Breaking

मंगळवार, ३ जानेवारी, २०२३

शिष्यवृत्ती परीक्षा सराव चाचणी मालिका | सराव चाचणी क्र 26 | गणित | अपूर्णांकांवरील क्रिया

        

इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेची ऑनलाइन सराव प्रश्नपत्रिका मालिका

Scholarship Practice Test
विद्यार्थी मित्रांनो, 
आपण सर्वजण दि. १२ फेब्रुवारी २०२३ रोजी होणाऱ्या इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करत आहात. या तयारीमध्ये आपणास मदत म्हणून आम्ही दि. १२ डिसेंबर २०२२ पासून नलाइन सराव प्रश्नपत्रिका उपक्रम सुरू केला आहे. रोज तुम्हाला एका विषयाच्या एका घटकावर सराव चाचणी दिली जाते. सोबत त्या घटकाच्या मार्गदर्शन व्हिडिओची लिंक दिली आहे. तो पाहून आपण सराव प्रश्नपत्रिका सोडवू शकता. यामुळे आपला सराव होईल आणि शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी होईल.
So be ready for this.

दिवस तेविसावा सराव चाचणी - 26
दि. 03/01/2023

विषय -  गणित 
घटक - अपूर्णांकांवरील क्रिया

मार्गदर्शन व्हिडिओची लिंक 

सराव चाचणी प्रश्नपत्रिका लिंक

सराव प्रश्नपत्रिका येथे सोडवा.

वरील घटकावरील प्रश्न सोडविताना खालील बाबींचा नक्की अभ्यास करा.

महत्त्वाचे मुद्दे......  

अपूर्णांकांवरील क्रिया
समच्छेद अपूर्णांकांची बेरीज : समच्छेद अपूर्णांकांची बेरीज करताना अपूर्णांकांच्या अंशांची बेरीज करतात व त्या अपूर्णांकांचा छेद बेरजेच्या छेदस्थानी तसाच लिहितात.

लक्षात ठेवा - ज्या अपूर्णांकाचा अंश व छेद समान असतात, त्या अपूर्णांकाची किंमत असते.

समच्छेद अपूर्णांकांची वजाबाकी : समच्छेद अपूर्णांकांची वजाबाकी करताना त्या अपूर्णांकांच्या अंशांची वजाबाकी वजाबाकीच्या छेदस्थानी त्या अपूर्णांकांचा छेद तसाच लिहितात.

'किती भाग कमी / जास्त', 'किती भाग उरला' हे काढताना मोठ्या भागातून लहान भाग वजा करावा लागतो.

भिन्न छेद अपूर्णांकांची बेरीज-वजाबाकी भिन्न छेद अपूर्णांकांची बेरीज-वजाबाकी करताना त्या अपूर्णाकांचे समच्छेद अपूर्णांकांत रूपांतर करावे लागते.

अपूर्णांकांचा गुणाकार : अपूर्णाकांचा गुणाकार करताना त्यांच्या अंशांचा गुणाकार करून तो अंशस्थानी व छेदांचा गुणाकार छेदस्थानी लिहितात.

दशांश अपूर्णांकांची बेरीज-वजाबाकी :
दशांश अपूर्णांकांची बेरीज : दिलेल्या संख्यांतील दशांशचिन्ह दशांशचिन्हाखालीच येईल, याप्रमाणे संख्यांची मांडणी करून बेरीज करावी व उत्तरात दशांशचिन्हाखालीच दशांशचिन्ह मांडावे.

दशांश अपूर्णांकांची वजाबाकी : दिलेल्या संख्यांतील दशांशचिन्ह दशांशचिन्हाखालीच येईल, याप्रमाणे संख्यांची मांडणी करून वजाबाकी करावी व उत्तरात दशांशचिन्हाखालीच दशांशचिन्ह मांडावे.

दशांश अपूर्णांकात उजव्या बाजूच्या शेवटच्या अंकापुढे कितीही शून्ये लिहिली, तरी त्या अपूर्णांकाची किंमत बदलत नाही.

        🙏 धन्यवाद!🙏

या उपक्रमाबाबत दररोजचे अपडेट आणि माहिती मिळविण्यासाठी खालील Social Media Icon वर करून आजच आमचा ग्रुप जॉईन करा.   

       


सदर उपक्रमातील सर्व सराव चाचणी प्रश्न पत्रिका मिळविण्यासाठी येथे क्लिक करा. 

Find All Practice Test Here 





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please do not enter any spam link in the comment box.