Breaking

सोमवार, ६ जुलै, २०२०

हे करा म्हणजे सोशल मीडिया वर सुरक्षित व्हाल.

हे करा म्हणजे सोशल मीडिया वर सुरक्षित व्हाल.

हे करा म्हणजे सोशल मीडिया वर सुरक्षित व्हाल.

मागील सोशल मीडिया - सायबर हल्ल्याचे मुख्य द्वार या लेखामध्ये आपण पहिले की कशाप्रकारे सोशल मीडिया चा वापर करून आपल्यावर सायबर हल्ले केले जातात. तर आज जाणून घेऊ यात की त्यापासून आपण आपला बचाव कसा करू शकतो. सोशल मीडिया वर कोणती काळजी घ्यावी. गोपनीयता सेटिंग्ज कशी नियंत्रित करावी ? फेसबुक व व्हॉट्सअ‍ॅप वर काय गोपनीयता सेटिंग्ज आहेत. ज्यांचा वापर करून सायबर हल्लेखोरांना आपण आपल्या पासून दूर ठेऊ शकतो. सर्वांनी या प्रमाणे बदल करून घेतले की नक्कीच सुरक्षित व्हाल.

हे पण वाचा | सोशल मीडिया - सायबर हल्ल्याचे मुख्य द्वार

सोशल मीडिया वर कोणती काळजी घ्यावी.

  • आपण सोशल मीडियावर मित्र विनंती स्वीकारताना व्यक्तीचा प्रामाणिकपणा तपासा.
  • काही गोपनीयता सेटिंग्ज वापरा जसे आपले फोटो आणि क्रियाकलाप केवळ आपल्या कुटुंबिय आणि जवळच्या मित्र यांनाच शेअर करणे.
  • सोशल मीडिया साइट निवडतानागोपनीयता समस्या विचारात घ्याव्याकुठलीही पोस्ट करण्यापूर्वीचॅट करण्यापूर्वीअपलोड किंवा डाउनलोड करण्यापूर्वी विचार करा व योग्य असल्यास मगच पुढे जा.
  • जर आपण मीडिया साइटवर भेटलेल्या व्यक्तीस भेटू इच्छित असाल तर आपल्या वडिलांना / पती / भावाच्या किंवा कुटुंबातील सदस्यांच्या परवानगीने किंवा त्यांना सांगून जा, जेणेकरून ते आपल्याला काही सूचना देऊ शकतील आणि आपण कोणाशी भेटता हे देखील त्यांना माहीत असेल.
  • आपल्या सोशल मीडिया खात्यावरील माहिती मध्ये कोणी छेडछाड किंवा माहिती चोरी केली आहे, असे जर वाटत असेल तर याची माहिती त्वरित आपल्या सोशल मीडिया साइटच्या हेल्प सेंटरकडे कळवा.
  • आपल्या प्रोफाइलवर पोस्ट केलेल्या त्रासदायक किंवा असभ्य टिपण्यांना कधीही प्रतिसाद देऊ नका.
  • आपले नावकंपनी-घरचा पत्ताफोन नंबरवयलिंगक्रेडिट – डेबिट कार्ड ची माहिती यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती देऊ किंवा पोस्ट करू नका.
  • कोणालाही आपला संकेतशब्द (पासवर्ड) देऊ नका.
  • सोशल मीडिया साइट्समध्ये आपल्या मित्रांची अशी माहिती पोस्ट करू नकाकी ज्यामुळे कदाचित त्यांना धोका होऊ शकेल.
  • अनोळखी लोकांसोबत वेबकॅम चा वापर करू नका.
  • सोशल मीडिया साइट्समध्ये आपण करणार असलेल्या योजना आणि क्रियाकलाप पोस्ट करणे टाळा.
  • सोशल मीडिया साइट्सद्वारे आपल्याला मिळणाऱ्या दुव्यांवर क्लिक करू नका. आणि जर आपण त्या साइटला भेट देऊ इच्छित असल्यास थेट मूळ वेबसाइट्सवरून जा.

सोशल मीडिया साइट्सवरील गोपनीयता सेटिंग्ज कशी नियंत्रित करू शकता ?

