जिल्ह्यातील नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्रांची DIET पनवेलच्या
पथकामार्फत पडताळणी
महाराष्ट्र राज्य शासनाच्या विज्ञान शिक्षण प्रसार या
उपक्रमांतर्गत रायगड जिल्ह्यातील एकूण २९ जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळांना
नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्र मिळालेले आहेत.
एकूण १५ तालुक्यात (कर्जत – २, खालापूर – २, पेण – २, पनवेल –
२, उरण – २, सुधागड – २, रोहा – २, अलिबाग – २, माणगाव - २, महाड – २, म्हसळा – २, मुरुड – २, श्रीवर्धन
– ३, तळा – १, पोलादपूर – १) जिल्हा परिषद शाळांत विज्ञान केंद्र स्थापित झाले
आहेत.
सर्व २९ केंद्रांची जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक
विकास संस्था, पनवेल च्या जिल्हास्तरीय पथकामार्फत दि. २५ जुलै २०१८ ते ३
ऑगस्ट २०१८ या कालावधीत भेट देऊन पडताळणी
करण्यात आली. सदर पथकाचे नेतृत्व मा. डॉ. संजय वाघ सर, ज्येष्ठ अधिव्याख्याता
यांनी केले. तसेच सदस्य म्हणून मा. राजेंद्र लठ्ठे सर, अधिव्याख्याता व श्री. प्रविण
देवरे, विज्ञान विषय सहाय्यक यांनी काम पाहिले.
भेट दिलेल्या २९ शाळांना सदर नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्राचे
महत्व व त्याचा समाजासाठी उपयोग कसा करावा यावर डॉ. संजय वाघ यांनी सखोल
मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे विज्ञान केंद्राचा तालुक्यात प्रसार करणे, शाळेतील
सर्व शिक्षकांनी केंद्र समजावून घेणे व सर्व विद्यार्थ्यांत वैज्ञानिक दृष्टीकोन
निर्माण करण्याबाबत श्री. राजेंद्र लठ्ठे सर यांनी विस्तृत मार्गदर्शन केले तसेच
विज्ञान केंद्राची जपवणूक, भेटींच्या नोंदी, प्रत्येक प्रतीकृतीमधून प्राप्त
होणारे संबोध याबाबत श्री. प्रविण देवरे यांनी शिक्षकांशी सुसंवाद साधला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please do not enter any spam link in the comment box.