Breaking

बुधवार, ३ नोव्हेंबर, २०२१

Field Investigator Officers Role in NAS Exam 2021 | क्षेत्रीय अन्वेषक यांची भूमिका

Field Investigator Officers Role 

क्षेत्रीय अन्वेषक यांची भूमिका 

in NAS Exam 2021

National Achievement Survey 2021

क्षेत्रीय अन्वेषक (FI) यांचेसाठी द्यावयाच्या सूचना/भूमिका व कार्ये

  • कोणताही क्षेत्रीय अन्वेषक (FI) सर्वेक्षणादरम्यान अनुपस्थित राहणार नाही अथवा मुख्यालय सोडणार नाहीत.
  • कोणताही क्षेत्रीय अन्वेषक चाचणीच्या दिवशी मुख्यालय सोडून जाणार नाही तसेच तो तालुका व जिल्हा स्तरावरील यंत्रणेच्या सातत्यपूर्ण संपर्कात राहील, वेळोवेळी दिलेल्या सूचनानुसार सर्वेक्षण प्रशिक्षण व कार्यवाही यशस्वीरीत्या पूर्ण करतील.
  • सर्वेक्षणासाठी कोणती शाळा दिलेली आहे, याची माहिती NAS पोर्टल वरून घ्यावी. वारंवार त्यांना NAS Portal login करून प्रशिक्षण साहित्य, नियुक्ती आदेश व सर्व सूचनांबाबत अद्ययावत राहतील.

या संदर्भात सखोल माहिती देणारा हा व्हिडिओ नक्की पाहा.

  • सर्वेक्षणासाठीच्या नियुक्ती आदेशाची प्रत NAS पोर्टलवरून डाऊनलोड करून घ्यावी, त्याची प्रिंट / छापील प्रत अथवा डिजिटल प्रत आपल्या सोबत ठेवावी. शाळेत गेल्यानंतर संबधित शाळेच्या मुख्याध्यापक यांना ती दाखवावी. सोबत आपले आधार कार्ड, पण कार्ड इत्यादीपैकी एक ओळखपत्र जवळ ठेवतील.
  • क्षेत्रीय अन्वेषक(FI) आपल्या LOA मध्ये नेमून दिलेल्या शाळेवर सकाळी ७.३० वाजता हजर राहून मुख्याध्यापकास REPORTING करतील. निरीक्षकास संपर्क साधून आपल्या Activity sheet नुसार पुढील कामकाजास सुरुवात करतील.
  • NAS CELL CBSE कडून निवड करण्यात आलेल्या प्रत्येक शाळेसाठी एक निरीक्षक नेमण्यात आलेला आहे. त्यांच्याकडून आवश्यक सर्वेक्षण साहित्य घेवून त्यांच्या मदतीने सर्वेक्षणाचे काम ठरलेल्या वेळापत्रकानुसार पार पाडावे.
  • राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण अंमलबजावणीसाठी दिलेल्या वेळापत्रकानुसार नियुक्त नगुना शाळेत बेळेपूर्वी एक तास अगोदर उपस्थित राहतील.
  • सर्वेक्षणाच्या दिवशी परीक्षा कक्षाची पुनच तपासणी करतील.
  • परीक्षा होलसाठी शाळा प्रमुख आणि निरीक्षकांशी संवाद साधेल सामाजिक अंतर राखण्यासाठी सर्वेक्षण करण्यासाठी मोठी खोली निवडतील.
  • पूर्वनिर्धारित प्रक्रियेनुसार (Draw Method) वर्गाच्या तुकडीची निवड करतील.
  • पूर्वनिर्धारित सुचनेनुसार निवडलेल्या वर्गातील नमुना विद्यार्थी निवड [Draw Method + नमुना मध्य (SI)] द्वारे करतील आणि Control Sheet व्यवस्थितपणे भरतील.
  • दिलेल्या वर्गातील पटावरील विद्यार्थ्यांची वर्गातील संख्या आणि उपस्थित विद्यार्थी यासाठी माहिती गोळा करून तपासणी करतील.
  • परीक्षेच्या वेळापत्रकाचे काटेकोर पालन करतील. उदा. प्रारंभ वेळ, समाप्ती वेळ.
  • परीक्षेच्या वेळापत्रकाचे काटेकोर पालन करतील. उदा. प्रारंभ वेळ, समाप्ती वेळ.
  • क्षेत्रीय अन्वेषक फलकाचा वापर करून प्रात्यक्षिक करून दाखवतील. उदा. विद्याथ्यांनी योग्य उत्तर कसे नोंदवावे याचे नमुना उदाहरण सोडवून देईल . विद्यार्थ्यांनी सर्व प्राथमिक माहिती OMR मध्ये व्यवस्थितपणे भरण्यासाठी आवश्यक सूचना व मदत पुरवतील जेणेकरून OMR खराब होणार नाही,चूरगळणार नाही.भिजणार नाही इ.
  • दिलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार गोपनीय साहित्य उघडतील.
  • निवडलेल्या विद्याथ्यांना मार्गदर्शक सूचनानुसार व बिहित पद्धतीनुसार चाचणी पुस्तिका क्रमाने वितरित करतील.
  • अनुचित प्रकारास आळा घालण्यासाठी सूचनानुसार कक्षाची तपासणी करतील.
  • सूचनांबाबत काही प्रश्न असल्यास विद्यार्थ्यांना हात वर करण्यास सांगतील.
  • परीक्षा कक्षात शांतता राखतील. स्वतः कोविड लसीकरण करून घेतल्याचा पुरावा जवळ बाळगतील.
  • स्वत: COVID नियमाचे पालन करून विद्यार्थ्यांकडून ते पाळले जातात की नाही यावर कटाक्ष ठेवतील. उदा. मास्कचा वापर, FACE शिल्डचा वापर इत्यादी.
  • इयत्ता ३ री व ५ वी साठी ओएमआर भरण्यात विद्यार्थ्यांना मदत करतील. सदर प्रयोजनासाठी इयत्ता तिसरीसाठी २ क्षेत्रीय अन्वेषक असणार आहेत. दोघांच्या कार्यात सर्वेक्षण पार पडेपर्यंत समन्वय ठेवावा. एका ने पहिले १५ विद्यार्थी तर दुसऱ्या FI ने पुढील १५ विद्यार्थी यांचे पर्यवेक्षण करून सर्व प्रक्रिया पूर्ण करावी.

