Breaking

शनिवार, २६ सप्टेंबर, २०२०

अध्ययन अध्यापन साप्ताहिक अहवाल पोर्टलवर कसा भरावा ?

अध्ययन अध्यापन साप्ताहिक अहवाल 

पोर्टलवर कसा भरावा ?

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, पनवेल, जि. रायगड


कोरोना प्रदुर्भावाच्या कालावधीमध्ये देखील राज्यातील हजारो शिक्षक हे वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्याना शिक्षण प्रवाही ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. विद्यार्थ्यांच्या घरी भेटी देऊन असेल, फोनच्या माध्यमातून संपर्क करून Community Classes मध्ये किंवा घरी जाऊन तसेच गावातील सुशिक्षित तरुण, सरपंच, पोलीस पाटील, शिकलेल्या माता, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य “शिक्षक मित्र” बनून मुलांच्या शिक्षणासाठी विविध प्रकारे सहकार्य करीत आहे. या आणि अशा विविध माध्यमांद्वारे शिक्षक प्रयत्न करत आहेत याचीच माहिती संकलन करण्यासाठीचा हे पोर्टल आहे. तरी आपल्या किंवा आपल्या शाळेमध्ये राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती सदरच्या पोर्टल वर आठवडानिहाय नोंदविण्यात यावे ही विनंती..!

-------------------------------------------------------------------------------------------------

■ पोर्टल लिंक


वरील पोर्टलवर जाऊन सुरुवातीला register या पर्यायावर क्लिक करून नोंदणी करावी. नोंदणी करतांना आपली माहिती चुकणार नाही याची काळजी घ्यावी, एका शिक्षकाला एकदाच नोंदणी करायची असून आपण नमूद केलेला मोबाईल क्रमांक व तयार केलेला पासवर्ड जपून ठेवावा.
OTP क्रमांक हा आपल्या मोबाईलवर येण्यास थोडा कालावधी लागतो त्यामुळे पुन्हा पुन्हा प्रयत्न केल्यास काही कालावधीसाठी restrict केले जाऊ शकते.

-------------------------------------------------------------------------------------------------

ज्यांना रजिस्ट्रेशन करतांना अडचणी येत असतील त्यांनी खालील लिंकवर क्लिक करावे.

◆लिंक भरताना शासनाने निर्गमित केलेल्या पत्राचे पूर्ण वाचन करावे तसेच साप्ताहिक माहिती भरताना दिलेल्या प्रश्नांची काळजीपूर्वक माहिती भरावी कारण एकदा माहिती भरल्यानंतर एडिट करता येणार नाही.

■ फॉर्म कोणी भरावा?
👉 सर्व व्यवस्थापन,सर्व माध्यमाच्या शाळांमधील शिक्षक,मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक,उपप्राचार्य, प्राचार्य
वरील प्रत्येकाला ही माहिती भरायची आहे.

■ फॉर्म कधी भरावा?
👉 आठवड्याच्या  दर शनिवारी 

■ माहिती कशी भरावी?
👉माहिती वस्तुनिष्ठ व वस्तुस्थिती दर्शक भरावी.दररोज अध्ययन अध्यापन केलेल्या कामाची साप्ताहिक सरासरी काढून माहिती भरावी.

■ एका पेक्षा जास्त वर्ग असल्यास..
👉 एकापेक्षा जास्त वर्ग अध्यापन करीत असल्यास add new या पर्यायावर क्लिक करून वर्ग add करावे आणि माहिती भरावी.

■ एकाच वर्गातील विषय अनेक शिक्षक शिकवीत असल्यास त्यांनीसुद्धा माहिती भरावी का?
👉 होय,प्रत्येकाने एक विषय शिकवित असले तरी माहिती भरावी.

-------------------------------------------------------------------------------------------------

शासकीय पत्र व माहिती कशी भरावी याची माहिती व 
जिल्हा निहाय मदतीसाठी संपर्क क्रमांक दिलेले आहेत.

-------------------------------------------------------------------------------------------------

व्हिडिओ स्वरूपात मार्गदर्शन येथे उपलब्ध आहे.

-------------------------------------------------------------------------------------------------

रायगड जिल्ह्यातील शिक्षकांना फॉर्म भरताना काही अडचण असल्यास 
श्री. राकेश आहिरे, 9702116583
श्री. गणेश कूताळ, 9224188162
विषय सहाय्यक,
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, 
पनवेल, जि. रायगड 
यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
ICT DEPARTMENT
DIET PANVEL, RAIGAD

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please do not enter any spam link in the comment box.