Breaking

गुरुवार, २ जुलै, २०२०

विशिंग, स्मिशिंग व त्याबाबत काळजी काय घ्यावी ?

विशिंग, स्मिशिंग व त्याबाबत काळजी काय घ्यावी ?

मागील भागात आपण पहिले की फिशिंग म्हणजे काय व त्यासाठी काय सुरक्षा बाळगावी. फिशिंग या सायबर हल्ल्याची प्रकरणे वाढत असल्याने त्यांना वर्गीकृत करण्याची गरज भासू लागली. फिशिंग चे वर्गीकरण करताना त्याच्या स्वरूपावरून करण्याचे योग्य ठरेल असे तज्ज्ञांना वाटले. आणि सर्व फिशिंग प्रकरणे ही तीन प्रकारात वर्गीकृत करण्यात आली. ते तीन प्रकार म्हणजे फिशिंग, विशिंग आणि स्मिशिंग होय.

विशिंग, स्मिशिंग व त्याबाबत काळजी काय घ्यावी
Image by http://blog.logix.in via Google


फिशिंग -

इलेक्ट्रोनिक संदेशाद्वारे घडणारे सायबर हल्ले या प्रकारात मोडतात. त्याबाबत सविस्तर माहिती साठी खालील लिंक वरील पोस्ट नक्की वाचा.

फिशिंग – एक सायबर हल्ला आणि सुरक्षा


विशिंग –

फिशिंग मधलाच दुसरा प्रकार म्हणजे विशिंग. विशिंग हा सायबर हल्ला प्रत्यक्ष फोन करून आपणास बळी पाडले जाते. यात प्रत्यक्ष voice call द्वारे घडत असल्याने याला Vishing असे म्हटले जाते. खोटे कॉल करून आपणास यात फसविण्याचा प्रयत्न असतो.

स्मिशिंग –

फिशिंग मधील तिसरा प्रकार म्हणजे स्मिशिंग. हा सायबर हल्ला SMS द्वारे घडत असतो म्हणून त्यास Smishing असे म्हणतात. यामध्ये खोटे SMS पाठवून आपणास फसविण्याचा प्रयत्न असतो. स्मिशिंग द्वारे लोकांना त्यांच्या फसव्या लिंक कडे आकर्षित केले जाते. आपण त्या लिंकला ओपन केले की आपली माहिती घेतली जाते शेवटी 10 लोकांना किवा ग्रुपला शेअर करायला सांगितले जाते. म्हणजे त्यांची ती लिंक आपणच प्रसारित करून त्यांचा फायदा करून देत असतो. त्या लिंकद्वारे आर्थिक नुकसान जरी झाले नाही तरी आपण त्या लिंक भरताना जाहिरात द्वारे हल्लेखोर फायदा घेत असतो. कारण त्यावर भरपूर जाहिराती दिसत असतात.

विशिंग व स्मिशिंग चे स्वरूप –

  • या प्रकारात एखाद्या बड्या कंपनीच्या नावाने आपणास कॉल व SMS केला जातो.
  • कॉल व SMS करून आमिष किवा भीती दाखवून आपणास फसविण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. जसे की आपले क्रेडीट कार्ड ब्लॉक केले आहे. तुम्हाला कंपनी कडून गिफ्ट देऊ करत आहोत.
  • SMS द्वारे फसव्या खोट्या लिंक पाठवून लोकांना त्या भरण्यास भाग पाडले जाते. जसे JIO कंपनीने फ्री रिचार्ज दिला आहे, डिजिटल इंडिया मध्ये फ्री laptop देणार असे SMS येतात.
  • आपणास वेळ कमी आहे किवा लिमिटेड ऑफर सांगून विचार न करता होकार देण्यास बळी पाडतात.
  • आपल्याकडून आपली गोपनीय व वैयक्तिक माहिती मिळविण्याचा प्रयत्न करतात. जसे बँक माहिती, क्रेडीट व डेबिट कार्ड माहिती, पासवर्ड, पिन वैगरे

विशिंग व स्मिशिंग पासून कसे वाचावे ?

  • कोणालाही फोन वर किवा लिंक वर आपली वैयक्तिक व गोपनीय माहिती देऊ नका. जसे बँक माहिती, क्रेडीट व डेबिट कार्ड माहिती, पासवर्ड, पिन वैगरे.
  • SMS द्वारे येणाऱ्या लिंक ओपन करताना काळजी घ्या.
  • एखादे आमिष किवा भीती कोणी CALLSMS दाखवत असेल तर त्यावर विश्वास ठेऊ नका. त्याबाबत संबंधित व्यक्तीशी संपर्क साधून सत्यता पडताळा.
  • कोणतीही बँक किवा संस्था आपल्या गोपनीय माहिती बाबत विचारणा करत नाही. जसे पासवर्ड, पिन इ.
  • आपला पिन व पासवर्ड कोणालाही व कधीही सांगू नका. भले तो बँकेचा Manager असो.
  • पासवर्ड व पिन ही आपली खाजगी व गोपनीय माहिती असते. ती गुपित तेवली तर आपण बऱ्याच अंशी सुरक्षित राहू शकतो. 

४ टिप्पण्या:

Please do not enter any spam link in the comment box.