Breaking

सोमवार, १६ जानेवारी, २०२३

शिष्यवृत्ती परीक्षा सराव चाचणी मालिका | सराव चाचणी क्र 48 | गणित | भूमिती - त्रिमिती वस्तू, आकृतीबंध, इष्टीकाचिती व घन

    

इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेची ऑनलाइन सराव प्रश्नपत्रिका मालिका

Scholarship Practice Test
विद्यार्थी मित्रांनो,  
आपण सर्वजण दि. १२ फेब्रुवारी २०२३ रोजी होणाऱ्या इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करत आहात. या तयारीमध्ये आपणास मदत म्हणून आम्ही दि. १२ डिसेंबर २०२२ पासून नलाइन सराव प्रश्नपत्रिका उपक्रम सुरू केला आहे. रोज तुम्हाला एका विषयाच्या एका घटकावर सराव चाचणी दिली जाते. सोबत त्या घटकाच्या मार्गदर्शन व्हिडिओची लिंक दिली आहे. तो पाहून आपण सराव प्रश्नपत्रिका सोडवू शकता. यामुळे आपला सराव होईल आणि शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी होईल.
So be ready for this. 

दिवस सहविसावा सराव चाचणी - 48
दि. 16/01/2023

विषय -  गणित 
घटक - भूमिती - त्रिमिती वस्तू, आकृतीबंध, इष्टीकाचिती व घन  

मार्गदर्शन व्हिडिओची लिंक 

सराव चाचणी प्रश्नपत्रिका लिंक


सराव प्रश्नपत्रिका येथे सोडवा.

वरील घटकावरील प्रश्न सोडविताना खालील बाबींचा नक्की अभ्यास करा.

महत्त्वाचे मुद्दे......  
भूमिती -
✅ क्षेत्रफळ : आयत, चौरस
1. एखाद्या आकृतीने पृष्ठभागावर व्यापलेल्या जागेचे माप म्हणजे त्या आकृती क्षेत्रफळ होय. 
2. चौरस सेंटिमीटर (चौसेमी), चौरस मीटर (चौमी), चौरस किलोमीटर (चौकिमी) ही प्रमाणित एकके आहेत.
3. क्षेत्रफळाची सूत्रे
(1) आयताचे क्षेत्रफळ = लांबी × रुंदी
(2) चौरसाचे क्षेत्रफळ = बाजूची लांबी × बाजूची लांबी = बाजू × बाजू

इष्टिकाचिती व घन- पृष्ठे, कडा, शिरोबिंदू
(1) इष्टिकाचिती
(a) इष्टिकाचितीला 6 आयताकार पृष्ठे 8 शिरोबिंदू व 12 कडा असतात.
(b) इष्टिकाचितीची समोरासमोरची पृष्ठे समान असतात.
(c) समोरासमोरील कडा समान लांबीच्या असतात.

(2) घन
(a) धनाला 6 चौरसाकार पृष्ठे असतात. 
(b) 8 शिरोबिंदू व 12 कडा असतात.
(c) धनाची सर्व पृष्ठे समान असतात.
(d) घनाच्या सर्व कडा समान लांबीच्या असतात.

त्रिमिती वस्तू व घडणी
1. द्विमितीय वस्तू ज्या वस्तूंना फक्त लांबी व रुंदी असते. पण जाडी नसते किंवा अगदी नगण्य असते अशा वस्तूंना द्विमितीय वस्तू असे म्हणतात. 
2. त्रिमितीय वस्तू ज्या वस्तूंना लाबी, रुंदी व जाडी असते त्या वस्तूंना त्रिमितीय वस्तू असे म्हणतात.
उदा., पुस्तक, पाण्याची बाटली, कपाट, चेंडू इत्यादी • त्रिमितीय वस्तू वेगवेगळ्या बाजूनी पाहिल्या असता वेगवेगळ्या दिसतात.
3. घडणी जो दद्विमितीय आकार त्यावरील पयांवर दुमडला असता, त्यापासून विमितीय आकार मिळतो. त्या द्विमितीय आकारास मिळालेल्या त्रिमितीय आकाराची घडण असे म्हणतात.
एखादा त्रिमितीय आकाराचे दविमितीय रेखाटन म्हणजे घडण होय.

आकृतिबंध
वेगवेगळे आकार, आकृत्या, संख्या यांची विशिष्ट क्रमाने पुनरावृत्ती होते व त्यांतून आकृतिबंध तयार होती. 
उदा. 3, 6, 9 या आकृतिबंधातील पुढची संख्या मिळवण्यासाठी 9 मध्ये 3 मिळवावे लागतील. या आकृतिबंधातील संख्या 3 च्या टप्प्याने येणाऱ्या संख्या आहेत.

        🙏 धन्यवाद!🙏

या उपक्रमाबाबत दररोजचे अपडेट आणि माहिती मिळविण्यासाठी खालील Social Media Icon वर करून आजच आमचा ग्रुप जॉईन करा.   

       


सदर उपक्रमातील सर्व सराव चाचणी प्रश्न पत्रिका मिळविण्यासाठी येथे क्लिक करा. 

Find All Practice Test Here 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please do not enter any spam link in the comment box.