  • परीक्षेनंतर OMR SHEET गोळा करूनत्याची मोजणी करतील.एफआब ओएमआरची भौतिक मोजणी, निरीक्षकांच्या उपस्थितीत, वेळेत, उत्तरपत्रिका (OMR) पॅकिंग, व अन्य साहित्य मार्गदर्शक तत्त्वांनुसार सील करतील.
  • औपचारिक पद्धतीने विद्यायनि प्रश्नावली भरल्याची खात्री करतील.
  • वर्गास जे विषय संपादणूक चाचणीस दिलेले विषय शिकविणाऱ्या शिक्षकाकडून शिक्षक प्रश्नावली आणि मुख्याध्यापकाकडून शालेय प्रश्नावली व संबंधित OMR भरून घेतील.
  • कागदपत्रे, साहित्याचे पॅकिंग आणि सीलिंग करताना पाकिटावरील संबंधित माहिती काळजीपूर्वक भरतील. जसे की, UDISE कोड, लिफाफ्यावर सर्वेक्षणासाठी सर्व आवश्यक नोंदी, उपस्थित असलेल्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांची संख्या इ. नोंदवतील.
  • सर्वेक्षणाचे कोणतेही साहित्य विद्यार्थी, शिक्षक किंवा मुख्याध्यापक यांचेकडे बाकी राहणार नाही याची खात्री करून सर्व साहित्य जमा करतील.चाचणी पूर्ण झाल्यानंतर सर्व राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण साहित्य, सामग्री पॅकिंगमध्ये निरीक्षकाकडे सोपवतील.
  • क्षेत्रीय टिपणानुसार लॉगिनद्वारे परीक्षेशी निगडीत आवश्यक अहवाल NAS पोर्टलवर ऑनलाईन / offline WhatsApp द्वारे ENO  व DNO यांचेकडे अहवाल पाठवतील तसेच Reporting लिंक भरतील.
  • या सर्व कामी त्वरित संपर्क व मदत मिळविण्यासाठी तालुका व जिल्हा स्तरावरील विविध झोनल अधिकारी, समन्वयक, सहाय्यक समन्वयक यांचे संपर्क क्रमांक स्वतःजवळ जतन करून ठेवावेत. तालुकास्तरावरील WhatsApp गट हे संपर्काचे प्रभावी माध्यम आहे. त्यावरील सूचना, मार्गदर्शन याद्वारे कार्यवाही करावी.

NAS 2021 साठी वापरावयाच्या Control Sheet चा नमुना -  VIEW DOC
NAS 2021 साठी वापरावयाच्या Field Notes चा नमुना -  VIEW DOC
NAS 2021 साठी वापरावयाच्या OMR Sheet चा नमुना -  VIEW DOC



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please do not enter any spam link in the comment box.