Breaking

शनिवार, २७ जून, २०२०

तुम्हाला माहित आहे का 2020 मधील भारतातील सायबर सोसायटी, गुन्हा आणि कायदा

तुम्हाला माहित आहे का 2020 मधील भारतातील सायबर सोसायटी, गुन्हा आणि कायदा

आपण राहतो त्या जगाचे चित्र बदलत जात आहे. पूर्वी संपर्क साधण्यासाठी प्रत्यक्ष जावे लागत होते पण आता तंत्रज्ञान विकसित झाल्याने आपणास कधीही कुठेही संपर्क साधणे सोयीस्कर झाले ते सायबर सोसायटी मुळे तर ही सायबर सोसायटी काय त्यात घडणारे गुन्हे कोणते आणि त्यावर कायदे कोणते ते जाणून घेणे गरजेचे आहे. तेव्हाच आपण सुरक्षित राहू शकतो. 

सायबर सोसायटी : 

आज जगात तंत्रज्ञानाचा स्फोट झालेला आहे. तंत्रज्ञान इतके प्रगत झाले आहे आपण जगात कुणाशीही संवाद साधू शकतो किवा माहिती देवाण घेवाण करू शकतो. जगात मोबाईल, संगणक – लॅपटॉप, इंटरनेट चा वापर करणाऱ्यांची एक सायबर सोसायटी तयार झाली आहे. जे कोणी वरील साधने वापरत असतील तर ते कळत नकळत या सोसायटीचा भाग झालो आहोत. आणि त्याशिवाय आज आपण राहू शकत नाही. आपल्या जीवनात मोबाईल, संगणक – लॅपटॉप, इंटरनेट एक जीवनावश्यक गोष्ट होऊन बसली आहे. प्रत्येक कामासाठी आज आपण या तंत्रज्ञानावर अवलंबून आहोत. त्यामुळे कामे सोपी व घरबसल्या करणे शक्य आहे.  जसा प्रत्येक बाबीला दुसरी बाजू असते तसेच तंत्रज्ञानाचा जसा फायदा आहे तसा तोटा देखील आहे. आणि तो तोटा म्हणजे सायबर गुन्हे.

सायबर गुन्हे : 

जे गुन्हे मोबाईल, संगणक – लॅपटॉप, इंटरनेट यांच्याशी संबंधित असतात त्यांना सायबर गुन्हे संबोधतात. सायबर गुन्हे हे दोन प्रकारे वर्गीकृत केले जातात.

  1. एक प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये मोबाईल, संगणक – लॅपटॉप, इंटरनेट या साधनांवर हल्ला चढविला जातो आणि ती साधने बाधित केली जातात. उदा. वायरस, बग, डॉस हल्ला
  2. तर दुसऱ्या प्रकारच्या गुन्ह्यात मोबाईल, संगणक – लॅपटॉप, इंटरनेट ही साधने वापरून एखाद्या व्यक्ती किवा संस्थेस आर्थिक तथा मानसिक त्रास दिला जातो.  उदा. सायबर धमकी, आर्थिक नुकसान, वैयक्तिक माहिती किवा डेटा चोरणे.

Do you Know Cyber law aganist Cyber crime

सायबर कायदा : 

सायबर गुन्हा नियंत्रित ठेवण्यासाठी लागू असलेला कायदा सायबर कायदा म्हणला जातो. भारतात सायबर गुन्ह्यासाठी माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 (IT Act 2000) आणि माहिती तंत्रज्ञान (संशोधन) कायदा 2008 लागू आहे. IT कायद्यात कायद्याचे स्वतंत्र क्षेत्र नसते तर त्यात कराराची, बौद्धिक संपत्ती, गोपनीयता आणि डेटा संरक्षण कायद्याचा समावेश असतो.

सायबर गुन्ह्यामधील काही गुन्ह्यांवर भारतीय दंड संहिता (Indian Penal Code) , कॉपीराईट कायदा 1957 (Copyright Act 1957)आणि आतंकवाद निर्बंध कायद्यांद्वारे ( देखील कार्यवाही केली जाऊ शकते.

सायबर कायद्याचे महत्व पुढील बाबीवरून लक्ष्यात येते.

  1. यात इंटरनेटवरील सर्व व्यवहार अंतर्भूत आहेत.
  2. याद्वारे इंटरनेटवरील सर्व हालचालींवर लक्ष ठेवते.
  3. हे सायबर स्पेसमधील प्रत्येक क्रिया तसेच प्रत्येक प्रतिक्रिया स्पर्श करते.

सायबर कायद्याचे क्षेत्र :

  1. फसवणूक (Fraud)
  2. कॉपीराईट (Copyright)
  3. मानहानी (Defamation)
  4. उत्पीडन आणि धमकी (Harassment & Stalking)
  5. बोलण्याचे स्वातंत्र्य (Freedom of speech)
  6. व्यापारातील गुपिते (Trades secrets)
  7. करार आणि रोजगार कायदा (Contracts & Employment Law)

सायबर कायद्याचे फायदे :

  1. कायद्याद्वारे प्रदान केलेल्या कायदेशीर पायाभूत सुविधांचा वापर करून आता संस्था ई-कॉमर्स करण्यास सक्षम आहेत.
  2. कायद्यातील डिजिटल स्वाक्षर्‍यास कायदेशीर मान्यता आणि मान्यता देण्यात आली आहे.
  3. कॉर्पोरेट कंपन्यांच्या प्रवेशासाठी व्यवसायात डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र देण्याचे दरवाजे उघडले आहेत.
  4. हे सरकारला वेबवर अधिसूचना जारी करण्यास अनुमती देते.
  5. ते कंपन्या किंवा संस्थांना कोणताही फॉर्म, अर्ज किंवा कागदपत्र कोणत्याही सरकारी कार्यालय, प्राधिकरण, संस्था किंवा एजन्सीकडे सूचित केलेल्या ई-फॉर्मद्वारे सादर करू शकतात.
  6. आयटी अ‍ॅक्टमध्ये सुरक्षेच्या महत्त्वपूर्ण बाबींकडेही लक्ष दिले गेले आहे जे इलेक्ट्रॉनिक व्यवहारांच्या यशासाठी इतके महत्त्वपूर्ण आहेत.

पोलीस किवा कायदा आहे म्हणून आम्ही बेफिकीरपणे वागू शकतो असे वाटू नये. कारण सायबर गुन्ह्यातून वाचण्यासाठी आपणास आवश्यक ती काळजी किवा सवय लावून घ्यावी लागणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please do not enter any spam link in the comment box.