Breaking

सोमवार, ३० जुलै, २०१८

बोरघर हवेली, तळा शिक्षण परिषद ३० जुलै २०१८


जिल्हा शैक्षणिक  सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था,
 पनवेल, जि. रायगड



मिशन प्रगत शैक्षणिक रायगड

बीट स्तरीय शिक्षक संवाद 

कार्यशाळा

स्थळ-  रा.जि. प. शाळा बोरघर हवेली, तळा

दिनांक : ३० जुलै २०१८  ( वेळ : १० ते १ )


*प्रेरणास्रोत*
मा. अभयजी यावलकर साहेब (IAS),                                मा. सुभाषजी महाजन साहेब ,
       मुख्य कार्यकारी अधिकारी                                                       प्राचार्य
   रायगड जिल्हा रिषद, अलिबाग                                   DIECPD पनवेल जि. रायगड

*उपस्थिती*
विस्तारअधिकारी – 01, केंद्रप्रमुख – 04, विषयसाधनव्यक्ती – 04, शिक्षक - 65


* कार्यशाळेतील विषय सूत्रे*
®  प्रास्ताविक
         श्री. संदीप जामकर , केंद्रप्रमुख-  बोरघर हवेली यांनी प्रास्ताविक करताना खालील मुद्दे मांडले.
ü अध्ययन स्तर निश्चितीकरण कार्यक्रम समजून घेणे आवश्यक.
ü डेटा आधारित काम करण्यासाठी DIET ची सोबत आवश्यक.
ü बीटाचा शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी आपण कटिबद्ध राहूया.

® संवादक
श्री. हेमकांत गोयजी,विषय सहाय्यक - DIET पनवेल यांनी 1 तास 55 मिनिटात केंद्रप्रमुख, विषय साधनव्यक्ती, शिक्षक यांच्याशी संवाद साधताना खालील विषयांची दिशा स्पष्ट केली.

ü आपण कुठे आहोत ते शोधुया
तळा तालुक्यातील केंद्रानिहाय माहिती शिक्षकांसमोर ठेवली व त्यावर आधारित चर्चा घडवून आणली. *प्रत्येक केंद्राने आपण कुठे आहोत ?* याचा विचार करायचा.

ü आपल्या कामाचा आरंभबिंदू शोधून काम करणे आवश्यक
आपल्याला उपलब्ध माहिती आधारे जी मुले मूलभूत क्षमता प्राप्त आहेत. त्यांना काय अध्ययन अनुभव दिले पाहिजे ? व जी मुले मूलभूत क्षमता प्राप्त नाहीत त्यांना काय अध्ययन अनुभव द्यावेत यावर चर्चा केली.

ü मूलभूत क्षमता अप्राप्त विद्यार्थ्यांचा कृती कार्यक्रम
मुलाची अध्ययन स्तर निश्चिती केल्यानंतर मूलनिहाय विद्यार्थ्यांचा कृती कार्यक्रम आवश्यक आहे. मूल जिथे अडले आहे. तेथून पुढच्या क्षमतेपर्यंत पोहचण्यासाठी चा कृतिकार्यक्रम  सोदाहरण स्पष्ट केला.

ü अध्ययन निष्पत्ती आधारित कृतिकार्यक्रम
अध्ययन निष्पत्ती आधारित कामकाज व कृती दैनंदिन वर्गाध्यापनात व्हायला हव्यात. मूलनिहाय अध्ययन निष्पत्ती आधारित कृती कार्यक्रमाचे प्रात्यक्षिक दाखविले गेले.
®  प्रश्नोत्तरे व चर्चा
ü माहितीचे विश्लेषण करताना कोणते साधन वापरले ?
          उतारा वाचन - पहिली ते आठवी, वजाबाकी - इयत्ता दुसरी, भागाकार - इयत्ता 3 री ते आठवी.

ü मूलनिहाय कृतिकार्यक्रम कसा तयार करावा ?
वर नमूद केल्याप्रमाणे प्रात्यक्षिक सादर केले.

ü मूल शिकण्याचा कालावधी किती असावा ?
मुलाच्या शिकण्याच्या क्रियेला विशिष्ट कालमर्यादेत बांधता येत नाही. मुलाची गरज,क्षमता पाहून त्याला शिकण्याचे पुरेसे अध्ययन अनुभव देण्यासाठी जितका वेळ लागेलतितका द्यावा. हे अध्ययन अनुभव देण्यासाठी कागदावर नियोजन नसले तरी चालेल. मात्र शिक्षक किंवा सुलभक यांच्या मेंदूत रोजचे नियोजन ठरलेले असावे. कोणतेही साधारण मूल 30 दिवसात वाचायला शिकू शकते असा ठोकताळे मांडता येतात. परंतू मूलाची प्रतिसाद क्षमता आवश्यक.

ü पायाभूत चाचणीचे स्वरूप कसे असेल ?
अध्ययन निष्पत्ती आधारित प्रगत चाचण्या होतील.

असे प्रश्न उपस्थितांनी विचारले व त्यांना उत्तरे देण्यात आली.

®  श्री. एस. टी. खताळ , विस्तार अधिकारी यांचे मार्गदर्शन
ü डाएट ही आपली मार्गदर्शक संस्था.
ü मूलनिहाय नियोजन करणे आवश्यक.
ü ऑक्टोबर अखेर आपला बीट प्रगत करूया.
वरील मुद्दे मांडून उपस्थिताना मार्गदर्शन केले.


®   शब्दांकन
        श्री. हेमकांत गोयजी, विषय सहाय्यक, DIET पनवेल


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please do not enter any spam link in the comment box.