RBI द्वारे Mobile Aided Note Identifier (MANI) या मोबाइल Application ची निर्मिती
RBI LAUNCHES MANI MOBILE APPLICATION FOR BLIND PERSON OF INDIA. MANI MEANS MOBILE AIDED NOTE IDENTIFIER. ITS USEFUL FOR DISABLE PERSON TO KNOW NOTES.
Image Source - Google | Image by - https://affairscloud.com/ |
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर यांनी आज दिनांक 01 जाने 2020 रोजी दृष्टिदोष असणा-या व्यक्तींना भारतीय बँकांच्या नोटांची ओळख पटवण्यासाठी मदत करणारा 'Mobile Aided Note Identifier (MANI)' हे मोबाइल Application आहे.
भारतीय नोटांमध्ये अशी सुविधा दिली आहे जी दृष्टिहीन (कलर ब्लाइंड, अंशतः दृष्टी असलेले आणि अंध लोक) यांना नोटा ओळखण्यास सक्षम करतात, उदा. इंटॅग्लिओ प्रिंटिंग आणि स्पर्श चिन्ह, नोटांचे विविध आकार, मोठे अंक, विविध रंग, एकरंगी रंगछट आणि नमुने. तांत्रिक प्रगतीमुळे दृष्टिबाधितांसाठी भारतीय नोट्स अधिक सुलभ बनविण्याच्या नवीन संधी उपलब्ध झाल्या आहेत आणि त्याच्या वापराने त्यांचे दररोजचे व्यवहार सुकर होतील. 6 जून 2018 च्या विकासात्मक आणि नियामक धोरणांवरील स्टेटमेंटमध्ये जाहीर केल्यानुसार, बँकेने 'MANI' हा मोबाइल Application विकसित केला आहे. ज्यामध्ये पुढील वैशिष्ट्ये आहेतः
- नोटांमधील महात्मा गांधी मालिका आणि महात्मा गांधी (नवीन) मालिका या दोन्हीतील फरक पुढील व मागील बाजू पाहून किंवा डुमडलेली असो किंवा कशी ही पकडलेली असो ती ओळखण्यासाठी सक्षम तसेच कोणत्याही प्रकारच्या उजेडात ती स्कॅन करता येते.
- हिंदी / इंग्रजीमध्ये ऑडिओ नोटिफिकेशनद्वारे नोटांमधील भेद ओळखण्याची क्षमता आणि स्पंदनासारख्या ध्वनी-नसलेल्या मोड (दृष्टी आणि श्रवण कमजोरी असलेल्यांसाठी उपयुक्त).
- Installation नंतर, मोबाइल Application वापरताना इंटरनेटची आवश्यकता नसते व ऑफलाइन मोडमध्ये कार्य करते.
- Underlying Device आणि Operating System संयोजन द्वारे आवाजाला सक्षम केलेल्या नियंत्रणाला समर्थन देणे आणि Application features मध्ये प्रवेश करण्यासाठी व्हॉईस नियंत्रणाद्वारे Mobile Application ला Navigate करण्याची क्षमता.
- Application विनामूल्य आहे आणि कोणत्याही शुल्काशिवाय / देयकाशिवाय Android Play Store आणि iOS अॅप स्टोअर वरून डाउनलोड केले जाऊ शकते.
- हा मोबाइल Application नोट ही अस्सल किंवा बनावट असल्याचे प्रमाणित करीत नाही.
(योगेश दयाल)
मुख्य महाव्यवस्थापक
Android app मिळविण्यासाठी पुढील CLICK HERE वर क्लिक करा.
IOS 9+ app
IOS 8 app
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please do not enter any spam link in the comment box.