Breaking

मंगळवार, २७ डिसेंबर, २०२२

शिष्यवृत्ती परीक्षा सराव चाचणी मालिका | सराव चाचणी क्र 16 | बुद्धिमत्ता चाचणी | तर्कसंगती अनुमान : भाषिक व अभाषिक - वय, नातेसंबंध, इतर व आकृत्या मोजणे.

       

इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेची ऑनलाइन सराव प्रश्नपत्रिका मालिका

Scholarship Practice Test
विद्यार्थी मित्रांनो, 
आपण सर्वजण दि. १२ फेब्रुवारी २०२३ रोजी होणाऱ्या इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करत आहात. या तयारीमध्ये आपणास मदत म्हणून आम्ही दि. १२ डिसेंबर २०२२ पासून नलाइन सराव प्रश्नपत्रिका उपक्रम सुरू केला आहे. रोज तुम्हाला एका विषयाच्या एका घटकावर सराव चाचणी दिली जाते. सोबत त्या घटकाच्या मार्गदर्शन व्हिडिओची लिंक दिली आहे. तो पाहून आपण सराव प्रश्नपत्रिका सोडवू शकता. यामुळे आपला सराव होईल आणि शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी होईल.
So be ready for this.

दिवस सोळवा सराव चाचणी - 16 
दि. 27/12/2022 
विषय -  बुद्धिमत्ता चाचणी  
घटक - तर्कसंगती अनुमान  : भाषिक व अभाषिक - वय, नातेसंबंध, इतर व आकृत्या मोजणे.   

मार्गदर्शन व्हिडिओची लिंक 

सराव चाचणी प्रश्नपत्रिका लिंक

सराव प्रश्नपत्रिका येथे सोडवा.

वरील घटकावरील प्रश्न सोडविताना खालील बाबींचा नक्की अभ्यास करा.
महत्त्वाचे मुद्दे......  

तर्कसंगती व अनुमान
संकल्पना : आपल्या अनुभवाला येणाऱ्या घटना किंवा माहिती किंवा सूचना आपण आधी समजून घेतो. मग त्यावर विचार करतो, तर्क करतो. टप्प्याटप्प्याने तर्काची मांडणी केल्यावर आपण योग्य निष्कर्षापर्यंत पोहोचतो. या प्रक्रियेत अचूक तर्क करण्याची आपली क्षमता विकसित होते.

या घटकातील 'भाषिक' या भागात आपल्यासमोर शब्दस्वरूपात येणारी माहिती वाचून, त्यावर तर्क करून विद्यार्थ्याने योग्य अनुमान काढायचे असते. 'अभाषिक' या भागात काही आकृत्या पाहून, त्याबाबत योग्य तर्क करून विदयार्थ्यांने अनुमान काढायचे असते.

तर्कसंगती व अनुमान (भाषिक) - 1. वय : या उपघटकातील प्रश्नांमध्ये दोन किंवा तीन व्यक्तींच्या वयांची तुलना केलेली असते. एखाद्या व्यक्तीचे वय, जन्मवर्ष किंवा जन्मतारीख यात दिलेली असते. या माहितीच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार विद्यार्थ्याने योग्य निष्कर्षापर्यंत पोहोचायचे असते.

महत्वाचे :
(1) एकापेक्षा अधिक व्यक्तींचे काही वर्षांनंतरचे किंवा काही वर्षांपूर्वीचे एकूण वय काढताना प्रत्येक व्यक्तीचे वय तितक्या वर्षांनी वाढवावे किंवा कमी करावे.
(2) दोन किंवा अधिक व्यक्तींच्या वयांतील फरक नेहमी कायम राहतो.

तर्कसंगती व अनुमान (भाषिक) - 2. नातेसंबंध : या उपघटकातील प्रश्नात कौटुंबिक नातेसंबंध यांवर आधारित प्रश्न दिलेले असतात. दिलेल्या माहितीचे विश्लेषण करून, प्रश्नात विचारलेल्या दोन व्यक्तींमधील नातेसंबंध शोधून काढायचा असतो.

महत्वाचे : कुटुंबातील सदस्यांचे परस्परांशी असलेले नाते (आई-वडील, भाऊ-बहीण, आजी-आजोबा) तसेच नजिकचे नातेवाईक (काका-काकी, मामा-मामी, मावशी, आत्या आणि त्यांची मुले वगैरे) यांच्याशी असलेले नाते यांबद्दल ज्ञान असणे आवश्यक असते.

तर्कसंगती व अनुमान (भाषिक) - 3. इतर : यामध्ये काहीवेळा तुलना, घटना, नामबदल, घड्याळ, योग्य विधान, पदावली वगैरे उपघटकांतील प्रश्न विचारले जातात.

महत्वाचे : 
(1) तुलना करताना गणितातील व या चिन्हांचा वापर करा.
(2) घटनांचा योग्य क्रम समजण्यासाठी दिलेली माहिती कागदावर तक्त्याच्या स्वरूपात मांडा.
(3) एखाद्या शब्दात केलेला नामबदल त्या शब्दाच्या पुढे बाण दाखवून नोंदवा.
(4) घड्याळात मिनिटकाटा 12 वर असेल तेव्हा पूर्ण वेळ आणि मिनिटकाटा 6 वर असेल तेव्हा अर्धी वेळ झालेली असते.
(5) योग्य विधान शोधताना दिलेला प्रत्येक पर्याय विधानांशी ताडून पाहा.
(6) पदावालीमधील ठरावीक अक्षरे वा चिन्हे एकत्र आणून त्यांच्या किमती भरा व सोडवा.

तर्कसंगती व अनुमान (अभाषिक) - आकृत्या मोजणे : या घटकातील प्रश्नात एक आकृती दिली जाते. या आकृतीमधून रेषाखंड, कोन, त्रिकोण, चौकोन, वर्तुळ अशा विविध प्रकारच्या भौमितिक रचना बनतात. विद्यार्थ्यांने लक्षपूर्वक या रचनांची संख्या मोजून लिहायची असते.


        🙏 धन्यवाद!🙏

या उपक्रमाबाबत दररोजचे अपडेट आणि माहिती मिळविण्यासाठी खालील Social Media Icon वर करून आजच आमचा ग्रुप जॉईन करा.   

       


सदर उपक्रमातील सर्व सराव चाचणी प्रश्न पत्रिका मिळविण्यासाठी येथे क्लिक करा. 

Find All Practice Test Here 





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please do not enter any spam link in the comment box.