  • सोशल मीडिया साइट्समध्येडीफॉल्ट सेटिंगनुसार सर्व गोष्टी सार्वजनिक होतातत्यामुळे आपल्या सुरक्षिततेसाठी असलेल्या बर्याच गोपनीयता सेटिंग्ज त्यांनी दिलेल्या असतातत्यामुळे त्यांचा वापर करून आपण बर्याच समस्यांपासून स्वतःचे संरक्षण करू शकतो म्हणून  सर्व सुविधा वापरणे आवश्यक आहे.
  • आपण आपल्या पोस्ट / व्हिडिओ / गतिविधी या करिता अनोळखी लोकांना प्रतिबंधित घालू शकतो आणि गोपनीयता सेटिंग्ज मध्ये फक्त मी असा पर्याय वापरुन आपल्या संपर्कात असलेल्या आपल्या सदस्यांना शेअर करू शकता.
  • आपण मित्र विनंती पर्याय बंद करू शकतोजेणेकरून कोणीही आपल्याला विनंती पाठवू शकणार नाही.
  • आपण टिप्पणी विभागातील लोकांना प्रतिबंधित करू शकतो जेणेकरून आपल्या संपर्कातील सदस्य केवळ आपल्या क्रियाकलापावर टिप्पणी देऊ शकतील.
  • आपण अपरिचित व्यक्तीं करिता आपली वैयक्तिक / व्यावसायिक माहिती प्रतिबंधित करू शकता.
  • आपण आपला ऑनलाइन मोड बंद करू शकतो जेणेकरून आपण किती वेळ आणि कधी ऑनलाइन आहे हे कोणालाही कळू शकणार नाही.
  • कोठेही लॉग इन केल्यानंतर तेथून लॉग आउट होण्याचे लक्ष्यात ठेवा.
  • अनोळखी व्यक्तींशी WhatsApp video call वरून बोलणे टाळा कारण या call संदर्भात कोणताही रेकॉर्ड राहत नाही.

फेसबुक वरील सेटिंग्ज कोणत्या ?

फेसबुक वर Two Factor Authentication सुरु करावे.

त्यासाठी फेसबुक वरील Setting या option मध्ये जा. तिथे Security and Login मधील Use Two Factor Authentication मध्ये आपला मोबाइल नंबर टाकून verify करून घ्यावा.


तुमचे अकाऊंट कोठे कोठे सुरु आहे ते पहा व अनावश्यक ठिकाणाहून बाहेर पडा.

त्यासाठी फेसबुक वरील Setting या option मध्ये जा. तिथे Security and Login मधील Where you're logged in या option मध्ये जा व खात्री करून घ्या.

 तेथे स्थान व device चे नाव दिसते. अनोळखी वाटत असल्यास लगेच लॉग आउट व्हा आणि पासवर्ड बदलून टाका.

फेसबुक वरील आपली प्रोफाईल ची गोपनीयता सेटिंग्ज करून घ्या.

त्यासाठी फेसबुक वरील Setting या option मध्ये जा. तिथे Privacy Setting मध्ये जा 
त्यातील your activityhow people find and contact you या दोन्ही ठिकाणी आपली प्रोफाईल कोण पाहिल ते ठरवा. तिथे सर्व ठिकाणी friends only व custom करणे सुरक्षित आहे public ठेवू नका.

व्हॉट्सअ‍ॅप वरील सेटिंग्ज कोणत्या ?

व्हॉट्सअ‍ॅप वर Two Step Verification सुरु करावे.

त्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप मधील Setting या option मध्ये जा. तिथे Account मधील Two Step Verification वर क्लिक करून मोबाइल नंबर सह verify करून घ्या.



कोणी कोणी आपली प्रोफाईल पाहावी हे ठरविणे.

त्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप मधील Setting या option मध्ये जा. तिथे Account मधील Privacy वर क्लिक करून सर्व ठिकाणी friends only ठेवणे सुरक्षित आहे. public ठेवू नये.

आपले अकाऊंट सुरक्षित करणे.

त्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप मधील Setting या option मध्ये जा. तिथे Account मधील Security वर क्लिक करून show security notification सुरु करून ठेवावे.


Tags : #cybersecurity, #socialmediasecurity, #howtosafe, #सायबरसुरक्षा 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please do not enter any spam link in the comment box.