मिशन प्रगत शैक्षणिक रायगड
बीट स्तरीय शिक्षण परिषद
खालापूर
दिनांक:- 30 जुलै 2018
*प्रेरणास्रोत*
मा. अभयजी यावलकर साहेब (IAS), मा. सुभाषजी महाजन,
मुख्य कार्यकारी अधिकारी
प्राचार्य
रायगड
जिल्हा
परिषद, अलिबाग
DIECPD पनवेल जि. रायगड
*प्रमुख उपस्थिती*
डॉ. भरत पवार, वरिष्ठ
अधिव्याख्याता
विषय सहाय्यक - 5, IED जिल्हा समन्वयक-2
तालुका स्तरावरील उपस्थिती
गट विकास
अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी,-2
केंद्रप्रमुख - 4 व विषय साधनव्यक्ती 6 , शिक्षक – 130
*शिक्षण
परिषदेत खालील मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.*
® डॉ. भरत पवार, वरिष्ठ अधिव्याख्याता यांचे प्रेरणादायी
विचार
ü पर्यवेशीय यंत्रणेकडून
आदर्श शाळाभेट कशी असावी.
ü
विद्यार्थ्यांमध्ये
आत्मविश्वास कसा निर्माण करावा?
ü
विद्यार्थी
आणि शिक्षक यांच्यामध्ये आंतरक्रिया कशी असावी?
ü
अध्यापनशास्त्र
आणि मूल्यांकन यांचा दैनंदिन वापर.
ü
विद्यार्थ्यांची
मानसिक स्थिती आणि तो कोणत्या वातावरणातून आला याचा अभ्यास करून अध्यापन कसे करावे.
ü
विद्यार्थ्यांच्या
प्रगतीमधील अडथळे यांचा विचार करून अध्यापन कसे दूर करावे ?
ü
शैक्षणिक
साहित्याचा वापर कुठपर्यंत करावा?
ü
सहयोगी
पद्धतीने मूल शिकतं.
ü
मूल
शिकतं होण्यासाठी चिकित्सक विचार करणं आवश्यक.
ü
शिकण्यातील
अडचणी सोडविण्यासाठी समस्या निराकरण तत्व स्विकरले पाहिजे.
अशा
21 व्या शतकातील कौशल्यांची उपयुक्तता व आवश्यक ता आपल्या प्रेरणादायी
विचारातून
स्पष्ट केली.
अशा
प्रकारे बीट स्तरीय शिक्षण परिषदेची प्रेरणादायी विचाराने सुरुवात झाली
® समावेशीत शिक्षण*
ü समावेशीत संकल्पना व समावेशीत
शिक्षणाकडे वाटचाल
ü
दिव्यांग
विद्यार्थ्यांचे विविध प्रकार
ü
दिव्यांग
विद्यार्थ्यांच्या प्रकारानिहाय विश्लेषण
ü
दिव्यांग
मुलांसाठी ची विविध अध्ययन शैली.
ü
दिव्यांग
विद्यार्थी व त्यांची शैलीनुसार शिकण्याची प्रक्रिया व मूल्यमापन यांचे कृतीसह सादरीकरण
केले
आदी.
मुद्द्यावर श्री.रविंद्र विशे व भरत वेखंडे
, IED जिल्हा समन्वयक यांनी उद्बोधन केले.
® इंग्रजी विषय आणि समाजातील महत्व ,शाळेतील स्थिती
इंग्रजी
विषयबद्दल समाजामधील विचार करण्याची पद्धती आणि त्यातील जिल्हा परिषद शाळेतील इंग्रजी
विषयाची सद्यस्थिती याबद्दल चर्चा केली, तसेच
ü
तेजस
प्रोग्रामचा
ü
mooc
कोर्सची संधी.
ü
शिक्षकांची
इंग्रजी विषयात प्रगल्भीकरण.
ü
Tag
कार्यक्रमाचा उद्देश व महत्त्व.
ü
BCPT
DATA व वर्गाध्यापन
ü
spoken
English workshop ची यशस्विता
आदी.
मुद्द्यावर श्री. संजय पाटील
,विषय सहाय्यक यांनी मार्गदर्शन केले.
