इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेची ऑनलाइन सराव प्रश्नपत्रिका मालिका
विद्यार्थी मित्रांनो,
आपण सर्वजण दि. १२ फेब्रुवारी २०२३ रोजी होणाऱ्या इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करत आहात. या तयारीमध्ये आपणास मदत म्हणून आम्ही दि. १२ डिसेंबर २०२२ पासून ऑनलाइन सराव प्रश्नपत्रिका उपक्रम सुरू केला आहे. रोज तुम्हाला एका विषयाच्या एका घटकावर सराव चाचणी दिली जाते. सोबत त्या घटकाच्या मार्गदर्शन व्हिडिओची लिंक दिली आहे. तो पाहून आपण सराव प्रश्नपत्रिका सोडवू शकता. यामुळे आपला सराव होईल आणि शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी होईल.
आपण सर्वजण दि. १२ फेब्रुवारी २०२३ रोजी होणाऱ्या इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करत आहात. या तयारीमध्ये आपणास मदत म्हणून आम्ही दि. १२ डिसेंबर २०२२ पासून ऑनलाइन सराव प्रश्नपत्रिका उपक्रम सुरू केला आहे. रोज तुम्हाला एका विषयाच्या एका घटकावर सराव चाचणी दिली जाते. सोबत त्या घटकाच्या मार्गदर्शन व्हिडिओची लिंक दिली आहे. तो पाहून आपण सराव प्रश्नपत्रिका सोडवू शकता. यामुळे आपला सराव होईल आणि शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी होईल.
So be ready for this.
दिवस तेविसावा सराव चाचणी - 25
दि. 03/01/2023
विषय - मराठी
घटक - भाषेचा व्यावहारिक उपयोग - संवाद, निर्देश व माहिती तंत्रज्ञान आधारित प्रश्न
मार्गदर्शन व्हिडिओची लिंक
सराव चाचणी प्रश्नपत्रिका लिंक
सराव चाचणी प्रश्नपत्रिका लिंक
वरील घटकावरील प्रश्न सोडविताना खालील बाबींचा नक्की अभ्यास करा.
महत्त्वाचे मुद्दे......
✅ भाषेचा व्यवहारात उपयोग
✅ संवादावर आधारित प्रश्न
■ दोन किंवा अधिक व्यक्तिंमधील झालेले संभाषण म्हणजे संवाद
■ संवाद पूर्ण वाचा..
■ संवाद वाचताना सहभागी व्यक्ती, स्थळ, वेळ, प्रसंग इत्यादी गोष्टी लक्षात घ्या.
■ संवादाच्या वेळी उपस्थित असलेले व प्रत्यक्ष भाग घेतलेले या दोन्ही गोष्टींकडे लक्ष दया.
■ हसणे, डोळे मिचकावणे, पाहणे, मान डोलावणे या शारीरिक कृती आहेत. फक्त यासाठीच उल्लेख असल्यास संबंधीत व्यक्तीने संवादात भाग घेतला असेलच असे नाही.
✅ निर्देश
■ या उपघटकामध्ये दिलेल्या सूचनेप्रमाणे बदल करणे किंवा सूचनांचे पालन करणे अपेक्षित असते.
■ या उपघटकामध्ये योग्य शब्दांचा वापर करून वाक्य पूर्ण करा, अचूक पर्याय निवडा असे प्रश्न विचारले जातात.
✅ सुसंगत वाक्यांचा परिच्छेद
■ परिच्छेदात एकमेकांना सुसंगत असणारी वाक्ये असतात. वरच्या वाक्याशी संबंधित असे खालचे वाक्य असते. सुसंगत परिच्छेद २-३ वाक्यांचे असतात.
■ हा प्रश्न सोडविताना वाक्याचा क्रम, त्यातील क्रियांचा क्रम लक्षात घ्या.
■ बऱ्याचदा दुसऱ्या वाक्याचा क्रम पहिल्या वाक्याशी संबंधीत असतो.
■ सुसंगत परिच्छेदातील सगळी वाक्ये वाचून वाक्यांचा संबंध लक्षात घेऊनच उत्तरे निश्चित करा.
✅ तसेच वाक्यांच्या वेगवेगळया भागातील चुकीचा भाग ओळखणे यावर आधारित सुद्धा प्रश्न विचारले जातात.
✅ सर्वोत्कृष्ट विकल्प निवडून वाक्यं पूर्ण करणे यावर आधारित प्रश्न विचारले जातात.
✅ माहिती तंत्रज्ञान विषयक व मराठी भाषेत वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द शोधणे
■ माहिती तंत्रज्ञान विषयक शब्दांचा परिचय (पर्यायी मराठी शब्द, वापर, इ) यावर प्रश्न विचारले जातात.
जसे - इन्फर्मेशन - माहिती
टेक्नॉलॉजी - तंत्रज्ञान
कंम्प्यूटर - संगणक
🙏 धन्यवाद!🙏
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please do not enter any spam link in the comment box.