्शन व्हिडिओची लिंक
सराव चाचणी प्रश्नपत्रिका लिंक
सराव चाचणी प्रश्नपत्रिका लिंक
वरील घटकावरील प्रश्न सोडविताना खालील बाबींचा नक्की अभ्यास करा.
महत्त्वाचे मुद्दे......
भूमिती -
✅ वर्तुळ :
👉त्रिज्या - वर्तुळाचा केंद्रबिंदू व वर्तुळावरील कोणताही एक बिंदू जोडणाऱ्या रेघेला वर्तुळाची त्रिज्या असे म्हणतात.
एका वर्तुळाला असंख्य त्रिज्या असतात. या सर्व त्रिज्यांची लांबी समान असते.
👉जीवा - वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणाऱ्या रेघेला त्या वर्तुळाची जीवा असे म्हणतात.
एका वर्तुळाला असंख्य जीवा असतात व त्या असमान लांबीच्या असू शकतात.
👉 व्यास - वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जाणाऱ्या जीवला त्या वर्तुळाचा व्यास असे म्हणतात.
एका वर्तुळाला असंख्य व्यास असतात व ते सर्व व्यास समान लांबीचे असतात.
व्यास ही वर्तुळाची सर्वात मोठी जीवा आहे.
👉 त्रिज्या व व्यास यांमधील संबंध:
व्यास = 2 x त्रिज्या आणि त्रिज्या = व्यास ÷ 2
👉 परीघ - वर्तुळाच्या कडेची लांबी म्हणजे वर्तुळाचा परीघ होय.
👉 वर्तुळाचा अंतर्भाग व बाह्यभाग :
वर्तुळाच्या त्रिज्येइतक्या अंतरावर असलेले बिंदू वर्तुळाच्या कडेवर म्हणजेच वर्तुळावर असतात.
वर्तुळाकार कडेच्या आतील भागाला वर्तुळाचा अंतर्भाग असे म्हणतात.
वर्तुळाच्या त्रिज्येपेक्षा कमी अंतरावर असलेले बिंदू वर्तुळाच्या अंतर्भागात असतात.
वर्तुळाच्या बाहेरील भागाला वर्तुळाचा बाह्यभाग असे म्हणतात.
वर्तुळाच्या त्रिज्येपेक्षा जास्त अंतरावर असणारे बिंदू वर्तुळाच्या बाह्यभागात असतात.
👉 वर्तुळकंस - वर्तुळावरील दोन बिंदूंमुळे वर्तुळाचे दोन भाग झाले आहेत. या प्रत्येक भागाला वर्तुळकंस असे म्हणतात.
✅ परिमिती : बंदिस्त आकृतीच्या सर्व बाजूच्या लांबीची बेरीज म्हणजे त्या आकृतीची परिमिती होय.
👉 परिमितीसंबंधी सूत्रे
(I) त्रिकोणाची परिमिती = त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंच्या लांबीची बेरीज
(2) आयताची परिमिती = 2 × लांबी + 2 x रुंदी (3) चौरसाची परिमिती = 4 × बाजूची लांबी
(4) बहुभुजाकृतीची परिमिती = बहुभुजाकृतीच्या सर्व बाजूच्या लांबींची बेरीज
✅ क्षेत्रफळ : (आयत, चौरस)
👉एखाद्या आकृतीने पृष्ठभागावर व्यापलेल्या जागेचे माप म्हणजे त्या आकृतीचे क्षेत्रफळ होय.
👉चौरस सेंटिमीटर (चौसेमी), चौरस मीटर (चौमी), चौरस किलोमीटर (चौकिमी) ही क्षेत्रफळाची प्रमाणित एकके आहेत.
👉 क्षेत्रफळाची सूत्रे :
(1) आयताचे क्षेत्रफळ = लांबी x रुंदी
(2) चौरसाचे क्षेत्रफळ = बाजूची लाबी × बाजूची लांबी = बाजू × बाजू
🙏 धन्यवाद!🙏
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please do not enter any spam link in the comment box.