® वर्गाध्यापनामध्ये माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग
आणि दिक्षा आणि मित्रा अँप चे
उपयोजन
ü
दीक्षा
अँप चा वर्गाध्यापनातील आढावा.
ü
दीक्षा
अँप चे महत्त्व.
ü
दीक्षा
अँप कोठून मिळवावा?
ü
दीक्षा
अँप चा प्रत्यक्ष अध्यापनात वापर करण्यातील शिक्षकांच्या समस्यांचे निराकरण.
ü
दीक्षा
अँप द्वारे अध्ययन अध्यापन कृती
आदी.
मुद्द्यावर श्री. गणेश कुताळ ,विषय सहाय्यक यांनी प्रत्यक्षिकासह माहिती दिली.
® गणित संबोध कार्यक्रमाची उजळणी आणि गणित विषयाचे
महत्व
ü
गणित
हे व्यवहाराचे शास्त्र.
ü गणित विषयामध्ये क्रमबद्दतेचे
महत्व,
ü
अंदाज,तर्क
आणि हिशोब यांचे दैनंदिन जीवन आणि गणित यांच्यातील महत्व.
ü
कृतीतून
गणिताचे अध्ययन अनुभव देणे आवश्यक
ü
गणित अध्ययन समृद्धी साहित्य पेटीचा वापरातून क्षमता
विकसन
आदी.
मुद्द्यावर श्री. उस्मान शेख ,विषय सहाय्यक यांनी विश्लेषण केले.
संख्याज्ञान
आणि संख्यावारील क्रिया क्षमता विकासनासाठी कृती आराखडा आणि
कृतिकार्यक्रम
गणित विषयातील विद्यार्थ्यांना
येणाऱ्या समस्या आणि त्यावरील उपाय या अनुषंगाने कृती आराखड्याचे महत्व आणि कृती आराखडा
कसा तयार करावा आणि साहित्यचा वापर कसा करावा याचे सविस्तर प्रात्यक्षिक श्रीम. मनीषा
खैरे यांनी दाखविले.
® अध्ययन निष्पत्ती आधारित प्रात्यक्षिक
प्रत्येक
व्यावसायिक त्याचे ज्ञान अद्ययावत ठेवण्यासाठी प्रयत्न करत असतो.आपणही आपले व्यावसायिक
कौशल्य वाढविण्यासाठी शिक्षणातील बदलत्या संकल्पना,मूलकेंद्रित नवनवीन अध्ययन अनुभव
देण्याच्या पद्धती स्विकारूया.
अध्ययन
निष्पत्ती साध्यतेसाठी मुलाच्या बोधात्मक, भावात्मक, क्रियात्मक विकासाशी अध्ययन निष्पत्ती
निगडीत आहेत.अध्ययन निष्पत्ती साध्यतेसाठी प्राचार्य महाजन साहेब व ज्येष्ठ अधिव्याख्याते
डॉ. भरत पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेल्या
Filteration Module नुसार अध्ययन निष्पत्ती टप्प्यांचे मार्गदर्शन केले.
ü
कौशल्य
विकसन प्रक्रियेचा प्रवाह
ü
अध्ययन
निष्पत्ती प्राप्त करण्याची कृती
ü
अध्ययन
निष्पत्ती आधारित प्रश्न निर्मिती
आदी.
मुद्द्याचे सौ. सविता आष्टेकर,विषय सहाय्यक यांनी सचित्र प्रात्यक्षिक दाखविले.
® मनोगत
श्री.पालकर सर आणि श्रीम.अंजली विचारे मॅडम यांनी शिक्षण परिषेदेतून शिक्षकांना
झालेले बहुमोल मार्गदर्शन आणि कार्य करण्यासाठी मिळालेली प्रेरणा आणि आपली शाळा, केंद्र
आणि तालुका प्रगत करण्यासाठी मिळालेली दिशा याविषयावर आपले मनोगत व्यक्त केले आणि आभार
मानले.
® आभार
केंद्र
प्रमुख श्री .द.बा.जाधव यांनी शिक्षण परिषदेसाठी उपस्थित
सर्व मान्यवरांचे आभार मानले आणि अध्यक्षांच्या वतीने शिक्षण परिषदेची सांगता केली.
® शब्दांकन
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please do not enter any spam link in the comment box.