Breaking

मंगळवार, ७ जुलै, २०२०

दिक्षा ॲप व JIO TV द्वारे शाळा बंद पण शिक्षण सुरु.......

दिक्षा ॲप व जिओ टिव्ही व सावनद्वारे शाळा बंद पण शिक्षण सुरु....... 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा बंद असल्यातरी राज्यातील मुलांचे शिक्षण थांबू नये यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून सातत्याने विविध प्रयत्न करण्यात येत आहेत.  या अंतर्गत राज्यभरातील विद्यार्थ्यांना घरपोच पाठ्यपुस्तके वितरण करण्यात आले आहे. राज्य शैक्षणिक संशोधनव प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र यांच्या मार्फत शैक्षणिक दिनदर्शिका विकसित करण्यात आले असून याच्या आधारे दिक्षा ॲप च्या साहाय्याने विद्याथी स्वयंअध्ययन करू शकतात. यासोबत “शाळा बंद शिक्षण आहे” ही अभ्यासमाला सुरू करण्यात आली असून याच्या सहाय्याने देखील राज्यातील मुले स्वयंअध्ययन करत आहेत.

 

दिक्षा ॲप व JIO TV द्वारे शाळा बंद पण शिक्षण सुरु.......

दिक्षा ॲपवर विषयवार, इयत्तावार आपणास सर्व व्हिडिओ पाहता येतात.

त्यासाठी वरील व्हिडिओ मार्गदर्शक ठरेल.

दिक्षा ॲप मोबाइल वर DOWNLOAD करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://play.google.com/store/apps/details?id=in.gov.diksha.app&hl=en_IN


इयत्तावर व्हिडीओ पाहण्यासाठी खालील इयत्तेवर क्लिक करा.

इयत्ता पहिली चे व्हिडिओ

इयत्ता दुसरी चे व्हिडिओ

इयत्ता तिसरी चे व्हिडिओ

इयत्ता चौथी चे व्हिडिओ

इयत्ता पाचवी चे व्हिडिओ

इयत्ता सहावी चे व्हिडिओ

इयत्ता सातवी चे व्हिडिओ

इयत्ता आठवी चे व्हिडिओ

इयत्ता नववी चे व्हिडिओ

इयत्ता दहावी चे व्हिडिओ

इयत्ता अकरावी चे व्हिडिओ

शैक्षणिक दिनदर्शिका मिळविण्यासाठी माध्यम वर क्लिक करा.

मराठी माध्यम 

http://www.maa.ac.in/shaikshanik-dindarshika/

 

उर्दू माध्यम

http://www.maa.ac.in/urdu-medium-shaikshanik-dindarshika/

 

या सर्व प्रयत्नांना पुढे घेऊन जात असताना विद्यार्थ्यांच्या समोर शिक्षणाचे विविध पर्याय उपलब्ध करून देण्याकरिता सद्यस्थितीत जिओ टीव्ही (JIO TV) च्या प्लॅटफॉर्मवर इयत्ता बारावी विज्ञान, इयत्ता दहावी (इंग्रजी माध्यम) व इयत्ता दहावी (मराठी माध्यम) यासाठीचे तीन "ज्ञानगंगा" चॅनेल  जिओ सावन या रेडीओच्या प्लॅटफॉर्मवर “आम्ही इंग्रजी शिकतो” (We Learn English) या रेडिओ कार्यक्रमाचे उद्घाटन दि. ०५ जुलै २०२० रोजी मा. प्रा. वर्षाताई गायकवाड, मंत्री, शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते ऑनलाईन बैठकीत करण्यात आले आहे. या तीन चॅनेलवरून दररोज ६ तास अध्यापनाच्या तासिका प्रक्षेपित केल्या जातील व तासिका व दिवसातील उर्वरित १८ तास पुनप्रक्षेपित केल्या जातील. याचे वेळापत्रक वेळोवेळी www.maa.ac.in या वेबसाईट सविस्तर प्रदर्शित केले जाणार आहे.

 

जिओ टी.व्ही वरील हे चॅनल पाहण्यासाठी

JIO TV पाहण्यासाठी JIO मोबाइल क्रमांक व इंटरनेट सुविधा आवश्यक

Playstore अथवा MY JIO app वरून Jio TV हे app डाऊनलोड करावे.

सदर app वर Login करण्यासाठी आपला jio मोबाइल क्रमांक व आलेला OTP टाकावा.

“Categories” या Option मधून  “Educational(६५)” हा Option निवडावा.

Scroll करीत आल्यास  ज्ञानगंगा १० वी मराठी, ज्ञानगंगा १० वी ENGLISH, ज्ञानगंगा १२ वी SCIENCE हे channel निवडावेत.

Jio TV मोबाइल वर DOWNLOAD करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://play.google.com/store/apps/details?id=com.jio.jioplay.tv&hl=en_IN

जिओ सावन वरील रेडीओ कार्यक्रम ऐकण्यासाठी

JIOSaavn  रेडीओ ऐकण्यासाठी स्मार्ट फोन  व इंटरनेट सुविधा आवश्यक

Playstore वरून JIOSaavn app डाऊनलोड करावे.

Podcast मधून महावाणी (Mahavani) हा ऑप्शन निवडावा तिथे आपणास रेडीओ ऐकण्यास उपलब्ध असेल.

JIOSaavn मोबाइल वर DOWNLOAD करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://play.google.com/store/apps/details?id=com.jio.media.jiobeats&hl=en_IN


Tags : #diksha, #jiotv, #jiosaavn, #educationalcalendar, #mahavani, #dnyanganga, #महावाणी, #ज्ञानगंगा 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please do not enter any spam link in the comment box.